आज आपण श्री. राजन मधुकर शिरोडकर यांच्या शिक्षक होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.श्री राजन हे सध्या ठाणे व घाटकोपर येथे वास्त्यव्यास असून गेली १५ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.सध्या ते ठाणे येथील गोयंका असोशिएशन Goenka Association Educational Trust. ह्या संस्थेमध्ये मी १५ वर्षापासून कार्यरत आहे. श्री राजन यांनी Foundation Diploma,Dadar (Mumbai). Art Teacher Diploma,Commercial Diploma, Art Master Diploma, G D art, Dp.ed ऐसे अनेक कोर्स केले आहेत त्याचबरोबर इतर अनेक कला ही त्यांनी अवगत केल्या आहेत जसे नाटकाचे , क्लासिक ल डान्स चे make up,hair dressing, costume designing,mehndi,rangoli इत्यादी मध्ये त्यांनी बरेच वर्ष काम केले आहे. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये काम केल्यामुळे English calligraphy मध्ये ही त्यांनी बरीच प्रगती केली आहे. श्री राजन यांचे वडील BMC मध्ये कला शिक्षक होते. त्यावेळचे ते GD art j j school of art चे डिप्लोमा होल्डर होते.म्हणून कलेचे बाळकडू हे त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाले.त्यानंतर लग्ना नंतर त्यांच्या पत्नीने पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या पाठिंब्या शिवाय हे शक्यच झाले नसते असे श्री राजन आवर्जून सांगतात.
ट्रेनने प्रवास करताना चालू ट्रेन मध्ये नोट्स लिहिणे. स्केचिंग करणे.असा त्यांचा दिनक्रम चालू असायचा. पुढे शिकायची इच्छा असताना त्यांना वयाच्या १९ वर्षी नोकरी करणे भाग पडले. नोकरी करत असताना कमर्शिअल ला त्यांनी एडमिशन घेतले.वडिलांची खूप इच्छा होती की मी देखील त्यांच्या सारखे drawing and painting diploma करावा.त्यांच्या निधनानंतर त्यांनी GD art पूर्ण केले. आज ही त्यांची ठाणे जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात रांगोळी आर्टिस्ट म्हणून एक वेगळी ओळख आहे.
– लॉकडाउन मध्ये सर्वांचीच मानसिक अवस्था बिघडली होती.एक दिवशी राजन यांना पुण्याहून फोन आला की तुम्ही ऑनलाईन डेमो द्याल का? ज्या कलेत तुमची मास्टरी असेल असे काहीही चालेल.आम्ही असे आर्टिस्ट शोधत होतो.त्या काळात म्हणजे मार्च ते जून २०२० तीन महिने शाळा बंद ,ऑफिसेस ,बरेच काही बंद घरामध्ये बसून सर्व जण बोअर झाले होते.त्यांनी त्यांच्या मा परीने प्रयत्न करू असे ठरविले आणि रांगोळीचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे ठरले. १ तासाच्या सेशन मध्ये उपस्थित असलेल्या साहित्यात त्यांना जे जे शक्य होते ते सर्व काही त्यांनी दाखविले. कमीत कमी वेळात दर्जेदार काम केल्यामुळे त्यांना खूप छान प्रतिसाद मिळाला. ह्या ऑनलाईन डेमो साठी पूर्ण महाराष्ट्रातून ८००० पेक्षा जास्त लोकांनी likes comments केली. त्यादिवशी त्यांना वाटले शिक्षकी पेशा हा शाळेपुरता मर्यादित नसून तो कायम विद्या दान करण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत.