S R Dalvi (I) Foundation

Tr. Rajesh Salunke

Tr. Rajesh Salunke

आज आपण शिक्षक श्री राजेश हंसराज साळुंके (B.A.Ded) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षक राजेश हे फुलंब्री जि.औरंगाबाद  येथे राहत असून त्यांना अध्यापनाचा एकूण २७ वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते जि.प.उ.प्रा.शा. सुलतानवाडी ता.फुलंब्री जि.औरंगाबाद. या शाळेत कार्यरत आहेत.

शाळेचा(सेवेचा) शिक्षक होण्याच्या मागे त्यांचा  हेतू हाच होता की वडील शिक्षक होते आई जुनी दहावी झाल्याने घरात शैक्षणिक वातावरण होते अगदी लहानपणापासूनच विद्यार्थी व शिक्षक हे नातं आई-वडिलांपासून थेट वर्ग शिक्षकांपर्यंत ते अनुभवत होते.
सरळ,स्वच्छ असं वातावरण फक्त आपल्या शैक्षणिक क्षेत्रात आहे ही धारणा लहानपणापासूनच त्यांना झाली होती. प्रेम, जवळीक व आधार अशा महत्त्वपूर्ण भूमिका व संस्कृतीला जपणारे वातावरण शैक्षणिक क्षेत्रात नेहमी टिकून राहील असा विश्वास देणारे त्यांचे गुरु आई वडील यांची भूमिका शिक्षक होण्यासाठी प्रेरणादायी ठरली.
प्रसंगी नव्हे प्रत्येक वेळी आई व वडिलांची आपल्या पाल्यांविषयीची भूमिका ही शिक्षकांत असते.हे प्रत्यक्ष त्यांनी अनुभवले असल्याने शिक्षक होण्याची त्यांच्या  मनाची तयारी पक्की झाली होती एकूणच सेवा पूर्णतः ग्रामीण भागात झाल्याने व स्वतः ग्रामीण भागातला असल्याने त्यांच्या बालकांमध्ये व पालकांमध्ये काय समस्या आहेत याची जाणीव त्यांना होतीच.
मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वेळोवेळी होत असलेले ऑनलाइन व ऑफलाइन प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा उपयोग करून घेण्यासाठी नेहमी ते प्रयत्न करतात .शाळेवर असताना शाळा आमची आनंदाची,अभ्यास पंगत अशा उपक्रमांची अंमलबजावणी केल्यामुळे अगदी कोविड-19 च्या अवघड परिस्थितीत सुद्धा यावेळी सामान्य बालक आणि पालकाकडे डिजिटल साधनांची उपलब्धता नसल्याने त्या बालकांनी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाऊ नये यासाठी या उपक्रमांची अतिशय मदत त्यांना झाली.या उपक्रमांना अगदी पालकमित्र.बालकमित्र यांनी भरभरून सहकार्य दिले त्यामुळे मुलांसाठी शाळा बंद असताना सुद्धा शिक्षण सुरूच राहिले. गणित सोबती हा औरंगाबाद जिल्हा परिषद यांनी सुरू केलेला उपक्रम यात सहभाग घेण्याचा अभिनव अनुभव मिळाला.विद्यार्थ्यांचे प्रेम व त्यांचा आपल्या वरील विश्वास चच ऱ्यांचे मोठे यश आहे.पालकांनी शाळेसह शिक्षक बांधवांवर विश्वास ठेवावा ही मोठी अपेक्षा आहे. सेवेत नवीन कार्य करणाऱ्या व शिक्षक होण्याच्या प्रेरणेने येणाऱ्या नवीन शिक्षकांना प्रथमतः शुभेच्छा व आपल्यातील क्षमतांचा आपल्या बालकांसाठी फक्त शिकणे म्हणून नव्हे, तर आदर्शवादी व ध्येयवादी नागरिक म्हणून जगता यावे असा प्रयत्न करावा.

Scroll to Top