आज आपण श्री.संतोष मारुती रावण (B.Sc.D.Ed.B.A.B.Ed.) यांच्या शिक्षक होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री. संतोष हे गेली २० वर्ष शिक्षक या क्षेत्रात कार्यरत असून सध्या ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलसावंतवाडी या निसर्गरम्य व शांत,शिस्तप्रिय ठिकाणी शिक्षक म्हणून सन्मानाने वसन्मानाचे कार्य करत आहेत.१२ वीसायन्समध्ये चांगले मार्क मिळाल्यानंतर संतोष यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेहोते. शिवाय काही काळ ते M.P.S.C.विद्यार्थ्यांसोबत होते त्यामुळे वर्ग१,२ अधिकारी व्हावे असेही त्यांना वाटायचे.पण निवड प्रक्रियेतीलबदल,खेड्यातील मुलांमधील न्यूनगंड,त्यावेळी असणारे अपुरे मार्गदर्शन यामुळेनियोजित ठिकाण चुकले.शिक्षक होणे याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.त्यांचे भाऊजी व मोठी बहिण हे अनुक्रमे प्राध्यापक,हायस्कूल शिक्षक म्हणून कार्यरतहोते.त्यांनी त्यांचा सर्वांगानी विचार करून डी.एड. करण्याचा सल्ला दिला आणि तेव्हाथोड्याशा नाराजीनेच हा मार्ग त्यांनी स्वीकारला.
‘शिक्षक हे क्षेत्र निवडताना अडचणी:
श्री संतोष यांना १० वी. 12वी च्या उत्तम मार्क्समुळे डी.एड.प्रवेश अगदी सहज झाला.पदवी नंतरडी.एड.असा उलटसुलट ,मनाला न पटणारा प्रवास करत डी.एड.कोर्स त्यांनी अगदी सहज पूर्ण केला.आणि शेवटचापेपर दिल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच वृत्तपत्रातील जाहिराती व छोट्या जाहिरातीच्यामुलाखतीला त्यांनी सुरुवात केली. नोकरीमधील मोफत शिष्यवृत्तीमार्गदर्शन,४०० रु.पगाराची नोकरी ते खाजगी शिकवण्या,स्वतःचा क्लास विनाअनुदानित,अनुदानित नावाजलेल्या शाळा अशा प्रत्येक ठिकाणी त्यांची निवड होत गेली.तेव्हा त्यांना माझ्याबायोडाटा मधील B.Sc.D.Ed. चेमहत्त्व समजत गेले.१९९९ ते २००२ हा एकहीदिवस बेरोजगार न राहता सुरुवातीपासूनच ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. शेवटी २००२ साली जि.प.सिंधुदुर्गच्या शिक्षण सेवक पदी ते रुजू झाले.
अविस्मरणीय प्रसंग/क्षण:
संतोष यांच्या शिक्षक म्हणून 20 वर्षाच्या कालावधीत मनाला भावूनगेलेले व लक्षात रहाण्यासारखे अनेक प्रसंगआले. यापैकी पारपोली शाळेतील ग्रामस्थ व सहकार्यांनी केलेला निरोपसमारंभ हा त्यांचीसाठी फार महत्वाचा प्रसंग आहे. १५ ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा व त्यांच्या सर्व कुटुंबियांचा उपस्थितीत हा सोहळा घडवून आला होता.या कार्यक्रमात त्यांच्या वडिलांनी ‘माझ्या मुलाचा मला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार काढले होते.
‘फुलपाखराचा ‘गाव म्हणून नावलौकिकअसणाऱ्या या गावात भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान,झाराप –कुडाळ (अध्यक्ष:आदरणीय डॉ.प्रसाद देवधर)यांच्या सहाय्याने व अनमोल मार्गदर्शनाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमराबवले.कोणाकडेही हात न पसरता सहा वर्षात१२ लाख रु. शै.उठाव निर्माण करतानागावातील गरीब ते श्रीमंत यांचा १ रु.देखील स्वीकारला व जपून वापरला.त्यातून जि.प.शाळेत पोषण आहार BIOGAS वर शिजवणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा म्हणूनसह्याद्री वाहिनीने दखल घ्रेतली.
मुलीना सायकलप्रशिक्षण,संगीत क्लास,फिरते वाचनालय,आदर्श बाग,गांडूळ खत निर्मिती,शेतकरीप्रशिक्षण व प्रयोग मार्गदर्शन,महिला शिवण मशीन व प्रशिक्षण असे विविध काम शालेयवेळेच्या बाहेर अहोरात्र केले.
शाळा हाच प्रपंच हा विचार संतोष यांच्या मनात राहिला.याला सहकारीशिक्षकांनी मोलाची साथ दिली.हे सर्व प्रसंग त्यांच्यासाठी अविस्मरणीय प्रसंगात येतात.
अचीवमेंट्स:
संतोष यांच्यासाठी शाळेवर राबवलेल्या प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे यश ही अचीवमेंट आहे. तरीही ०९/०९/२००९ रोजी पेटलेली BIOGAS ची ‘क्रांतीची निळी ज्योत’पासूनविध्यार्थ्यानी विविध क्षेत्रात मारलेली भरारी ,केसरी गावात केलेली 3D शाळा(७लाख रु.बाजारमूल्य-केवळ २ लाख रु. मध्ये.पूर्ण केले.)या सर्वकार्याचा गौरव म्हणून कोणताही प्रस्ताव न सादर करता किंबहुना त्यांनी कोणत्याहीप्रकारचा संपर्क स्वतः न करता ‘जन सेवा निधी बांदा’ २०१७ (डॉ.खानोलकर) या संस्थेनेउपक्रमशील शिक्षक(जि.प.) म्हणून दिग्गज सामाजिक कार्य असणाऱ्या लोकांच्या पंक्तीतनेऊन बसवले.ही त्यांच्यासाठी मोठी अचीवमेंट आहे.
शिक्षक व विदयार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज:
शिक्षकव विद्यार्थी यांनी नेहमीच अध्ययावत (UPDATE)रहावे.तसेच प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन,समस्या उकल व उपाययोजना ,गरीबातील गुणवत्तेला शोधून संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.आणि जीवनावश्यक कौशल्य विकसितशिक्षण आवश्यक आहे असे शिक्षक संतोष यांना वाटते.
‘शिक्षक’ होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सल्ला:
हुशार व प्रयोगशील व्यक्तींनी ‘शिक्षक’च व्हावे असे संतोष यांना वाटते. (यात अंगणवाडी तेमहाविद्यालयीन व सर्व प्रकारचे) कारण प्रत्येक विदयार्थी हे ‘स्वतंत्र पुस्तक’म्हणून Research करण्याची बाब आहे. या क्षेत्रात नानाविध प्रयोग करण्यात येतात .शिवाय संपूर्ण संरक्षणआयुष्यभरासाठी आहे.समाधान आहे,मानसन्मान आहे. चौफेर व क्षितिजा पलीकडे जाता येईलइतका आवाका आहे .म्हणून मनापासून या पवित्र कार्यात ,सुसंस्कारित वातावरणात सहभागी व्हा.असा सल्ला शिक्षक संतोष यांनी शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांना दिला.