आज आपण सौ.शितल हर्षल संखे ( H.S .c , D.Ed , B.A , B.P Ed) यांचा शिक्षक होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सौ. शितल गेली १६ वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आणि सध्या त्या जि.प.सरकारी मत्स्य शाळा नवापूर ता.जि. पालघर या शाळेत कार्य करत आहेत.
लहान असल्यापासूनच सौ शितल यांना शिक्षकांबद्दल प्रचंड आदरभाव ही धारणा होती . पण, त्यांना डॉक्टर किंवा मानसशास्त्रज्ञ व्हायचे होते . मात्र पहिल्यांदाच समोर आलेली सीईटी कशी द्यावी वैगेरे संभ्रम झाला मग त्यांनी तो विचार सोडून दिला. मग त्यांच्या आई वडीलांची मनापासून असलेली इच्छा एक मुलगी शिक्षिका असावी . त्यांनी ते स्वप्न पुर्ण करण्याचा विचार पक्का केला . अन् सुरू झाला त्यांचा शिक्षिका म्हणून प्रवास. आणि आता त्या त्यांच्या विद्यार्थ्यांची डाॅक्टरही होते अन् त्यांचे मानसशास्त्र ही जाणतात. म्हणजे कळत नकळत त्यांनी त्यांचे ही स्वप्न पुर्ण केले . ऐसे त्या म्हणतात.
अचिव्हमेंट :
तसेच आजवर शिक्षक म्हणून नामांकन अन् पुरस्कार यात त्यांनी कधी लक्ष घातलं नाही .पण, 2021 चा तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार लायन्स क्लबकडून त्यांना मिळाला . हे सर्व विद्यार्थ्यांमुळे व आई वडील व माझ्या गुरूजनांचा आशीर्वादच आहे असे त्या म्हणतात.
त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबतचे अनुभव ही शेअर केले आहेत.
नांदगाव तर्फे तारापूर केंद्रस्तरीय विविधगुण स्पर्धा पार पडल्या . क्रीडास्पर्धेत मुलांनी बऱ्याच स्पर्धेत यश संपादन करत . सात ट्राॅफीज मिळवल्या.आम्हालाही खूप आनंद झाला. स्पर्धेसाठी निघतानाच मॅडम आपण जिंकलो तर , आम्ही असं करू,आम्ही तसं करू सांगत होते .त्यावेळी शितल यांनी त्यांना सांगितले ”बेटा आता शांत रहा . जिंकलो तर पाहूया …नक्की काहीतरी करूया ” तेव्हा ते हो म्हणाले. स्पर्धा सुरू झाल्या . समूहगायन अगदी उत्कृष्ट झाले . तीन परिक्षक अंतीम विजयी तीन ही वेगवेगळया शाळा होत्या . त्या तीनमधील एक परिक्षक त्या स्वतः होत्या . म्हणून तर , त्यांना आशाच होती अन् खात्री ही …नक्की काहीतरी होईल . पण, एकापेक्षा एक सरस सादरीकरण होते . शेवटी त्यांच्या विद्यार्थ्यांची निराशा झाली . मग परतीच्या प्रवासात त्यांची जबाबदारी वाढली . त्यांना विचारले जिंकले तर , काय -काय करायचे ठरले होते . तर, म्हणाले ,”मॅडम ,तुम्ही रागावणार का ?”मी म्हटले ,”मुळीच नाही “. “स्पर्धेत कुणीतरी हरणार , कुणीतरी जिंकणारच …” अनुभव वाढला ना …किती छान वक्तृत्व ऐकले , गाणी ऐकली . आता बोला काय करायचं होतं . ते म्हणाले , मॅडम टबला , झांज आणि ढोल आॅटोमध्येच वाजवायचे होते . परमिशन ग्रॅन्टेड…., छान सुरूवात …पुन्हा गाणी गात ते सर्व शाळेवर पोहोचलो .हरल्यावर ही कसं साजरं करायचं …हे आज त्यांना शिकवलं आणित्यांची निराशा , नकारात्मकता लगेच सरली . आनंदी माहौल झाला . छान वाटलं .
* कोरोनाकाळात नवोपक्रम राबवून विद्यार्थी,पालक व शिक्षक सोबत मिळून विद्यार्थ्यांना आहारातून मानसिक स्वास्थ मिळवून देण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबवला.
* स्वतः लेखनाची आवड असल्यामुळे विद्यार्थ्यांचा विचार करून नाविन्यपूर्ण काही देऊन त्यांची साहित्य गोडी वाढवण्याचा एक प्रयत्न करण्यात आला . नाविन्यपूर्ण काव्यप्रकाराचे नाव मिलाप शितलाक्षरी ठेवण्यात आले .
* विद्यार्थी पब्जी गेम खेळत होता . त्याला त्यातून बाहेर काढायला पालकांना योग्य ती मदत करून पब्जी गेम बंद व्हावा या चळवळीत सहभागी होत . दिल्लीपर्यंत केलेले निवेदन व अखेर त्या खेळाविषयी मिळालेला न्याय .
शिक्षक होणाऱ्यांना सल्ला :