S R Dalvi (I) Foundation

Tr. Saudagar Ferozali Yusufali

Tr. Saudagar Ferozali Yusufali

आज आपण शिक्षक सौदागर फेरोजअली युसूफअली (Bsc , B.ED) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षक सौदागर हे ता. गुहागर आबलोली येथे राहत असून त्यांना अध्यापनाचा एकूण 2४ वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पाचेरी या शाळेत कार्यरत आहेत.
१९९५ साली ग्रॅजुएशन पूर्ण झाल्यानंतर सौदागर सर पुणे रांजणगाव MIDC मध्ये एका नामांकित Pharmaceutical company मध्ये सुपरवायझर या पदावर कामावर रुजू झाले. तीन शिफ्ट मध्ये काम करताना त्यांना खूप त्रास व्हायचा, रोजची दिनचर्या पूर्णपणे दर आठवड्याला बदलायची त्यांची त्यामुळे झोप पूर्ण होत नसे. त्यांचे दोन बंधू सुद्धा मुंबईत कंपनीमध्येच नोकरी करत होते. सारण वाटलं अजून शिकावे आणि शिक्षक व्हावे म्हणून त्यांनी त्यांची सोडली व B.ed साठी मुंबई विद्यापीठात अर्ज केला व त्यांना प्रवेश मिळाला.
B.ed पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरीसाठी बऱ्याच अडचणी आल्या. मग त्यांनी खेड्याकडे जाण्याचा निर्णय घेतला व ते कोकणात आले व एका खेडेगावात त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली
खेड्यात काम करताना त्यांना मोठे यश मिळाले ते म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन त्यातून विद्यार्थ्यांना मिळालेले यश आणि शिष्यवृत्ती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गरीब विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षन घेत आहेत.
बदलत्या युगात आपण स्वतः बदलावे लागते तसेच संगणकाच्या युगात आपण संगणक साक्षर होऊनच मुलांच्या पुढे जावे हे त्यांना सर्व शिक्षकांना सांगावे वाटतं आहे