S R Dalvi (I) Foundation

Tr. VIjay Pawbake

Tr. VIjay Pawbake

आज आपण श्री. विजय बाळासाहेब पावबाके (MA (Eng). DEd) यांचा शिक्षण होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. श्री विजय गेली १४ वर्ष ते शिक्षक म्हणून कार्यरत असून सध्या ते जि प शाळा गोवणे, ता डहाणू , जि पालघर इथे शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.
शालेय शिक्षण सुरू असल्यापासूनच विजय यांनी मोठे होऊन शिक्षकच  व्हायचे हे स्वप्न पाहिले होते . अन्य कोणत्याही क्षेत्रात जाण्याचा त्यांनी विचार केला नव्हता.‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी: 
विजय यांनी अभियंता क्षेत्रात जावे अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती. मात्र त्यांची इच्छा शिक्षण क्षेत्रात येण्याची असल्याने घरून पाठिंबा व सहकार्य मिळाले. पुण्यासारख्या शहरात DEd केल्यामुळे राहण्यासाठी सोयीची जागा मिळणे अशा छोट्या मोठ्या अडचणी त्यांना आल्या. आणि आर्थिक अडचण देखील होतीच. मात्र कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे सर्व सुरळीतपणे पार पडले. असे ते संगतात.

अविस्मरणीय प्रसंग/ क्षण:

एकूण सेवा कालावधीत अनेक छोटे मोठे अविस्मरणीय अनुभवविजय यांच्या आयुष्यात घडलेले आहेत.त्यातला काही त्यांनी आपल्यासाठी शेअर केला आहे.

विजय यांच्या सेवा कालावधीतील पहिली शाळा आदिवासी दुर्गम क्षेत्रातील धरणग्रस्त गावातील होती. त्यामुळे बाराही महिने बंधाऱ्यात पाणी असायचे. पावसाळ्यात तर भयंकर पूर असायचा. अशा परिस्थिती छोट्या लाकडी होडीतून ते सर्व शाळेत जात असत. हा अनुभव त्यांच्या आयुष्यात कधीच न विसरता येण्यासारखा आहे.
तसेच विद्यार्थी व शाळेच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवले त्याची दखल घेत राज्य शासनाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार देऊन पाठीवर कौतुकाची थाप दिली हा अनुभव देखील त्यांच्यासाठी अविस्मरणीय आहे.
याचबरोबर शिक्षक विजय आणि त्यांच्या विद्यार्थ्याने 2017 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ला गवसणी घातली तो क्षण देखील त्यांच्यासाठी विसरणे शक्य नाही.

लॉकडाउन च्या काळात विजय यांनी त्यांच्या संकल्पनेतून व पेंस फौंडेशन च्या माध्यमातून तालुक्यातील 5000 हुन अधिक पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षणासाठी साहित्य घरोघरी पोहचवले. या कार्यात त्यांना समन्वयक म्हणून काम करता आले हा अनुभव देखील कधीही न विसरता येण्यासारखा आहे असे ते सांगतात.

अचीवमेंट:
शिक्षक विजय यांच्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांचे यश हीच सर्वात मोठी उपलब्धता आहे. असे ते सांगतात 2017 मध्ये दीपेश नावाच्या त्यांच्या विद्यार्थ्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले तसेच 2021 मध्ये निमेश नावाच्या विद्यार्थ्याने काढलेल्या वारली चित्रास जपानकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विद्यार्थ्यांचे हे पुरस्कार त्यांच्यासाठी मोठी अचीवमेंट आहे.


शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज वाटते:

NEP नुसार शैक्षणिक क्षेत्रात भविष्यात अनेक सकारात्मक बदल होणे अपेक्षित आहे. त्या बदलांना सामोरे जाऊन अपेक्षित उद्दिष्टे  साध्य करण्यासाठी योग्य ते बदल शिक्षक व विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये करावे लागतील.तंत्रज्ञान व कौशल्य विकास याची योग्य सांगड घालून शिक्षण देणे व घेणे ही काळाची गरज आहे. असे मत शिक्षक विजय यांनी व्यक्त केले.शिक्षक व्हायचे आहे त्यांना सल्ला: 
शिक्षण क्षेत्र हे अन्य क्षेत्रांपेक्षा खूप वेगळे आहे. भरमसाठ संपत्ती कमावणे हे ज्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट असेल त्यांनी चुकूनही या क्षेत्रात येऊ नये. त्यासाठी अन्य क्षेत्रे खुली आहेत. शिक्षण क्षेत्रातील पावित्र्य जपणे ज्यांना शक्य आहे , सेवा भाव हा स्थायीभाव ज्यांच्याकडे आहे , बाल व विद्यार्थी मानसशास्त्राचा ज्यांना परिचय आहे , विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे अशा तरूणाईने या क्षेत्रात यावे. असे झाल्यास शिक्षण क्षेत्र एक नवी उंची गाठेल. असा सल्ला शिक्षक विजय यांनी शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांना दिला.
English Marathi