आज आपण शिक्षिका सौ.तेजा विठू ताटे (MA ,B.Ed.) यांचा शिक्षिका होईपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. सौ तेजा या साखली गोवा या ठिकाणी राहत असून गेले १० वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि साध्य त्या जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा सासोली नं.१ या शाळेत शिक्षिका म्हणून कार्य करत आहेत.
प्रत्येक जण लहान असताना मोठे होऊन काय बनायचे याचे नकळत का होईना एक तरी स्वप्न रंगवतोच.सौ तेजा यांनीही लहान असतानाच शिक्षिका होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि मोठे होऊन त्यांनी हेच स्वप्न पूर्ण केले.
‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी:
तेजा यांचे शाळेनंतर बारावीपर्यंत शिक्षण सायन्स मध्ये झाले होते त्यांच्या आईची इच्छा त्यांनी आईची इंजिनियर व्हाव अशी होती. मात्र तेजा यांचे मन या गोष्टींसाठी तयार होत नव्हते.त्या दहावी- बारावीच्या टॉपर असल्यामुळे स्वप्न मोठ असण सहाजिकच होतं. पण म्हणतात ना, ‘जे तुमच्या नशिबात असतं तेच तुमच्या वाट्याला येत’. आणि त्यांच्या बाबतीत तसंच झालं. प्राथमिक शिक्षक हा पेशा त्यांनी निवडल्यामुळे खूप जणांनी आपली नापसंती दर्शवली. ‘मग एवढ्या शिकण्याचा काय फायदा’ असेही टोमने अनेक जणांनी दिले पण शिक्षकी पेशाविषयी असणारी आवड आणि घरची परिस्थिती या दोघांचा विचार करता तेजा यांनी हाच पेशा निवडला.आता नोकरीची दहा वर्षे पूर्ण होत आलेली आहे आणि त्यांना शंभर टक्के असं वाटते.क, त्यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय बरोबर होता. या पेशामध्ये जे काम करण्याचं समाधान आहे ते अन्य कोणत्याही पेशामध्ये नसेल. भावी पिढी घडवण्याचे काम, लहान मुलांचे निरागस जीवन अनुभवणे, त्यांच्या जीवनाला आकार देणे, याच्यासारखे सुख ते काय.. असे शिक्षिका तेजा यांना वाटते.
अविस्मरणीय क्षण/ प्रसंग:
प्रचलित परिस्थिती पाहता सध्या आजूबाजूला इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडचा ओघ खूप वाढला आहे. शिक्षिका तेजा शिकवत असलेल्या शाळेच्या परिसरातील अधिकांश मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जातात. का कोणास ठावुक या शाळा पालकांना अधिकाधिक आकृष्ट करतात. शेजाऱ्यांच मूल जात आहे आहे ना मग माझं का नाही? मुलांना काही येवो अथवा ना येवो पण मी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणार .हाच हट्ट पालकांमध्ये दिसून येतोय.
सात-आठ वर्षांपूर्वी एक पालक त्यांच्या मुलाला इंग्रजी मिडीयमच्या शाळेत घातलं होतं आणि ज्याने तेजा शिकवत असलेल्या शाळेमध्ये त्यांची मुलगी शिकत होती . शाळेत भेट द्यायला आले असता शिक्षिका तेजा शिकवत असलेल्या वर्गात त्यांचं लक्ष गेलं आणि वर्गातील मुलांची प्रगती, अध्यापन बघून त्यांनी तात्काळ निर्णय घेतला की त्यांच्या मुलाला ते याच शाळेत घालणार . ‘या शाळेतील शिकवण्याची पद्धत, मुलांची विशेष काळजी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष …. हा प्रकार त्या शाळेत मला कधीच दिसला नाही’ असे ते पालक म्हणाले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाला त्या शाळेत घातले.
तेव्हा तेजा यांच्या नोकरीची नुकतीच सुरुवात होती आणि त्यात पालकांनी माझ्या अध्यापनाला बघून घेतलेला तो निर्णय. यामुळे हा प्रसंग मला त्यांच्यासाठी अविस्मरणीय आहे. याच प्रसंगामुळे तेजा यांना शिक्षण क्षेत्रामध्ये काही नवीन करण्यासाठी अथवा मुलांच्या विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा मिळाली. असे ही त्या म्हणाल्या.
अचीवमेंट:
– ५ वी शिष्यवृत्तीचा वर्ग शिक्षिका तेजा यांच्याकडे आहेत, मागच्या पाच वर्षापासून आहे. आणि या पाच वर्षाच्या कालावधीमधे शाळेतील ६ मुले जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती मेरीट लिस्ट मध्ये झळकली आहेत.
– एक विद्यार्थिनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2018 19 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथम आली.
– आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालय मध्ये झालेली आहे.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज:
तेजा करत असलेले नोकरीचे ठिकाण ग्रामीण भागात असलेल्यामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीबद्दल त्या जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शाकल्या. ग्रामीण विभागातील मुलांना आधुनिकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असणारी संसाधने लाभत नाहीत. घरातील गरीब परिस्थिती, पालकांचे अज्ञान, ग्रामीण भागांकडे असणारे शासनाचे दुर्लक्ष यामुळे हे विद्यार्थी बुद्धिमत्ता असूनही विशिष्ट चौकटीतच मर्यादित राहतात. त्यामुळे ही परिस्थिती बदलणे अतिशय गरजेचे आहे. असे तेजा म्हणाल्या.
तसेच शिक्षकांच्या बाबतीतम्हणायचे झाले तर अध्यापनामध्ये अजूनही पारंपारिक अध्यापन प्रणालींचा प्रभाव आढळतो. आधुनिक पद्धती, नवीन विचार हे कागदोपत्रीच मर्यादित राहतात प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ येते त्यावेळी तथाकथित शासनाने मांडून दिलेली चौकटीमध्ये राहूनच काम करावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेता शासन नक्कीच शिक्षकांच्या आधुनिकीकरणाकडे, नवनवीन तंत्रज्ञानविषयक दृष्टिकोन आणण्याकडे लक्ष पूरवत आहे.असे मत शिक्षिका तेजा यांनी व्यक्त केले.
‘शिक्षक’ होण्याची इच्छा असलेल्यांना सल्ला :
शिक्षक होणे हे सौ तेजा यांचे लहानपणापासूनच स्वप्न होतं.आणि पुढचा जन्म मिळाला तर तेव्हा ही शिक्षकी पेशाच मिळो, असे त्या म्हणतात. शिक्षक हा शिक्षका सारखा असावा. तो पैशाने नाही तर ज्ञानाने श्रीमंत असावा.आताची परिस्थिती थोडी वेगळी वाटते. सगळीकडे शिक्षणाचे बाजारीकरण झालेले दिसते आणि याची झळ शिक्षकी पेशाला ही लागलेली दिसून येत आहे. शिक्षकाला समाजामध्ये मानाचे स्थान होते ,आहे आणि या पुढेही राहणार. फक्त त्या पेशातील पावित्र्य जपणं हे आपणाला जमलं पाहिजे.व्यवहारीकतेपेक्षा मूल्यांचे संवर्धन आणि ती मुल्ये स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकारणे हे सगळ्यात मोठे कौशल्य आणि आणि ज्यांनी हे गमक उमगले तेच खरे हाडाचे शिक्षक. असा सल्ला शिक्षिका तेजा ताटे यांनी दिला.