S R Dalvi (I) Foundation

Tr. Sarika Patil

Tr. Sarika Patil

“शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही, आणि गुरूचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही.”

 

आज आपण सारिका बाळकृष्ण पाटील  (B.A. in English & History).M.A.( English , History).M A. ( Education(A)). D.S.M.,D.Ed.,B.Ed.) यांच्या शिक्षिका प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सौ सारिका या पनवेल येथे राहत असून गेले 20 वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांची Ph.D. प्रवेश प्रक्रिया मध्ये इंग्रजी विषयासाठी निवड झाली आहे. सध्या त्या रायगड जिल्हा परिषद शाळा करवलीवाडी, ता.पनवेल.रायगड येथे कार्यरत आहेत.
या ठिकाणी माझ्याकडे 1ली ते 5वी चे वर्ग आहेत. पटसंख्या 17आहे. सध्या या वर्गांचे अध्यापन व मुख्याध्यापक( शाळाप्रमुख)  काम करत आहेत.
शिक्षिका सारिका यांचे आई आणि वडील या दोघांनीही शिक्षक म्हणून काम केले आहे. ते सेवेत असताना सौ सारिका आणि त्यांच्या भावंडाना कधी ही ते बोर्डाच्या पेपरलाही रजा टाकून सोबत गेले नाहीत. त्यांचे पालक त्यांना म्हणायचे की, ‘शाळेत आमची 40 मुले वाट बघतात आणि आम्ही एका मुलासाठी घरी का राहू?’ त्यांची ही पिढी घडविण्याच्या वारसाची जाणीव पुढे चालू राहावी म्हणून सौ सारिका यांनीच हा वसा घेवून तो पुढे चालवत आहे.
‘शिक्षक’ क्षेत्र निवडताना अडचणी – 
शिक्षिका सारिका यांना लहानपापासून डॉक्टर व्हायची इच्छा, मात्र आई वडिलांचा वारसा चालविण्यासाठी त्यांनी या क्षेत्राची निवड केली. सुरुवातीला आल्यावर थोडेसे वाईट वाटले होते.  मात्र आता नक्कीच हे कार्य आवडीने करत आहेत.
अविस्मरणीय अनुभव: 
शिक्षिका सरिका सुकापुर शाळेत 2007 साली कार्यरत असताना शाळेच्या बाजूच्या इमारतीचे काम चालू होते. एक दिवशी पाच साडे पाच वर्षाची मुलगी रेतीच्या ढीगाऱ्यावर खेळत होती.चौकशी केल्यावर समजले की ती तेथे काम करणाऱ्या मजुराची मुलगी आहे.आई वडील दोघेही मजुरीला आल्याने मुलीला तिथे आणले होते. सारिका यांनी त्या मुलीला शाळेत टाका असे तिच्या आईवडिलांना सांगितले. तर त्यांनी “पैसे नाहीत तेवढे आणि आम्ही काम झाले की वर्षभरात दुसरीकडे जाणार असल्याचे त्यांना सांगितले. सरकारी शाळेत टाका दुसरीकडे जायच्या वेळेस दाखला मिळेल असा सल्ला सारिका यांनी दिल्यावर, वह्या पुस्तके,दप्तर आदी गोष्टी साठी पैसे नाहीत असे त्यांनी सांगितले.  त्यावर बऱ्याच गोष्टी सरकार,शाळा देते आणि वह्या आदींसाठी मी करेल खर्च.तुम्हाला काही खर्च पडणार नाही असे सारिका यांनी सांगताच ती मुलगी आणि तिचे पालक दोघे ही आनंदी झाले. आणि दुसऱ्या दिवसापासून शाळेत ती मुलगी शाळेत हजर झाली. ती मुलगी अभ्यासात आणि त्यातल्या त्यात इंग्रजी विषयात अग्रेसर असायची. त्यानंतर ती सहावीला असताना माझी बदली खारघर शाळेत झाली. पण 8 वी ते 10 पर्यंत माध्यमिक शाळेतही तिची प्रगती पाहून ‘तुझ्या शिक्षिका कोण होत्या ‘ असे विचारतात असे ती मुलगी  सारिका यांना सांगायची.अजूनही ती कॉलवर,भेटल्यावर इंग्लिश मध्ये त्यांच्याशी बोलते. आणि आजही फेवरेट, बेस्ट टीचर म्हणून शिक्षक दिनी ती भेट कार्ड घेवून त्यांना भेटते.
Achievement : 
खारघर शाळेत काम करत असताना नवोदय, व स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेणे हे ध्येय असते. सारिका या परीक्षेला बसलेल्यांना मार्गदर्शन करतात . 2012 च्या बॅच मध्ये पहिलीपासून ही तयारी चालू होती. 2016 च्या नवोदय परीक्षेत इयत्ता पाचवीच्या मी मार्गदर्शन केलेल्या 5 मुलांचे गुणवत्ता यादीत स्थान मिळविणे,हीत्यांच्यासाठी  खूप अचीवमेंट आहे. कारण यातील 2 मुलींची आई घरकाम करायच्या. अश्या मुली आज माणगाव येथे CBSE बोर्ड चे तेथे राहून शिक्षण घेत आहेत. त्यांना पाहिले की ह्या कोणत्या मोठ्या घरातील आहे असा आत्मविश्वास पाहून ,त्यांची ही अचीवमेंट   पाहून सारिका यांना खूप समाधानी वाटते. तसेच शाळेत कार्य करत असताना सारिका यांना International Award In Easy Writing ( 1st Rank) मिळाला आहे.
शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी काय बदल होण्याची गरज :
केवळ परीक्षेसाठी अभ्यास नको तर स्वतःच्या ज्ञान वाढीसाठी अध्ययन अध्यापन व्हावे,असे शिक्षिका सारिका यांना वाटते.
शिक्षक व्हायचे आहे त्यांना सल्ला: 
शिक्षक म्हणून आपण पिढ्या घडवत असतो,तेव्हा सेवा म्हणून हे कार्य करा.