S R Dalvi (I) Foundation

[vc_section full_width=”stretch_row_content” content_placement=”middle” parallax=”content-moving” parallax_image=”5301″ parallax_speed_bg=”2″ el_class=”bt-ss-development-alnor” css=”.vc_custom_1608130365357{background-image: url(https://srdalvifoundation.com/wp-content/uploads/2020/12/Teacher-Assembly-bg-dark.jpg?id=5301) !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space height=”64px”][vc_custom_heading text=”Tr. Vanita Kondake ” font_container=”tag:h1|font_size:34px|text_align:center|color:%23f9f9f9|line_height:58px” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:700%20bold%20regular%3A700%3Anormal” css=”.vc_custom_1657798451081{margin-top: 0px !important;}” el_class=”bt-title03-alnor”][vc_empty_space height=”64px”][/vc_column][/vc_row][/vc_section][vc_section full_width=”stretch_row_content” css=”.vc_custom_1607838179037{padding-right: 100px !important;padding-left: 100px !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/4″][vc_single_image image=”9127″ img_size=”large” alignment=”right” style=”vc_box_rounded” css_animation=”fadeInDown”][/vc_column][vc_column width=”3/4″][vc_custom_heading text=”Tr. Vanita Kondake ” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:400%20regular%3A400%3Anormal” css_animation=”fadeInLeft”][vc_column_text css_animation=”fadeInLeft”]आज आपण श्रीमती वनिता भिमराव कोंडके  [M.A. D.Ed]  यांच्या शिक्षिका प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्रीमती वनिता या औरंगाबाद येथे राहत असून गेले १६ वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
सध्या त्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपुतवाडी सारोळा केंद्र नाचनवेल तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद येथे सहशिक्षिका या पदावर काम करत आहे.  १२ जून २००६ रोजी सहशिक्षिका म्हणून त्यांना प्रथम नियुक्ती मिळाली.
जेव्हापासून त्यांना कळायला लागले तेव्हापासून त्यांनी एकच स्वप्न पाहिले ते म्हणजे शिक्षक होण्याचे. त्यांना नेहमी वाटायचे की आपणही आपल्या मॅडम प्रमाणे मुलांना शिकवायचे. जेव्हापासून त्यांनी  शिक्षक दिनामध्ये सहशिक्षिका म्हणून सहभाग घेतला होता त्या दिवसापासूनच त्यांनी ठरवलं होत की हेच आपलं स्वप्न आहे.

लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये शिक्षक होण्याची इच्छा होती शालेय जीवनात शिक्षक दिनाला मॅडम म्हणून वर्ग सांभाळायला त्यांना खूप आवडायचे कुणी विचारले की तुझे ध्येय काय तर तोंडातून फक्त हेच निघायचे की मला मॅडम व्हायचे एक स्वप्न आणि एकच ध्यास त्यांच्या मणी होता त्यादृष्टीने त्या प्रयत्नही करत होत्या पण त्यांच्या आजोबांच्या प्रकृतीमुळे बारावी पास झाल्यांनतर त्यांचे लग्न झाले आणि त्यांना असे वाटले की आता त्यांचे स्वप्न संपले पण अतुट विश्वास व स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास. असे म्हणतात मनापासून काही देवाकडे मागितले की ते पूर्ण होते असेच काहीसे त्यांच्या जीवनात झाले. त्यांना कला शाखेतून बारावीला 79 टक्के मिळाले आणि त्यांचा डीएड ला नंबर लागला पण त्यातही त्यांची परीक्षा होती.
त्यांचा नंबर नागपूर मधील सेवासदन अध्यापक विद्यालय येथे  लागला पण लांब असल्यामुळे त्यांच्या पतींची त्यांना नागपूरला पाठवण्याची इच्छा नव्हती पण त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून त्यांचे वडील आणि त्यांचे पती यांनी दोघांनीही त्यांना सहकार्य केले अन हो नाही म्हणता म्हणता  त्यांचा प्रवेश नागपूरला झाला पण त्यांचे नशीब अन त्यांची इच्छा प्रबळ असल्यामुळे त्यांचा नंबर औरंगाबाद मधील प्रेमचंद मुगदिया अध्यापक विद्यालय येथे लागला अशा रीतीने वडिलांनी आणि त्यांच्या पतींनी त्यांना डीएड पूर्ण करण्यात मोलाची मदत केली. सांगायचं प्रसंग असा की डीएडच्या प्रथम वर्षात त्या  प्रेग्नेंट राहिल्या त्यांची आई त्या वेळेस त्यांना म्हणालाय की  “एक वेळ  शिक्षण राहिले तर चालेल पण हे  बाळ आपल्याला हवंय” मग काय त्यांची एक कसरत सुरू झाली त्यांना स्वप्न पूर्ण करायचे होते पूर्ण ताकदीने स्वप्नांचा पाठलाग सुरू केला पण डीएड प्रथम वर्षात पहिल्याच पेपर च्या दिवशी त्या गाडीवरून पडल्या डॉक्टर म्हणाले आता तुम्हाला जास्त वेळ एका ठिकाणी बसता येणार नाही , त्यावेळेस त्यांना आठवा महिना होता तरीही त्यांनी त्या गोष्टीला न जुमानता होणारा त्रास सहन करून सर्व पेपर दिले.कारण तात्यांच्यासाठी बाळ जेवढं महत्त्वाचं होतं तेवढेच त्यांचे स्वप्नही.  कॉलेजमधील शिक्षकांनी आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांना खूप साथ दिली आणि सर्वांच्या सहकार्याने त्यांना लहान बाळ असताना  दोन्ही डीएडच्या सत्रात पहिल्या नंबरने बाजी मारली मग काय त्यांचे स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर होते. आणि लगेचच जाहिरात निघाली आणि त्यांना 12 जून 2006 ला प्रथम नियुक्ती आदेश मिळाला त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण त्यांचं स्वप्न आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी पाहिलेले स्वप्न त्यांनी आज पूर्ण केलं होतं अडचणी खूप आल्या पण या अडचणीवर मात करत मुलांना शिकवण्याचे ध्येय शिक्षक होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनारी या ठिकाणी त्या प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या तेथे त्यांना नियुक्ती मिळाली त्यावेळेस फक्त सात विद्यार्थी संख्या होती ती त्यांनी ४३ पर्यंत आणली होती एकही मुलगा त्या गावातून बाहेर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात नव्हता तसेच अनेक वेळी गावातील सर्व पालकांच्या सभा घेऊन घरोघरी गृह भेटी देऊन डिजिटल शाळा बनवण्यासाठी एक लाखाचा निधी 600 लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये त्यांनी मिळवला व शाळेमध्ये टीव्ही,स्पीकर,फर्निचर,सीसीटिव्ही असे सर्व साहित्य घेतले सीसीटीव्ही असणारी फुलंब्री तालुक्यातील पहिली त्यांची शाळा होती.
त्यांचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे त्यांच्या शाळेला शिक्षणाच्या वारीमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली त्यांच्या शाळेतील मुले व सर्व शिक्षिका येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी प्रगतवारी काढण्यासाठी सज्ज झाले तेथेही त्यांच्या मुलांना सहभाग घेण्याचा मान मिळाला.
तसेच शाळेतील मुलींची शिष्यवृत्ती पात्र मध्ये निवड झाल्यामुळे झाल्यामुळे माननीय पवनीत कौर सीईओ मॅडम औरंगाबाद तसेच हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापिका म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.

आता त्यांची बदली राजपूतवाडी शाळेत चार वर्षांपूर्वी झालेली असताना ही त्यांचे मागील शाळेतील विद्यार्थी आजही त्यांची आवडती शिक्षिका या विषयावर निबंध लिहिताना त्यांचे नाव लिहितात आणि आठवणीने काही अडचणी आल्यास त्यांना फोन करून विचारतात हे पाहिले की त्यांना असे वाटते की जगातील सर्वात मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला आणि मन अगदी धन्य होते हेच त्यांना त्यांच्या कामाची पावती वाटते.

समाजात शिक्षक विद्यार्थी यांचे नातं घट्ट होण्यासाठी खरं म्हणजे आपली मुले म्हणून मुलांकडे पहावं आणि तसेच त्यांना शिक्षण द्यावे जेव्हा हे नातं एखाद्या आई मुलाप्रमाणे होईल तेव्हा खरं शिक्षण मुलांना मिळेल समाजात शिक्षक-विद्यार्थी  यांच्यासाठी हा बदल होण्याची गरज आहे असे त्यांना वाटते.

खरंच शिक्षक होऊन देशाची सेवा करण्यासारखे दुसरे कार्य नाही.कारण एक शिक्षकच योग्य नागरिक घडवू शकतो. व देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतो. असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.[/vc_column_text][/vc_column][/vc_row][/vc_section]

Scroll to Top