आज आपण श्री. तुषार वामन आरोसकर (MA. B.Ed) यांच्या शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत.तुषार हे सावंतवाडी,जिल्हा सिंधुदुर्ग येथे राहत असून गेली २० वर्षे ते शिक्षक क्षेत्रात कार्यरत आहेत.आणि सध्या ते माझी शाळा,जिल्हा परिषद शाळा इन्सुली नंबर ७ या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्य करत आहेत. शाळेत असल्यापासूनच तुषार यांना त्यांच्या गुरुजींना पाहूनच शिक्षकी पेशा बद्दल आदर वाटत होता. त्या काळात शिक्षक होण्यासाठी खूप मेहनत करावी लागायची. शिक्षकांना असलेला मान, त्यांची कार्यशैली, तसेच नेहमीच आयुष्यभर मुलांमध्ये मूल होऊन राहता येते या सर्व गोष्टी मनात घर करत गेल्या आणि तेव्हाच तुषार यांनी शिक्षक व्हायचं ठरवलं होतं.तसेच त्यांच्या गुरुजींना माजी विद्यार्थ्यांकडून मिळणारा सन्मान,आदर या सगळ्याचा त्यांच्या मनावर खुप खोलवर परिणाम होत गेला आणि त्याच दरम्यान त्यांनी शिक्षक होण्याच स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण ही केले.
‘शिक्षक’ क्षेत्र निवडताना काही अडचणी:
शिक्षक क्षेत्र निडताना त्या काळात फारच कठीण होतं.मेरिट लागायची, आणि तुषार राहत होते त्या सिंधुदुर्ग गावात केवळ चारच D.Ed कॉलेज होती. त्यामुळे १६० जागांमध्ये नंबर लागणे फारच कठीण होते.मात्र सुदैवाने तुषार यांचा माझा नंबर पहिल्याच यादीत लागला.
अविस्मरणीय क्षण/ प्रसंग:
शिक्षक म्हणून अतिशय आनंददायी असा शिक्षक तुषार यांचा प्रवास आहे. ते रोणापाल येथे शाळेत असताना त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा चार्ज आला. त्याच वेळी शाळेला ५० वर्षे पूर्ण होत होती. तेथील ग्रामस्थांना आपण शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करूया असे सांगितले.आणि सर्वच जण त्यासाठी तयार झाले. तुषार यांनी त्यांच्या मनाप्रमाणे या वेळी शैक्षणिक उठाव,ग्रामस्थ सहकार्य घेऊन शाळेत सुधारणा करून घेतल्या. शाळा अगदी छप्पर पासून ते कम्पाउंड वॉल पर्यंत,रंगकाम,सुंदर बाग,आशा सुधारणा केल्या.आणि शाळेचे रूपच बदलले. त्यामुळे कमी सेवेमध्ये तुषार यांच्याकडून झालेल्या \कार्याने ते स्वतःच भारावून गेले.
अचीवमेंट:
वर सांगितलेल्या प्रसंगानंतर योगायोग म्हणा किंवा भाग्य त्या नंतर सलग दोन शाळांमध्ये तुषार यांनी एक शतक महोत्सव साजरे केले ,तर सध्या ते कार्यरत असलेल्या शाळेमध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. या कालावधीत एक सन्माननीय ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळा सुधार उपक्रमांतर्गत पाच लाखांचा निधी प्राप्त झाला. ही तुषार यांच्या सेवेतील मुख्याध्यापक म्हणून सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. तसेच शाळेशी संबंधित सर्व ग्रामस्थ, पालक यांचे मोलाचे सहकार्य ही पण त्यांची एक अचिव्हमेंट आहे.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज:
समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून खूप बदल होण्याची आवश्यकता शिक्षक तुषार यांना वाटते.आजही ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शाळेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.अनेक सोयी सुविधांसाठी शिक्षकांना ग्रामस्थ सहकार्यावर अवलंबून राहावे लागते. ग्रामीण भागातील समाजाचा बाहेरील समाजाशी संपर्क फारच कमी येतो. फोन नेटवर्क कमी असल्याने आधुनिक जगातील गोष्टी फारच कमी समजतात.या सर्व गोष्टींमध्ये सुविधा व्हायला हव्यात असे मत तुषार यांनी व्यक्त केले.
शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांना सल्ला:
आपण आपल्या चांगल्या ,आदर्श शिक्षकांना समोर ठेऊन शिक्षक बनावे. मुलांचे आदर्श भविष्य घडविण्यासाठी आपले बहुमोल योगदान द्यावे.त्यातूनच आपल्याला मानसिक समाधान मिळेल.तेच समाधान तुमचे जीवन सुवर्णमय बनवेल.असा सल्ला श्री. तुषार यांनी शिक्षक होऊइच्छिणाऱ्यांना दिला.