आज आपण श्री.विजय भिवा गावडे ( एम.ए.डी.एड.) यांच्या शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. श्री विजय हे चौकूळ तालुका-सावंतवाडी जिल्हा-सिंधुदुर्ग येथील रहिवासी असून गेल्या २० वर्षांपासून ते शिक्षक म्हणून कार्य करत आहेत. आणि सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओटवणे नंबर 4 तालुका-सावंतवाडी येथे शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.
श्री. विजय यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती त्यामुळे बारावी नंतर पहिल्या वर्षी डीएड ला अॅडमिशन मिळून सुद्धा ते जाऊ शकलो नाही. पण त्या वर्षी रिकामी न राहाता मावशी कडे राहून त्यांनी ITI केले व पुन्हा डीएड साठी अर्ज केला. त्यांचे अॅडमिशन झाले खरे पण आर्थिक परिस्थिती मुळे काय करावे हा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यावेळी त्यांचा माझा भाऊ जो बेळगावला चहा विकून स्वतःचा व आमचा खर्च भागवत होता तो ठाम पणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला व त्यांना म्हणाला की, ‘काहीही झाले तरी तू शिक्षक व्हायलाच पाहिजे’. जो भाऊ त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे इयत्ता तिसरीतून शाळा सोडून बेळगावला हॉटेल मध्ये काम करण्यासाठी गेला होता. त्याने विजय यांना शिक्षक होण्यासाठी शक्य होईल तेवढी मदत केली.आणि मग अखेर अनेक अडचणी वर मात करत श्री विजय शिक्षक झाले.अविस्मरणीय प्रसंग/क्षण:
श्री. विजय यांना मिळालेली पहिली नोकरी ती ही धीरुभाई अंबानी विद्यालय लोधिवली येथे मिळालेली त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अविस्मरणीय क्षण आहे.
अचीवमेंट:
शिक्षक विजय हे शिकवत असलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षीत्यांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात. हीच त्यांच्यासाठी मोठी अचीवमेंट ते समजतात.
शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज वाटते:
काळानुसार जो शिक्षण क्षेत्रात व समाजात बदल होतो त्या नुसार अध्ययन अध्यापन पद्धती मध्ये बदल घडवून आणला पाहिजे.असे मत शिक्षक विजय यांनी मांडले.
शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना सल्ला:
शिक्षक पेशाकडे नोकरी किव्हा उदरनिर्वाहचे साधन म्हणून न पाहता सेवा म्हणून पाहावे.असा सल्ला शिक्षक विजय यांनी ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांना दिला.