S R Dalvi (I) Foundation

Tr.Sharmila Mhade

Tr.Sharmila Mhade

आज आपण कु.शर्मिला शिवराम म्हादे (Bsc BEd) यांच्या शैक्षणिक जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका शर्मिला या मु.पो.खेर्डी,चिपळूण येथे रहात असून गेली 12 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. सध्या त्या न्यू. इंग्लिश स्कूल व ज्युनिर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती, ता. चिपळूण, जि.रत्नागिरी विद्यालयात गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन करत आहेत.

शिक्षक का व कधी व्हावेसे वाटले?
शिक्षक हा स्वतः राजा नसला तरी अनेक राजे निर्माण करण्याची क्षमता असणारा मार्गदर्शक आहे समाजामध्ये सामाजिक मूल्य रुजवणारा एक मूल्यवान पेशा म्हणजे शिक्षकी पेशा होय.म्हणूनच शालेय जीवनातून जात असताना 2002 ला मी दहावी उत्तीर्ण झाले तेंव्हा माझे आदर्श माझ्या शाळेतील सर्व शिक्षक यांच्यात असणारे सुप्त गुण व त्यांची शिकवण्याची पद्धत बघून मला देखील चांगले विदयार्थी घडवायचे आहे अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली.माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांनी व माझ्या आई वडिलांनी माझ्यातले सुप्त गुण ओळखून मला शिक्षक होण्याचा सल्ला दिला.
खरच आज मी एक सुंदर पिढी घडवण्याचे कार्य करत आहे.त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी पूर्णपणे खरं ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे.

ज्या विदयार्थ्यांना शिकवणे तुम्हाला कठीण वाटते त्याला तुम्ही कसे हाताळता?
ज्या विदयार्थ्यांना शिकवणे कठीण जाते त्या सर्व विदयार्थ्यांना निपुण विदयालय या उपक्रमाअंतर्गत ज्यादा तास घेऊन या तासिकेला सर्व विषयाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या जातात
मी माझ्या गणित विषयात ज्या विदयार्थ्यांना कठीण सोडवताना काही अडचणी येतात त्या समजून घेऊन त्या विदयार्थ्यांच्या गणितातील मूलभूत क्रिया हसत खेळत गणित या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून समजावून देते यामध्ये पाढे पाठांतर करताना विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर ज्या दिवशी जी तारीख असेल तो पाढा म्हणावयास सांगते अश्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे पाढे पाठ होण्यास मदत झाली.गणित शैक्षणिक साहित्यातून मुलांच्या सर्व गणिती क्रिया स्पष्ट केल्या.

पालकांशी सवांद व संबंध:-
शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर अध्यापन अध्ययनाच्या या चौकोनातील चार घटक-शाळा, विद्यार्थी, शिक्षक, व पालक यामध्ये पालकांकडून उपक्रमशीलतेला चालना मिळण्याच्या हेतूने आम्ही शाळेत पालक सभा विविध कार्यक्रम या माध्यमातून संवाद साधून वर्गात शिकविलेल्या गोष्टींची उजळणी किंवा त्याला पूरक अशा स्वाध्यायमाला किंवा प्रकल्प यांबाबत पालकांशी संवाद साधतो.मुलांचा प्रगती अहवाल, शाळेसंबंधी उपक्रमाची माहिती पालकांना पाठवून त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची माहीती पालकांना देऊन पालकांच्या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न निश्चित करतो.
मी Best Education देण्याचे कार्य कोरोना काळात केलेले आहे.शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत घरोघरी शाळा या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मुलांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी योग्य ते नियोजन करून मुलांच्या घरी जाऊन त्याने शिकविण्याचे कार्य सुरू केले.

तुम्ही वर्गात तंत्रज्ञान कसे वापरतात
अध्यापनात तंत्रज्ञानाच्या विविध साधनांमुळे विशेषतः संगणक व इंटरनेटमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना ज्ञानाची विविध कवाडे उघडी झाली आहेत.संगणक व इंटरनेट वापरून शिक्षक व विद्यार्थी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या विषयाशी तसेच इतर विषयांशी संबंधित नवनवी माहिती मिळवू शकतात व आपल्या ज्ञानात भर घालू शकतात.
माझी शाळा डिजिटल असून शाळेमध्ये आज 5 वी ते 12 वी चे 1928 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.5 वी ते 12 वी च्या सर्व वर्गखोल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व होतकरू व्यक्तीकडून डिजिटल करण्यात आलेल्या आहेत.या कलासरूम मध्ये प्रोजेक्टर व LED TV च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व विषयाशी संबंधित सर्व घटकांची माहिती, तसेच विविध उपक्रम, शैक्षणिक चित्रपट, शैक्षणिक खेळ व विविध स्पर्धांची माहिती दिली जाते. इ 5 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या साठी कॉम्पकीन शालेय सॉफ्टवेअर विद्यालयात आहे.
एक उत्तम शिक्षक या नात्याने उत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी कोरोना काळात घरी न थांबता विदयार्थ्यांना उपयुक्त, साजेसे असे ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देताना मी Best Education देण्याचे कार्य कोरोना काळात केलेले आहे.शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत घरोघरी शाळा या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मुलांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी योग्य ते नियोजन करून मुलांच्या घरी जाऊन त्याने शिकविण्याचे कार्य सुरू केले.कोरोना काळात मुलांना ऑनलाईन शिक्षण देताना अडचणी लक्षात घेऊन मी स्वतःचे Sharmila Mhade हे Youtube channel सुरू करून 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील व स्पर्धा परीक्षेतील गणित साध्य व सोप्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न केला.या Youtube channel वर 150 हुन अधिक शैक्षणिक व्हिडिओ असून त्याचा फायदा सर्व विद्यार्थी घेत आहेत.विद्यार्थ्यांना Diksha App, Google meet, Zoom याची माहिती करून दिली.

शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी Achievement
12वर्ष अध्यापनाचे कार्य करत असताना विविध विद्यार्थ्यांना गेली 5 वर्ष स्कॉलरशिप परीक्षा, NMMS परीक्षा, NTS परीक्षा इ. स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन केले असून आजपर्यंत 100 हुन अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले.तसेच तालुका व जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन,राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत देखील विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असून याची पोचपावती म्हणून 2021-22 रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे?
आतापर्यंत असे अनेक क्षण अविस्मरणीय आहेत.आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात माझे विदयार्थी सरकारी नोकरीत विविध पदावर कार्यरत आहेत,याचा मला आनंद आणि अभिमान आहे.आजही हे विदयार्थी भेटले की आपले शालेय जीवनातील अनुभव सांगतात.वेगवेगळ्या बुद्धिमतेचे विद्यार्थी शिकते होण्यासाठी आवश्यक असे वातावरण निर्मिती करून देणे,आणि त्यामध्ये नाविन्यता देने हे माझ्यासाठी आव्हानात्मक आणि अविस्मरणीय आहे.