“एक पुस्तक, एक पेन, एक मुल आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकते.”
आज आपण श्री. सागर बाळासाहेब वाघ (M.A., D.T.ed ) यांचा शिक्षक प्रवासाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. शिक्षक सागर हे मु. पो. बऱ्हाणपूर, बारामती, पुणे इथे राहत असून गेली 9 वर्ष शिक्षक क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सागर शारदाबाई पवार विद्यानिकेतन डे स्कूल, शारदानगर, माळेगाव, बारामती, पुणे येथे शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.
सागर यांचा मोठा भाऊ शिक्षक होता त्यामुळे त्यांच्या सनिध्यात राहत सागर यांना ही शिक्षक व्हावेसे वाटले, त्याचबरोबर एक चांगलं करिअर करता येईल आणि शिकवण्याची आवड असल्याने त्यांनी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.
सागर यांनी शिक्षण होण्याचा निर्णय घेतला त्या वेळी शिक्षण क्षेत्र निवडताना त्याकाळी खूप उमेदवार होते त्यामुळे कॉम्पिटिशन ही तेवढच होत.
शिक्षक म्हणून सागर यांना 9 वर्षात खूप चांगले अनुभव आले. सागर यांच्या शिक्षक म्हणून प्रवासाची सुरुवात मुळशी तालुक्यातील कुळे गावातील साधना इंग्लिश मीडियम स्कूलपासून झाली जिथे त्यांनी एक वर्ष काम केलं. त्यानंतर नाणीज रत्नागिरी या ठिकाणी चार वर्ष पर्यंत खूप उत्तम अशा पद्धतीने कामाचा अनुभव घेतला त्यानंतर बारामती जवळ असलेल्या शारदानगर या ठिकाणी शाळेमध्ये ते रुजू झाले आणि आता याच शाळेमध्ये कार्यरत आहे.
शिक्षक सागर यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थी आतापर्यंत शिकून गेलेले आहे. त्यातील काही विद्यार्थी इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली आहेत.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांच्यासाठी काय सल्ला दयाल असे विचारले असता ‘तुमच्या मनात असेल तरच शिक्षण व शिक्षक म्हणजे तुम्हाला मुलांमध्ये एकत्रित होणे एकरुप होण्याची तुमच्या भावना असावी’ असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेचन मुलांमध्ये मिसळल्यानंतर सर्व प्रकारचा ताण-तणाव हा आपण आपोआपच विसरून जातो असे ही त्यांनी सांगितले.