S R Dalvi (I) Foundation

Tr. Ratnamala Wagh

Tr. Ratnamala Wagh

आज आपण श्रीमती रत्नमाला शंकरराव वाघ यांच्या आनंददायी शिक्षिका प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्रीमती रत्नमाला या औरंगाबाद येथे राहत असून सध्या त्या जि. प.कें. प्रा.शाळा के-हाळा ता.सिल्लोड जि. औरंगाबाद येथे काम करत आहेत. आज त्यांना या क्षेत्रात २२ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांची प्रथम नियुक्ती याच शाळेवर शिक्षण सेवक म्हणून झाली त्या वेळेच्या कामाची साक्ष आजही त्यांच्या शाळेवर आदरणीय चांद सर आहे. येथे चार वर्षे सेवा केल्यानंतर वैयक्तिक कारणास्तव त्यांनी त्यांच्या गावात भवन येथे बदली करून घेतली. गावात आल्यानंतर त्यांना बऱ्याच प्रतिक्रिया भेटल्या गावात मान सन्मान नसतो. थोडे दूरच असावे. वगैरे वगैरे पण त्यांचे सर्व उलट झाले .गावात त्यांनी नऊ वर्ष सेवा केली त्यात दोन वर्ष मी प्र.मु. म्हणून पदभार सांभाळला. पण त्यांना काहीच अडचण आली नाही. त्याचे कारण गावात असल्यामुळे त्यांनी प्रथम त्यांच्यातला मॅडम हा शब्द बाजूला काढून ठेवला.

कुणाची काकू, कुणाची आजी, मावशी असे अनेक विशेषणे त्यांनी स्वीकारली. त्यांच्या सुखदुःखात त्या सामील झाल्या. घर जवळ असले तरी सकाळी डब्बा घेऊनच त्या शाळेत जात असत. चार वाजताच त्या घरी यायच्या. गावात असूनही त्यांनी घराचा मोह केला नाही. त्यांचे विद्यार्थी काय बनले हे महत्त्वाचे नाही, पण त्या हे स्वाभिमानाने सांगू इच्छितात की चांगला माणूस घडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याचा अनुभव त्या आजही गावात राहून घेत आहे. त्यानंतर त्यांच्या गावाच्या हाकेच्या अंतरावर पाच वर्षे चिंचखेडा येथे त्यांनी प्र.मु.अ.म्हणून पदभार सांभाळला. तेथील शालेय परिसर ,गुणवत्ता, सांस्कृतिक कार्यक्रम, गावातील सुखदुःख, विद्यार्थ्यांची शिस्त, त्यांची शाळा व त्या शाळेच्या यामुळे त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली. त्यात त्यांना श्रीमती खंडारे मॅडम यांची सुद्धा चांगली साथ मिळाली. त्यांच्या जीवनात त्या शिस्तीला फार महत्त्व देतात. कारण त्यांचे वडील मिलिटरी मध्ये नोकरीस होते. त्यांच्या घरात अत्यंत शिस्तीचे वातावरण होते. त्यावेळे ची ती शिस्त अतिशय खोल रुजली असल्यामुळे शिस्त म्हणजे शिस्त, त्यामुळे आतापर्यंत बावीस वर्षात पालकांची एकही तक्रार त्यांना आली नाही. आणि तक्रारीची त्यांनी कधी संधीच दिली नाही. बदली झाल्यानंतर त्या गावकऱ्यांनी त्यांच्या सुखदुःखात त्यांना सामील करणे त्यापेक्षा दुसरा पुरस्कार त्यांच्यामते कोणताच नाही. त्या एक गोष्ट सांगू इच्छितात की त्यांच्या घरात चार जण शिक्षक आहेत आणि ते सर्वजण गोरगरिबांच्या लेकरांसाठी काम करणार आहेत. कारण हे पवित्र क्षेत्र त्यांनी मनापासून स्वीकारले आहे. याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. त्यानंतर 2018 पासून त्या शाळेवर कार्यरत आहेत.

शिक्षण ही निसर्गाची देण आहे जो तो आपल्या परीने काही ना काही शिकत असतो.ज्यांची परिस्थिती बिकट आहे, जे पालक लक्ष देऊ शकत नाही त्यांच्यासाठीच त्या काम करतात. त्यांचा एक दिवसही कामाचा वाया गेला तर त्यांचे मन त्यांना खजील करते व ते त्या भरून काढण्याचा प्रयत्न करतात. कोरोना काळातही त्यांना खूप वाईट वाटायचे. “आपल्याकडे पैसे आहे, वेळ आहे आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो .पण या ग्रामीण भागातील मुलांचे भवितव्य अंधारात आहे” त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत जोखीम पत्करून आजाराविषयी पालकांची भीती दूर केली. त्या एक दिवसाआड गावात जाऊन त्यांच्या परीने मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत. यात मला त्यांच्या पतीचा व सासू-सासऱ्यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. यापुढेही त्यांना तळागाळातील मुलांसाठी काम करायचे आहे. त्यासाठी थोरा मोठ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असावे असे त्यांना वाटते व त्यासाठी त्यांचे आरोग्य चांगले राहावे असे त्यांना वाटते . आणि अशीच त्या ईश्वरचरणी मनोमन प्रार्थना करतात. शेवटी त्यांना एवढेच म्हणायचे आहे की..
आरोग्याची त्रिसूत्री जोड त्याला नियमांची.
तंदुरुस्त राहून सेवा करील मायभूमीची.
नवनवीन शिकावे. अहंकार मनी नसावे.
विवेक मिळता. उत्तम माणूस बनावे.
आव्हाने अनेक अनेक हे ताण .
उपाय ही अनेक शिकवी जन .
जीवन खूप सुंदर आहे पण ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे.
मंगेश पाडगावकर म्हणतात..
पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की, भरला आहे म्हणायचं.
हे ज्याचं त्याने ठरवायचं..
धन्यवाद