सुप्रिया यांना शाळेत असल्यापासूनच शिक्षकी पेशाबद्दल आदर होता.त्यांच्या शाळेत शिक्षक दिनाच्या दिवशी 1 दिवस शिक्षक म्हणून मिरवताना खूप भारी वाटायचे. शिक्षकांना असलेला मान, त्यांची कार्यशैली, तसेच नेहमीच आयुष्यभर मुलांमध्ये मूल होऊन राहता येते या त्यांच्या सर्व भावनेनेच त्यांनी लहानपणीच मनाशी शिक्षक व्हायचं ठरवलं होते. त्यांच्या गुरुजींना माजी विद्यार्थ्यांकडून मिळणारा सन्मान, आदर या सगळ्याचा सौ सुप्रिया यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांनी शिक्षक होण्याचा निर्धार केला.
दोन लहान मुलांची आई होऊन संसार आणि नोकरी या दोन्ही गोष्टींना समान न्याय देण हे सौ सुप्रिया यांच्यासाठी चॅलेंजिंग होते. मात्र या वरही जमेल तशी मात करत त्यांनी हा शिक्षिका म्हणून प्रवास सुरु ठेवला.
अविस्मरणीय प्रसंग/ क्षण:
सौ सुप्रिया यांच्यातील क्षमता आणि शिकवण्याच्या शैलीवर त्यांना नोकरीच्या सुरवातीलाच Higher Classes शिकवायला व स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि ते ही कोणत्याही अनुभवाशिवाय त्यांच्यासाठी ही गोष्ट खुप महत्वाची आणि कधीही न विसरता येण्यासारखी आहे.
अचीवमेंट:
विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांचा विश्वास व प्रेम सौ सुप्रिया यांना मिळाले आहे आणि अजूनही मिळत आहे हीच त्यांच्यासाठी आतपर्यंतची सर्वात मोठी अचीवमेंट आहे अस त्या म्हणतात.
शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे:
समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून खूप बदल होण्याची आवश्यकता आहे असे शिक्षिका सुप्रिया यांना वाटते. आजही ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शाळेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक सोयी सुविधांसाठी शिक्षकांना ग्रामस्थ सहकार्यावर अवलंबून राहावे लागते. ग्रामीण भागातील समाजाचा बाहेरील समाजाशी संपर्क फारच कमी येतो. फोन नेटवर्क कमी असल्याने आधुनिक जगातील गोष्टी फारच कमी समजतात. या सर्व गोष्टींवर काहीतरी उपाय योजना करायला हव्यात असे मत शिक्षिका सुप्रिया यांनी व्यक्त केले.
शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना सल्ला:
”आपण आपल्या चांगल्या ,आदर्श शिक्षकांना समोर ठेऊन, शिक्षक बनावे. मुलांचे आदर्श भविष्य घडविण्यासाठी आपले बहुमोल योगदान द्यावे.त्यातूनच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. तेच समाधान तुमचे जीवन सुवर्णमय बनवेल.” हा सल्ला शिक्षिका सुप्रिया यांनी शिक्षक होणाची इच्छा असणाऱ्यांना दिला.