S R Dalvi (I) Foundation

Tr. Sharad Panchal

Tr. Sharad Panchal

‘समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही, तो आदर्श शिक्षकांमुळे होतो ‘
आज आपण शिक्षक श्री.शरद बाळकृष्ण पांचाळ यांच्या प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. शरद पांचाळ हे ता.राजापूर जि.रत्नागिरी इथले असून पदवीधर (बी.ए.बी.एड) शिक्षक आहेत. ते सध्या जि.प.शाळा सोल्ये ता.राजापूर येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असून गेले 27 वर्षे ते शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत.
शिक्षक होण्याचा निर्णय – 
शरद पांचाळ यांना खुप आधीपासूनच शिक्षकांबद्दल आदर वाटत आलेला आहे. एकदा त्यांना हायस्कूलमध्ये शिक्षकदिन साजरा करण्याच्या निमित्ताने शिक्षक होण्याची संधी मिळाली होती त्या प्रसंगामुळे आणि अर्थात  शिक्षकांच्या प्रेरणेने शिक्षक होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली. आणि तेव्हा त्यांनी पुढे शिकून शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.
या प्रवासात आलेली अडचण
शरद पांचाळ यांचे एस्.एस्.सी.पास होऊन डि.एड्.पूर्ण झाले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी त्यांना नोकरीचा कॉल आला. पहिली नोकरी असल्याने अर्थात त्यांचा आनंद गगनात मावेनसा झाला होता. मात्र त्यांची प्रथम नेमणूक दापोली तालुक्यातील फरारे मोरेवाडी येथे झाली . त्यासाठी त्याना दापोली तालुका ठिकाणाहून सुमारे35/40 कि.मी.एस्.टी.ने पार करून पुढे वाशिष्ठी नदीचे पात्र होडीने ओलांडून पुढे पाऊण तास चालत डोंगरमाथ्यावर असलेल्या गावात पोहचावे लागल होते. मात्र ते ही त्यांनी आनंदाने केले.
27  वर्षाच्या प्रवासातील अविस्मरणीय क्षण
अविस्मरणीय क्षणाबद्दल विचारले असता शिक्षक शरद यांनी सध्या शिकवत असलेल्या शाळेत असताना टिळक पुण्यतिथी दिवशी घडलेला दुःखद प्रसंग सांगितला. एका वर्षी टिळक पुण्यतिथी निमित्त सुट्टी नव्हती.त्यामुळे दुपारनंतर टिळक पुण्यतिथी साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. दुपारच्या जेवणासाठी काही मुले डबा आणायची तर काही घरी जाऊन जेवण करून यायची. त्या दिवशी दुपारी शाळा भरण्यासाठी गजर झाला आणि मुलेही वर्गात आली.त्यानंतर शिक्षक शरद वर्गात गेले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की वर्गातली दोन मुले आली नव्हती. त्यांनी चौकशी केली तेव्हा एक आला आणि दुसरा मागाहून येत आहे असे म्हणाला. म्हणून त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली पण तरीही तो मुलगा आला नाही. म्हणून त्यांनी वर्गाच्या बाहेर जाऊन पाहिले तेव्हा तो मुलगा त्यांना बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला . तेव्हा तिथे सर्वांनी पळापळ करून त्याच्यावर उपचार  करून केले .पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण तो निधन पावला होता. त्याचे नाव सदानंद मोगरे होते आणि त्याला आई नव्हती. तो खुप प्रामाणिक आणि अभ्यासू विद्यार्थी होता. शाळेत माझ्यासमोर घडलेला हा प्रसंग मी आजही विसरु शकत नाही.
आतापर्यंतची Achievement – 
शिक्षक शरद पांचाळ यांना कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची विशेष आवड असून त्यांना गीतरचनेचा छंद आहे. त्यांचा स्वरचित काव्य-संग्रह 2014 ला गितांजली या नावाने प्रकाशित ही  झाला आहे . त्यांचासाठी ही त्यांची सर्वात मोठी अचीवमेंट आहे. तसेच त्यांचे विद्यार्थी स्कॉलरशिप मेरीट मध्ये आले आहेत हि सुद्धा त्यांच्यासाठी खूप समाधानाची बाब आहे.
शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी काय बदल होण्याची गरज –
शालेय शिक्षणासाठी शासनाने भरपूर काही केले आहे असे शिक्षक शरद आवर्जून सांगतात. मात्र ते सर्व ते तळागाळातील विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे असे त्यांना वाटते. तसेच बौद्धिक विषयांबरोबरच कौशल्य विकासात्मक प्रयत्नांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.असे ही त्यांना मनापासून वाटते.
‘शिक्षक’ व्हायचे आहे त्यांना  सल्ला-
शिक्षण हे पवित्र क्षेत्र असून बुद्धीमान विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात काम केले पाहिजे यात खूपच समाधान असते आणि आपण राष्ट्र घडवतो.हि कल्पनाच आपल्याला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवते असे शिक्षक शरद सांगतात.