S R Dalvi (I) Foundation

आज आपण सौ. रेवती राजेंद्र घोगरे (एम. ए.मराठी, बी. एड. डी. एस.एम) यांचा शिक्षिका होण्यापर्यंतचा प्रवास याबद्दल जाणून घेणार आहोत. सौ.रेवती या पुणे येथे राहत असून असून गेली १६ वर्षे त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या सिटी पाईड स्कूल,निगडी या शाळेत कार्यरत आहेत.

लहानपणी त्यांना बेलसरे नावाचे शिक्षक होते. ते मराठी भाषा शिकवताना खूप तल्लीन होऊन शिकवायचे. सगळा प्रसंग मुलांच्या डोळ्यासमोर उभा राहायचा. एकदा त्यांनी कवी माधव ज्युलियन यांची आई कविता शिकवली तेंव्हा अख्खा वर्ग रडला. इतके सामर्थ्य त्यांच्या वाणीत होते. त्यांच्या मुळे रेवती यांना भाषेची आवड निर्माण झाली आणि त्यांनीही बेलसरे सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षक व्हावे असे ठरवले.

ज्या विद्यार्थ्यांना शिकवणे कठीण वाटते अशा मुलांना त्या इंग्रजीतून, हिंदी भाषेतून समजावतात असे केले असता त्यांच्या लक्षात येते. त्यावर काही activity घेतली तर त्यांना आवड निर्माण होते. असे त्यांना वाटते. विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापन यात जास्तीत जास्त सहभागी करून त्यांना त्या प्रेरित करतात.

मुलांना वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी करून घेऊन त्या star 🌟 देतात.class work मध्येही remarks देतात. स्कूल assembly मध्ये मुलांना सहभागी करून घेरतात ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. रेवती मॅडम याना पालकांशी संवाद करायला आवडते. गेले तीन वर्षे त्या class teacher आहेत .
वर्गात ppt presentation व YouTube video यांचा हि त्या मुलांना शिकवण्याकरिता वापर करतात. त्यांची शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी achievement म्हणजे 100 पैकी 100 marks माझ्या मराठी विषयात मुलांनी संपादन केले

Scroll to Top