नमस्कार मी श्री. संजय विष्णु जाधव (M. A.B. Ed.) खातिवली, तालुक शहापूर, जिल्हा-ठाणे. मी गेल्या २२ वर्षापासून मी शिक्षक या क्षेत्रात कार्यरत असून, मो. कृ. नाखवा हायस्कुल ठाणे येथे 14 वर्ष सेवा केली आणि 2014 पासून नूतन ज्ञानमंदिर कल्याण पूर्व याशाळेत शिक्षक म्हणून काम करत आहे.
शिक्षक का कधी व्हावेसे वाटले?
शिक्षकच व्हायचं हे मी खूप पूर्वी पासूनच ठरवलं होत. माझे वडील मुख्याध्यापक होते. त्यामुळे माझ्यात या क्षेत्राची आवड निर्माण झाली होती. त्यामुळे शिक्षण पर्ण करून शिक्षकच व्हायचे माझे स्वप्न होते आणि ते सत्यात उतरवलं.
शिक्षक क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
प्रत्येक व्यवसायात थोड्याफार प्रमाणात स्ट्रगल हे असतचं. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मला लगेचच मोठ्या पगाराची नोकरी लागली असे काही झाले नाही. सुरुवातीला 4 वर्ष मी संस्था पातळीवर काम केले तेव्हा मला केवळ १००० रुपये एवढे मानधन मिळत होते.
शिक्षण क्षेत्रात आतापर्यंत चा अविस्मरणीय क्षण कोणता?
– 2002 ला माझ्या वर्गातील विध्यार्थी मुंबई विभागात बोर्डात प्रथम आला होता. समीर सतीश तळवडेकर असे त्याचे नाव आहे आणि त्याला 94.60% मिळाले होते हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण होता. समीरने पुढचे शिक्षण घेतले आणि तो सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला त्याने त्याचा पहिला पगार शाळेला भेट म्हणून दिला होता.
– सध्या माझा एक विद्यार्थी नागपूरला MBBS करतोय. आणि मला आजही तो न चुकता गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनाला फोन करतो.
– श्री स्वामी समर्थ या मालिकेत माझी विद्यार्थिनी कु. मानसी मुरुडकर काम करतेय.
– तसेच गेली 4 वर्ष मी शिकवत असलेल्या वर्गाचा आणि शाळचा निकाल १००% लागतो.
समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे असे वाटते?
मला वाटतं विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये पूर्वीसारखा संवाद राहिला नाही. पण हे बरंचस आपल्या म्हणजेच शिक्षकांच्या वर्तणुकीवर अवलंबून असतं. तुम्ही कसं मनापासून देता त्यानुसर विद्यार्थी आपल्याशी वागतात. काळानुसार तंत्रस्नेही बनणे ही शिक्षकाची आजची गरज आहे अस मला वाटते.
ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा आहे त्यांना काय सल्ला दयाल?
या क्षेत्रात नवीन येणाऱ्यांनी जर मनापासून आवड असेल अन विषयातील आद्ययावत ज्ञान असेल. काही तरी समाज्याच ऋण द्यायचंअसेल तरच या व्यवसायात यावं. कारण आपला आदर्श मुलं घेत असतात. अजूनही मुलं शिक्षकांनोच ऐकतात. तुम्ही जे पेराल तसं उगवत. संस्कृती संवर्धन, हे आपल्या कृतीतूनच होत. आदर्श इकडे तिकडे न शोधता आपल्यातील, समाजातील आदर्शाचे दर्शन घडवावे.
मातृदेव भव! पितृदेव भव! आचार्य देव भव! अतिथी देव भव!
माझी शाळा आहे, अन मी शाळेचा ही भावना मनात जोपासुया…
पैसा, सत्ता, यांना जीवनात महत्व देऊ नका. निरपेक्ष भावनेने काम करा यश तुमच्या दिशेने येणारच.
कर्मभूमी , जन्मभूमी यांच्या ऋणात राहूया.