S R Dalvi (I) Foundation

Tr. Varsha Jagtap

Tr. Varsha Jagtap

आज आपण सौ. वर्षा जगताप यांच्या शिक्षिका होईपर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.शिक्षिका सौ.वर्षा या मुक्काम पोस्ट बेलसर तालुका पुरंदर जिल्हा पुणे ,मी उपशिक्षक या पदावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडीत खुर्द केंद्र गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यरत असून त्यांना गेले 12 वर्षांचा शैक्षणिक अनुभव आहे.

शिक्षिका वर्षा यांची मोठी बहीण व दाजी शिक्षक आहेत, तसेच त्यांना १ली पासून ते १२पर्यंत शिकविण्यास असणाऱ्या सर्व शिक्षकांमुळे त्यांना देखील शिक्षिका व्हावेसे वाटले. कारण शिक्षणक्षेत्र हे असे आहे की, की जेथे आपणास लहान मुलांवर संस्कार करून त्यांचा सामाजिक, भावनिक, बौद्धिक, शैक्षणिक विकास करुन  त्यांना उत्कृष्ट बनवायचे असते हे करत असताना आपल्याला इतर कोणत्याही क्षेत्रात मिळणार नाही असा अतिशय उत्तुंग असा आनंद मिळतो. असे त्यांचे मत आहे.

सुरूवातीला ‘शिक्षक’ क्षेत्र निवडताना अडचण:

‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना वर्षा यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागले नाही.कारण त्यांच्या घरातच शैक्षणिक वातावरण होते.त्यांचे आई-वडील, बहिण-भाऊ यांची इच्छा, प्रेरणा ,मार्गदर्शन यामुळे त्यांनी सहज या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आणि ही सेवा त्या मनापासून करत आहेत.  यातून त्यांना आनंद तर मिळतोच पण एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते.आपण उज्वल राष्ट्राचे भवितव्य घडवून एक उत्तम नागरिक बनवत आहोत ही भावना तसेच हे विचार मनाला प्रेरणा देऊन जातात. असे त्या म्हणाल्या.

अविस्मरणीय प्रसंग/ क्षण: 

 शिक्षक म्हणून १२ वर्षाच्या या प्रवासामध्ये शिक्षिका वर्षा यांना असे अनेक अनुभव आले जे अविस्मरणीय आहेत ज्यातून मुलांची त्यांच्या बद्दलचे प्रेम, आपुलकी जिव्हाळा, आदर, दिसून आला. बदली होऊन एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जात असताना मुलांची झालेली मनाची अवस्था तसेच शाळा सोडल्यानंतरही विद्यार्थ्यांचे येणारे फोन, एस.एम.एस यामुळे खूप छान वाटते,गोड आठवणी जाग्या होतात.

अचिव्हमेंट : 

– वसंतदादा पाटील प्रतिष्ठान पुरस्कार व छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानतर्फे मिळालेला पुरस्कार
– भिलारवाडीची शाळा ISO प्रमाणित झाली तसेच कोडीतखुर्द शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवर विविध स्पर्धेमध्ये मिळालेले पुरस्कार
– प्रमाणपत्र,शाळेला लायन्स क्लब,रोटरी क्लब, लोकसहभागातून मिळालेला उठाव, मदत

समाजात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी काय बदल होण्याची गरज:

”21व्या शतकात दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रातील समाजातील होणारे बदल शिक्षक, विद्यार्थी यांनी स्विकारून प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे” असे मत शिक्षिका सौ वर्षा जगताप यांनी व्यक्त केले.

शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना सल्ला: 

 शिक्षण  हे खूप पवित्र, उत्कृष्ट, समाज परिवर्तक असे क्षेत्र असून तुम्हीही या क्षेत्रात पाऊल ठेवून मनोभावे सेवा करावी व स्वतः लाही आनंदी,उत्साही सतत तजेलदार ठेवावे. असा सल्ला शिक्षिका वर्षा यांनी शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांना दिला.