आज आपण श्री.उदय विठ्ठल गवस यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री.उदय गेली २० वर्ष शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. आणि सध्या ते प्राथमिक शिक्षक शाळा शासकीय वसाहत कोनाळकट्टा ता. दोडामार्ग सिंधुदुर्ग येथे शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत.
श्री. उदय यांच्या घराची परिस्थिती बरी होती मात्र असे असूनही त्यांच्या घरात उच्च शिक्षण घेतलेले असे कोणी नव्हते. उदय यांच्याकडेही हुशारी होती मात्र त्याचा उपयोग कसा करायचा हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. त्यांच्यासमोर दोन प्रश्न होते एक म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि त्यांच्या कलेचा हुशारीचा ही उपयोग व्हावा याचा विचार करत असतानाच उदय यांना त्यांच्या गावातील एका खाजगी शाळेतील शिक्षकांनी अध्यापक पदवीसाठी सुचविले जेथे पैसा जास्त महत्वाचा नसून अभ्यास करावा आणि यश मिळवणे हे जास्त महत्वाचे होते. आणि त्यासाठी उदय तयार होते . त्यांच्या योग्यतेनुसार त्यांनी इतर कसलाही विचार न करता हे पवित्र कार्य हाती घेण्याचे ठरविले आणि गुणवत्तेनुसार अध्यापक विद्यालयात त्यांनी प्रवेश मिळवला.त्यानंतर दीड वर्ष्यानी प्रत्यक्ष नोकरी सेवा स्वरूपात शाळा मिळाली आणि उदय यांचा अध्यापणाचा प्रवास सुरु झाला.
अविस्मरणीय प्रसंग/ क्षण:
20व्या वर्षी श्री. उदय शिक्षक म्हणुन सेवेत रुजू झाले. आणि या प्रवासात अनेक विद्यार्थी घडवत घडवत आज 20 वर्ष ही सेवा बजावत आहे.
उदय यांनी अल्पभाषिक विद्यार्थ्यांना चांगले वाचन शिकविण्यासाठी उपक्रम योजून त्यातून गरीब मुलांना चांगले वाचता शिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनातून प्रथम संस्थेने या कामाचा गौरव केला आणि उदय यांचा ही प्रमाणपत्र देऊन गौरव केला.तसेच कला विषयातून उच्च दर्ज्यांची प्रशिषणे पुणे प्रशिक्षण संस्थे मार्फत घेतली त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग करून दिला याच प्रशिक्षणातून आपल्या देश्याच्या संस्कृतीचे आकलन व्हावे या उद्देशाने विविध भाषेतील गीते परिसरातील शाळांमध्ये जाऊन शिकविली त्याचेही पुणे प्रशिक्षण संस्थेने कौतुक केले. अवघ्या दहा मुलांचे गीत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने आले आणि त्यासाठी सर्वेसर्वा त्या मुलांवर संस्कार झाले त्याबद्दल पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत सन्मान ही झाला हा हे सर्व प्रसंग शिक्षक उदय यांच्यासाठी अविस्मरणीय आहेत.
समाजात शिक्षक – विद्यार्थ्यांसाठी काय बदल होण्याची गरज:
शिक्षक विद्यार्थी यांच्यातील नाते कुटुंबातील नात्यासारखे असावे शिक्षक हा आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहे असे प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकला वाटले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या नजरेत शिक्षक हा आपल्या कुटुंबाचा मार्गदर्शक आहे असे वाटल्याने आपुलकीचे नाते तयार व्हायला वेळ लागत नाही जेंव्हा मुलांना कळेल कि आपले पालक शिक्षकांचा आदर करतात तेव्हा विद्यार्थी ही शिक्षकांचा आदर निश्चितच करतील. असे मत शिक्षक उदय यांनी मांडले.
शिक्षक होणाऱ्यांसाठी सल्ला:
शिक्षक ही सेवा आहे लहान मुलं ही निरागस असतात पाप पुण्य यांच्यापासून खूपच दूर असतात त्यामुळे ती निर्मळ असतात अश्या मुलांना घडविण्याचे भाग्य शिक्षक या सेवकालाच मिळते तरी आधुनिक तंत्र आणि ज्ञान याची सांगड घालून योग्य अध्यापणासाठी वेळोवेळी अपडेट राहणे हे आजच्या शिक्षकला खूप गरजेचे आहे तरीही शिक्षक होण्याची संधी कोणी सोडू नये कारण सरस्वतीची,देशाची आणि समाजाची सेवा करणे हे शिक्षकांशिवाय कोणालाही शक्य नाही. असा सल्ला शिक्षक उदय यांनी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना दिला.