S R Dalvi (I) Foundation

Tr. Tushar Mhatre

Tr. Tushar Mhatre

‘ समाजाचा विकास, केवळ सत्तेने होत नाही..तो आदर्श शिक्षकांमुळे होतो’
आज आपण श्री.तुषार चंद्रकांत म्हात्रे (बी.एस्सी.बी.एड., एम.ए.(शिक्षणशास्त्र), सेट (शिक्षणशास्त्र), डी.एस.एम.) यांच्याबद्दल अधिक माहीती जाणून घेणार आहोत. शिक्षक असलेले तुषार हे करंजाडे, पनवेल (रायगड) येथे राहत असून गेली 14 वर्षे ते शिक्षक म्हणून कार्य करत आहेत. सध्या ते रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जूचंद्र ता.वसई जि.पालघर शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत.
तुषार हे इयत्ता दहावीत असताना लोकसत्ता दैनिकाने एक उपक्रम राबविले होते त्याच्या कला व अभियोग्यता चाचणीत ‘शिक्षक, पत्रकारीता’ असे दोन पर्याय त्यांना सुचवले होते. त्यावेळेस शिक्षण क्षेत्राचा एक पर्याय म्हणून त्यांनी विचार केला होता. आणि रसायनशास्त्रातील पदवीनंतर या क्षेत्राकडे त्यांचे अधिक लक्ष वेधले गेले. आणि मग पुढे जाऊन त्यांनी शिक्षक क्षेत्र निवडले.
‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना अडचणी:
‘शिक्षकी पेशा’ निवडताना विशेष अडचणी तुषार यांना आल्या नाहीत. परंतु या निवडीच्या काळात एक परदेशातील नोकरीची संधी त्यांच्याकडे आली होती. त्यामुळे त्यांची द्वीधा मन:स्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यांचा कल शिक्षकीपेशाकडेच असल्याने अंतिम निर्णय घेतला गेला.
अविस्मरणीय क्षण/ प्रसंग:
शिक्षक म्हणून आतापर्यंतच्या प्रवासातील सर्व अनुभव वैयक्तिकदृष्ट्या समृद्ध करणारे आहेत असे शिक्षक तुषार सांगतात.
काही वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील एका दुर्गम भागातील शाळेत ते काम करत होतो. त्या वेळेस ‘अंगात येणे’ या मानसिक समस्येने त्रस्त इयत्ता सातवीतील विद्यार्थीनीमुळे थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरूवातीला तात्पुरत्या युक्तीचे उपाय करून ही समस्या थांबवली. पुढे या विद्यार्थीनीचे व पालकांचे समुपदेशन करून शाळेत ‘अंगात येणे’ कायमचे बंद केले.
Achievement:
तुषार यांचा शोधनिबंध (Research Paper) प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी ‘BMI‘ संकल्पनेशी निगडीत शोधनिबंध सन 2012 मध्ये NTSC या राष्ट्रीय परिषदेत सादर केला होता. तसेच ‘Saving Electrical Energy’, ‘Contaminated Currency’  या संकल्पनांवरील विद्यार्थ्यांच्या सहभागाने केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय ऑनलाईन जर्नलमध्ये प्रकाशित झाले.
समाजात अजुन काय बदल होण्याची गरज आहे:
‘कुणीही यावे आणि काहीही बोलावे’ अशी शिक्षणक्षेत्राची सध्याची अवस्था आहे. त्यामुळे एखादी विधायक ‘क्रिया’ करण्याऐवजी जो तो ‘प्रतिक्रिया’ देण्यातच धन्यता मानत आहे. समाजातील सकारात्मक घटकांचा शिक्षण क्षेत्राला प्रत्यक्ष उपयोग होणे गरजेचे आहे. शिक्षक, विद्यार्थी या दोन्ही घटकांमध्ये समन्वय असला पाहिजे असे मत शिक्षक तुषार यांनी व्यक्त केले.
शिक्षक व्हायचे आहे त्यांना सल्ला:
काही अपवाद वगळता शिक्षकी पेशा हा ‘व्रत-वसा’ वगैरे मानन्याचे दिवस संपल्यातच जमा आहेत. या  पेशाला ‘व्यवसाय’ मानून काम केले तरीही बरेच काही साध्य होऊ शकेल. ज्याप्रमाणे इतर व्यवसायामध्ये आपल्या मूल्याचा पुरेपूर मोबदला ग्राहकाला मिळतो, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात देखिल हा व्यावसायिक दृष्टीकोन ठेवता येईल. ‘व्रत-वसा ’असल्या गोष्टींचा फारसा बाऊ न करता शिक्षकाला चांगले काम करता येईल. ‘दर्जात्मक’ शिक्षणासाठी शिक्षणव्यवस्थेने   व्यवसायाभिमुख असणे कालसुसंगत ठरेल . या व्यवसायभिमुखतेचे पालन  सर्वच स्तरांवर झाल्यास निश्चितच विद्यार्थी हित साधले जाईल असे शिक्षक तुषार यांना वाटते.
English Marathi