‘शिक्षक’ क्षेत्र निवडताना काही अडचणी:
शिक्षिका सौ.संध्या यांना शिक्षिका होताना अडचण अशी आली नाही. त्यांना मुळात शिक्षक या क्षेत्राची लहानपणापासूनच आवड होती. त्यामुळे अगदी त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांनी संधीचे सोने करता आले.
आतापर्यंतचा अविस्मरणीय क्षण / प्रसंग:
शिक्षक क्षेत्रात गेली १८ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना,याच कार्याची दाद म्हणून शिक्षिका संध्या यांना सन सप्टेंबर २०१९ साली “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार”अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन कोल्हापूर,महाराष्ट्र राज्य,भारत यांच्यामार्फत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा क्षण संध्या यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे:
शिक्षिका संध्या यांनी सन २००४ मध्ये नोकरीला सुरुवात केली. त्यावेळी खूप प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात होते. हे प्रशिक्षण वर्ग समोरासमोर एकत्र बसून असल्यामुळे शंका निरसन होण्यास वेळ लागत नव्हता. परंतु सध्याच्या आँनलाईन प्रणालीमुळे मुले कुठेतरी भटकत असल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु अलीकडे विचार केला तर सुशिक्षित बेरोजगारी भयंकर वाढलेली दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व व्यावसायिक ज्ञान देणे खूप गरजेचे आहे असे संध्या यांना वाटते. प्रत्येक बाबतीत स्पर्धा असली तरच आजचा विद्यार्थी आपल्याला कुठेतरी आकाशात उत्तुंग भरारी घेताना दिसेल. असे ही मत त्यांनी केले.
‘शिक्षक’ होण्याची इच्छा असणाऱ्यांना सल्ला:
“शिक्षक म्हणजे ज्ञानाचा महासागर” असे म्हटले जाते. यासाठी शिक्षक हा सर्वगुणसंपन्न,अष्टपैलू, कोणत्याही परिस्थितीवर मात करणारा असावा. प्रवाहाबरोबर प्रवाही असून समाजाला सकारात्मक बदलाकडे नेणारा असावा हे सर्व गुण त्याने आपल्या अंगी बाणवावे.तसेच त्या प्रमाणे आचरणात आणावेत विद्यार्थ्यांना तो आदर्श असावा व आपल्या आचरणातून त्याने विद्यार्थ्यासमोर आदर्श प्रस्थापित करावा. हा सल्ला शिक्षिका सौ. संध्या शेळके यांनी शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांना दिला.