आज आपण शिक्षिका सौ.पुजा अमित आवले यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास जाणून घेणार आहोत. श्रीमती पुजा या चिपळूण मध्ये खेर्डी येथे राहत असून यांचे शिक्षण एम.कॉम, बी.एड,सेट. झाले आहे. त्या गेली १० वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
तुम्हाला शिक्षक व्हावेसे कधी व का वाटले?
मला शिक्षणाची आणि शिकवण्याची पहिल्यापासून आवड शाळेत सुद्धा एखादा पॉईंट काही मैत्रिणींना कळला नाही तर तो समजावून सांगायचे तसेच माझी बारावी झाल्यावर माझे मार्कशीट बघून शिक्षकांनी प्रोत्साहित केले या शिक्षण क्षेत्रातील काय काय करिअर करू शकते याचे मार्गदर्शन केले.शिकत असतानच् क्लासेस घेत होते अशाप्रकारे शिक्षक पेशाची सुरुवात झाली.
ज्या विद्यार्थ्याला शिकवणे तुम्हाला कठीण वाटते त्याला तुम्ही कसे हाताळता?
त्या विद्यार्थ्याला काही समजले नसेल तर त्याला ते कितपत समजले हे जाणून घेऊन त्यानुसार समजावून सांगते त्यामध्ये येणाऱ्या शंकांचे निरसन करते तसेच उदाहरण देऊन अधिक समजावुन् सांगते
तुम्ही विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करता?
विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी समजून घेते . लर्न वीथ फन याचा वापर करते .वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चा वापर करून त्याप्रमाणे शिकवते.
तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कसे motivate करता?
विद्यार्थ्यांशी नेहमी सकारात्मक बोलते त्यांच्यातील कला गुण आवडनिवड जाणून घेऊन ,त्यांच्यातील आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी प्रयत्न करते.
तुम्हाला पालकांशी संवाद साधायला आवडते का? मुलांच्या पालकांसोबत तुमचे संबंध कसे आहेत?
हो , पालकांशी चांगले संबंध आहेत. पालकांशी सुसंवाद साधून विद्यार्थ्यानमध्ये कशी प्रगती करता येईल याची चर्चा करते.
तुम्ही वर्गात तंत्रज्ञान कसे वापरता?
इंटरनेट , पी.पी.टी., एल. इ.डी. प्रोजेक्टर , ई – कंटेन्ट, लॅपटॉप ई.
शिक्षण क्षेत्रातील तुमची सर्वात मोठी Achievement कोणती?
महाराष्ट्र राज्याची सेट ही परीक्षा उत्तीर्ण झाले
शिक्षक म्हणून तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासातील एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे.
एक विद्यार्थिनी ज्युनिअर कॉलेज मध्ये सायन्स स्ट्रिम होती एम.बी.ए. करायचे म्हणून बी.एम.एस.ला प्रवेश घेतला पाहिले दोन वर्ष अकाउंट मध्ये खूप समजण्यात अडचणी आल्या तृतीय वर्षाला मी अकाउंट हा विषय शिकवत होते सोप्या पद्धतीने शिकवत होते तिला अकाउंट विषयाची गोडी निर्माण झाली एक्साम मध्ये 90 च्या वर मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाली नावाजलेल्या एम.बी.ए.कॉलेज ला प्रवेश झाला प्लेसमेंट झाली आता परदेशात उच्च पदावर नोकरी करत आहे जेव्हा भेटली तेव्हा एकच वाक्य बोलली ” मॅडम तुम्ही नसतात तर माझ हे स्वप्न पूर्ण झाल नसत” असे बरेच अनुभव आहेत .