[vc_section full_width=”stretch_row_content” content_placement=”middle” parallax=”content-moving” parallax_image=”5301″ parallax_speed_bg=”2″ el_class=”bt-ss-development-alnor” css=”.vc_custom_1608130365357{background-image: url(https://srdalvifoundation.com/wp-content/uploads/2020/12/Teacher-Assembly-bg-dark.jpg?id=5301) !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space height=”64px”][vc_custom_heading text=”Tr. Sandhya Bhosale ” font_container=”tag:h1|font_size:34px|text_align:center|color:%23f9f9f9|line_height:58px” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:700%20bold%20regular%3A700%3Anormal” css=”.vc_custom_1660825473656{margin-top: 0px !important;}” el_class=”bt-title03-alnor”][vc_empty_space height=”64px”][/vc_column][/vc_row][/vc_section][vc_section full_width=”stretch_row_content” css=”.vc_custom_1607838179037{padding-right: 100px !important;padding-left: 100px !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/4″][vc_single_image image=”9719″ img_size=”large” alignment=”right” style=”vc_box_rounded” css_animation=”fadeInDown”][/vc_column][vc_column width=”3/4″][vc_custom_heading text=”Tr. Sandhya Bhosale ” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:400%20regular%3A400%3Anormal” css_animation=”fadeInLeft”][vc_column_text css_animation=”fadeInLeft”]आज आपण शिक्षिका सौ संध्या संतोष भोसले (बी.ए डी.एड) यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका सौ. संध्या या मु. पो.खोपी, ता.खेड,जि. रत्नागिरी येथील रहिवासी असून सध्या नोकरीनिमित्त मु.पो. भरणे, ता. खेड जिल्हा रत्नागिरी येथे वास्तव्यास आहे. दिनांक 19/06/2001 पासून आज पर्यंत सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित श्री शिवशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुळवंडी तालुका खेड या विद्यालयांमध्ये सलग 23 वर्षे त्या कार्यरत आहेत.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
आत्ताच्या शिक्षण पद्धतीत व मी शिक्षण घेतले तेव्हाच्या शिक्षण पद्धतीत खूप बदल जाणवतो. सध्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये, शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक मुलांना घडवीत असताना त्याच्या पुढील उज्वल भवितव्यासाठी खूप काही अनेक आदर्श व्यक्तींची उदाहरणे देऊन मार्गदर्शन करीत असतो .शाळांमध्ये अनेक व्यावसायिक मार्गदर्शन आयोजित केली जातात .त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी हे आपला जीवन मार्ग निश्चित करू शकतात. मात्र माझ्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी पर्यंतच्या शिक्षणामध्ये असे मार्गदर्शन कोठे लाभल्यासारखे जाणवत नाही मला शिक्षकी पेशामध्ये खरे तर मार्ग दाखविणारी माझा पहिला गुरु म्हणजे आई आणि आईने(सौ अनिता अनंत सुर्वे) तिच्या इच्छेमुळे हा मार्ग निवडण्याची प्रेरणा दिली. डी.एड ऍडमिशन मिळण्याच्या प्रक्रियेपासून ते डीएड कालावधी पूर्ण होईपर्यंतच्या प्रवासामध्ये मला माझे आई-वडील मार्गदर्शक व प्रेरणा देणारे ठरले ज्या ज्या वेळेस डीएड कालावधीमध्ये माझे सेतू पाठ असो किंवा पाक्षिक असो त्यावेळेस माझे गुण हेरणारे माझे प्राध्यापक श्री विनोद फणसे सर व सौ आशा देशपांडे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यांनी दिलेल्या वेळोवेळी शाबासकीमुळे मला शिक्षकी पेशामध्ये मी काय करू शकेन याची चाहूल लागली व मी माझ्यातील गुण ओळखून जेव्हा श्री शिवशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुळवंडी येथे 1999 रोजी इयत्ता पाचवी वर्गासाठी नियुक्ती झाल्यावर विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडताना काहीच वाटले नाही मात्र डी एड ऍडमिशन मिळवते वेळी खूप अटीतटीचा प्रसंग वाटला. खरे तर अंदाजे 1998 पर्यंत कोकण निवड मंडळामार्फत डी.एड भरती सहज होत होती. माझे तर डी.एड 1995 ते 1997 या कालावधीत झाले त्यामुळे तेव्हाची नोकरीची परिस्थिती पाहता डीएड झाले म्हणजे सहज नोकरी मिळणार हा साधा अर्थ तेव्हा होता .आईची ईच्छा पूर्ण करायची व उत्तम शिक्षिका होऊन आईला दाखवायचे हा मात्र एक मी मनोमन तेव्हा ध्यास घेतला होता .तेव्हा तर बहुतांश मुले डी.एड प्रशिक्षणाकडेच वळताना दिसत होती त्यामुळे डी.एड प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळणे कठीण होते आणि प्रवेश मिळवताना मला खूप वेगळा व आनंद देणारा अनुभव मिळाला. माझे डी.एड प्रवेशासाठी त्यावेळी रत्नागिरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू होती .अर्ज सादर केल्यानंतर प्रवेश यादीमध्ये नावही आले .मात्र प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव पुकारले जाईल त्यांचे कागदपत्र सादर करून घेतले जातील असे सांगण्यात आले .प्रवेश प्रक्रियेच्या निवड करण्याच्या दिवशी मी व माझे वडील श्री अनंत अमृतराव सुर्वे दोघेही आम्ही सकाळीच रत्नागिर स्थळी पोहोचलो. प्रत्येक फेरी झाल्यावर किती जागा रिक्त आहेत याचे जाहीर केले जात होते. सायंकाळी सव्वा सहा वाजले तरी माझे नाव पुकारण्यात आले नाही .मी व माझे वडील निराश होत होतो .प्रवेश नाही मिळणार हे दुःख मनी सलत होते. मात्र माझ्या आईची प्रबळ ईच्छाच मी म्हणेन म्हणून शेवटी एक जागा शिल्लक आहे असे सांगण्यात आले व त्यांनी माझे नाव पुकारले. तेव्हा नाव ऐकून मला व वडील यांना खूप आनंद झाला. शिक्षक हे क्षेत्र निवडताना अडचण आली नसून शिक्षकी पेशासाठी आवश्यक असणाऱ्या डी.एड प्रशिक्षणाची निवड प्रक्रिया अटीतटीची वाटली व ती आजही स्मरणात राहिली.
शिक्षक म्हणून 23 वर्षाच्या प्रवासातील एखादा अनुभव जो अविसमरणीय आहे-
माझी नोकरीची सुरुवात श्री शिवशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुळवंडी तालुका खेड या विद्यालयामध्ये सन 1999 पासून झाली. (approval 19/06/2001 चे आहे)सन 1999 पासून सेवा सुरू करताना मला या विद्यालयामध्ये पहिले मार्गदर्शक व प्रेरणा देणारे मुख्याध्यापक लाभले ते म्हणजे श्री जे. व्ही. कांबळे सर यांनी माझ्यातील गुण ओळखून त्या त्या कामाची जबाबदारी टाकली इतकेच नव्हे तर सूत्रसंचालन करण्याचा गुण हेरून ती संधी मला उपलब्ध करून दिली. त्यानंतर श्री निर्मळ ए आर या मुख्याध्यापकांनी तर मला जास्त कार्यशील कसे राहायचे व शाळा हेच आपले कुटुंब ही भावना वाढीस लावली .त्यानंतर श्री पाटील पी.डी., श्री मुळीक जी .के., श्री वरेकर सर ,श्री मगदुम सर,श्री.मोरे एस.के.यांच्या कारकिर्दीत तर माझे कार्य शैक्षणिक भरिव होण्यास मदत झाली .माझ्या अंगी कॉम्प्युटर टायपिंग व सर्व ज्ञान असल्याने बहुतांशी काम हे मी करत असल्यामुळे प्रत्येक मुख्याध्यापकांना माझे वेळोवेळी सहकार्य ही लाभले .माझा विद्यार्थी हा चांगलाच घडला पाहिजे माझी शाळा ही दर्जेदार झालीच पाहिजे या दृष्टीने मी नेहमी जबाबदारी पूर्वक वागते. विद्यार्थी घडवण्यामागे शिक्षकांबरोबरच पालक ही खूप महत्त्वाचा म्हणूनच पालकांशी ही नाते माझे सर्व सहृदयाचे ,म्हणूनच मला माझ्या कामाच्या यशस्वीतेबद्दल आलेले दोन अनुभव अविस्मरणीय ठरले 1) डॉक्टर दिलीप देशमुख यांचे कडून शाळेत एक सावित्री म्हणून माझा झालेला नामोल्लेख व सन्मान सन 2016 -17 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर दिलीप देशमुख यांचे मार्गदर्शन विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्याच दिवशी ISO 9001:2015 मानांकन प्राप्त प्रदान सोहळा होता. मान्यवरांची उपस्थिती होती. सर्व कार्यक्रमाची तयारी, माझे फलक लेखन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाहता कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर दिलीप देशमुख सर यांनी मला कार्यक्रमाचा शेवट करताना थांबविले व मुलांना सांगितले की मॅडम या तुमच्या शाळेत तुमची एक सावित्री आहेत व स्वतःची शाल व श्रीफळ मला देऊन सन्मानित केले खरोखरच हा दिवस माझ्यासाठी आजही अविस्मरणीय ठरला आहे . 2)रौप्यमहोत्सवी कार्यक्रमांमध्ये कुळवंडी गावाकडून सन्मान – सन २०१७-१८ हे आमच्या शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष .कार्यक्रम दिमाखदार व डौलदारपणे साजरा झाला. त्यावेळी ही कार्यक्रमाच्या पूर्वतयारी पासून ते कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याबरोबर तळमळीने काम केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशस्वी करून कौतुकाची थाप घेतलीच शिवाय गावचे पोलीस पाटील श्री अशोक निकम यांनी जाहीर केले की आज आम्ही सर्वांनी मॅडमचे आजपर्यंतचे काम पाहिले म्हणूनच संपूर्ण कुळवंडी ग्रामस्थांच्या वतीने कै. लक्ष्मण निकम व उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान केला आणि अभिमानपूर्वक सांगू इच्छिते की हा आयुष्यातील कामाची पोहोचपावती बद्दल आनंदाचा क्षण सन्मान सोहळा पाहायला माझी आई ही हजर होती. आजपर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाला बाहेरून आलेले प्रमुख अतिथी व मान्यवरांनी सूत्रसंचलन उत्कृष्ट म्हणून थोपटलेली पाठ ही अविस्मरणीय ठरेल.
तुमची आत्तापर्यंतची मोठीं Achievement कोणती?
शिक्षकी पेशा म्हणजे इतर पेशापेक्षा एक मानसिक सुखद आनंद देणारा पेशा. आज अभिमान वाटतो की हा पेशा मी स्वीकारला व मला जी विद्यार्थी रुपी संपत्ती भेटली ती लाख मोलाची ठरली .अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी व शिक्षक यामध्ये जवळीक असणे ,एक घट्ट नाते असणे खूप आवश्यक वाटते. शाळेतले प्रत्येक मूल हे माझेच मुल आहे ही भावना असणे श्रेष्ठ वाटते. माझे तर शाळेत शिक्षिके पेक्षा आई व मूल असे घट्ट नाते निर्माण झालेआहे .ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड कमी वाटते ,जे विद्यार्थी अभ्यासात मागे पडल्यासारखे वाटतात त्यांना मायेचा हात फिरवून आधी आपलेपणाचे नाते तयार करते त्यानंतर सोप्या सोप्या गोष्टी सांगून एक एक घटक समजावण्याचा प्रयत्न करते .माझे अध्यापनाचे इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत सध्या मराठी व कला हे विषय आहेत तर सेमी इंग्रजीत मधील इयत्ता पाचवीचा गणित हा विषय आहे .मात्र पूर्वी इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गांचे गणित हा विषय माझ्याकडे होता. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना मी गणित शिकविले त्यांचा अनुभव हल्ली ऐकायला मिळाला. कुळवंडी तांबरी येथील कुमार संकेश निकम या विद्यार्थ्याने व्हाट्सअप मेसेज वर मला हल्लीच मेसेज टाकला की मॅडम तेव्हाचे तुम्ही शिकवलेले गणित इतके परफेक्ट होते की त्याचा उपयोग आम्हाला आता होत आहे ही वाक्यता माझ्या अध्यापनाची यशस्विता म्हणेन. तसेच कोरोना ही जागतिक महामारी आली ,पण माझ्यासाठी एक संधी घेऊन आली .कोरोना आला आणि शाळा बंद झाल्या. मात्र शिक्षण चालू राहिले पाहिजे, ऑनलाइन तास गावात असणाऱ्या नेटवर्क अडचणीमुळे मला ते प्रभावी वाटले नाही .म्हणून विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाता कामा नये हे मनाशी पक्के ठरवले व शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करायचे ठरविले .त्यासाठी व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी खूप कष्टही घेतले .प्रत्येक शैक्षणिक व्हिडिओ हा दर्जेदार झालाच पाहिजे या हेतूने खूप कष्ट मेहनत घेऊन सन 2019 पासून ते आज पर्यंत मी जवळजवळ 35 शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केली. माझे युट्युब वरती संध्या संतोष भोसले या नावाने आजही चैनल ही आहे .मात्र मी केलेले शैक्षणिक व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिले आणि लोकांनी माझे व्हाट्सअप वरती मेसेज देऊन कौतुकही केलेच शिवाय माजी विद्यार्थ्यांचे फोन आले की मॅडम शैक्षणिक व्हिडिओ तयार केलेत की प्रथम आम्हालाही पाठवा ,आजही तुमच्या तासाला बसल्याचा आनंद आम्हाला व्हिडिओ रूपात घ्यायचा आहे ही माझ्या कार्यातील मोठी Achievement वाटते.
समाजात शिक्षक -विदयार्थी यांच्यासाठी अजुन काय बद्दल होण्याची गरज आहे असे वाटते?
शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी शिक्षक पालक अर्थात समाज यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक वाटते .पूर्वीचा समाज व आताचा बदलत्या काळानुसार बदल झालेला समाज यामध्ये कधीतरी तफावत आढळते .आत्ताचा विद्यार्थी हा शिक्षकांजवळ मनमोकळेपणाने मते व्यक्त करणारा आहेच पण त्याचबरोबर पालक अर्थात समाज हा अनेक चांगल्या अपेक्षा करणारा, विद्यार्थी गुणात्मक बदल अपेक्षित करणारा असला पाहिजे. काही पालक हे आमच्या काळात असे नव्हते, ही कसली शिक्षण पद्धत असेही म्हणणारे आहेत .माझ्या मते आत्ताची बदललेली शिक्षण पद्धत ,सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन पद्धत ,कृतीपत्रिका यांची माहिती पालकांनीही करून घेणे आवश्यक वाटते . समाजामध्ये जर एखादा विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या शिक्षण घेण्यामध्ये मागे पडत असेल तर त्याला आर्थिक ,मानसिक ,शैक्षणिक आधार देऊन शिक्षण प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शाळाबाह्य मुले राहणार नाहीत याकडेही कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. शिक्षकांना सामाजिक दृष्ट्या सर्वोच्च स्थान मिळणे आवश्यक वाटते .काही ठिकाणी शिक्षक म्हणजे एवढा पगार हेच मूल्यमापन होताना दिसते पण शिक्षक एक पिढी घडविण्याचे उज्वल कार्य करीत आहे हे मान्य करणे ही आवश्यक वाटते .एखाद्या विद्यार्थ्याने चांगले यश मिळवले तर त्याचे कौतुक करण्याची मोठी जबाबदारी प्रत्येक गावातील समाजाने केली तर त्या विद्यार्थ्याला पुढील आयुष्यात भरारी घेण्यासाठी बळ मिळण्यास नक्कीच मदत होईल. एकंदरीत समाज हा ही विद्यार्थी प्रिय असणे एक शैक्षणिक क्रांती घडविणारा असावा असे वाटते.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
शिक्षकी पेशा हा एक पवित्र असा पेशा आहे .एक आदर्श पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे ,म्हणून मला सांगावेसे वाटते की प्रथम स्वतःच्या ईच्छेने स्वीकारलेला हा पेशा असावा .स्वईच्छेची निवड महान कार्य घडवू शकते. शिक्षकी पेक्षा स्वीकारताना स्वतःमध्ये ज्ञानरचनावाद, नवनवीन तंत्रज्ञान घेण्याची आस असलेला असावा. विद्यार्थी हीच माझी संपत्ती हा ध्यास उराशी बाळगून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा, प्रयत्नशील असावा .विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीपूर्ण सलोख्याचे नातेसंबंध निर्माण करणारा त्याचबरोबर आदरयुक्त भीती, शिस्त निर्माण करणारा असावा .आजचा विद्यार्थी हा मुळातच हुशार अनेक गोष्टींचे ज्ञान असणारा जाणवतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढे एक पाऊल असणारा परिपूर्ण शिक्षक असावा .विद्यार्थी घडविताना सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळे मार्गदर्शन करणारा असावा .शिक्षकांचे वक्तृत्व संभाषण कौशल्य हे व्यवस्थित असलेले पाहिजे. एखाद्या पालकाला एखादी गोष्ट समजावून सांगण्याचे कौशल्य असावे .आजचा शिक्षक हा शाळा वाचविणारा, विद्यार्थी संख्या वाढविणारा असावा .माझी शाळा हेच माझे कुटुंब ही भावना असणे आवश्यक वाटते .आजचा शिक्षक नवनवीन आव्हाने स्वीकारणारा व पेलवणारा असावा .शिक्षकच एक विद्यार्थी रुपी मूर्ती घडवून आदर्श समाज घडवीत असतो त्यामुळे आपली जबाबदारी ,आपले उद्दिष्ट आपले हाती घेतलेले कार्य याची जाणीव असलेला असणे आवश्यक वाटते.[/vc_column_text][/vc_column][/vc_row][/vc_section]