S R Dalvi (I) Foundation

Tr. Vikram Katkar

Tr. Vikram Katkar

शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो,
तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो

 
आज आपण विक्रम विलास काटकर (B.Sc./D.Ed / B.Ed / B.A./ M.Ed. यांच्या शिक्षक प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. विलास हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र पाली येथे राहत असून गेली 24 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. आणि सध्या ते पालीतील सुधागड एज्यु. सोसायटीच्या ग.बा. वडेर पाली या माध्यमिक शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
शिक्षक विलास यांना बालपणापासूनच विज्ञान आणि गणित या विषयाची आवड होती त्यामुळे S.S.C./H.S.C. नंतर त्यांची इंजिनिअरींगला जाण्याची खुप ईच्छा होती, पण घरची आर्थिक परिस्थिती आणि दहावीला असतानाच त्यांच्यावरचे पितृछत्र हरपले आणि दोन लहान बहिणीची आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या एकट्या आईवर पडली. त्यामुळे चांगले शिक्षण घेऊन नोकरी करावी आणि आपल्या आईची ईच्छा पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंगऐवजी त्यांनी डि.एड. करून शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पहिली काही वर्षे त्यांना नोकरीमध्ये रस वाटला नाही, मात्र शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आणि  विविध प्रकारच्या प्रशिक्षणामुळे विज्ञान शिक्षक म्हणून काम करताना त्यांना त्याच्यात रस वाटू लागला आणि वैज्ञानिक उपक्रम , प्रकल्प यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. अशाप्रकारे शिक्षकाचा पेशा खऱ्या अर्थाने त्यांनी स्वीकारला आणि आजपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी स्वतःजवळ असलेल्या कौशल्यांचा ते वापर करू लागले.

शिक्षक क्षेत्र निवडताना काही अडचणी 
हे क्षेत्र निवडताना शिक्षक विक्रम यांना अडचणी तशा फारश्या काही आल्या नाहीत कारण त्यांचे वडील ज्या संस्थेत प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत होते त्याच शाळेत डि.एड. शिक्षक म्हणून अनुकंपाखाली त्यांना नोकरी मिळाली होती. पण तेव्हा त्यांची शिक्षक म्हणून काम करण्याची मानसिकता नव्हती कारण बालपणी इंजिनिअर होण्याचे त्यांच स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं. मात्र काही वर्षानंतरच विद्यार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद , आदर , प्रेम यांचा इतका परिणाम त्यांच्यावर एवढा झाला कि शिक्षक म्हणून आपली जबाबदारी महत्वाची आहे असे त्यांना वाटू लागले आणि शिक्षकाची नोकरी ही इतर कोणत्याही नोकरीपेक्षा एक पाऊल पुढे आहे असा दृढ विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आणि शिक्षक म्हणून काम करण्यामध्ये त्यांना धन्यता वाटू लागली.

आतापर्यंतचा अविस्मरणीय क्षण 
वर्गशिक्षक / आपले आवडते शिक्षक म्हणून चिमुकल्यांनी (विद्यार्थ्यांनी) उत्स्फुर्तपणे साजरा केलेला शिक्षक विक्रम यांचा वाढदिवस ते आज ही विसरु शकलेले नाहीत.
तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत झालेली बदली आणि त्या बदलीमुळे विद्यार्थ्यांची पाहिलेली घालमेळ आणि आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दलचे प्रेम/आदर यामुळे ते भारावून गेले क्षण ही त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षणांमध्ये येतो.त्या दिवशी त्यांनी मनाशी निश्चय केला कि आपले ध्येय फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास आहे.
तसेच ज्यावेळी एखादा यशस्वी विद्यार्थी अशिर्वाद घेण्यासाठी आपल्या शिक्षकाकडे येतो त्यावेळचे क्षण हे अवस्मरणीय असतात आणि तो क्षण अभिमानाचा क्षण ठरतो.

 

शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे 
आजचे युग हे जागतिकीकरणाचे युग आहे. संपूर्ण जग हे एका छत्राखाली आलेले आहे . इंटरनेट,सोशल मिडिया-व्हाटस् अँप/फेसबूक/युट्यूब इन्स्टाग्राम /टवीटर इत्यादीमुळे माहितीचा खजिनाच आज माणसाला मिळाला आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात काम करत असताना अनेक बाबतीत बदल होण्याची गरज आहे असे शिक्षक विक्रम यांना वाटते. तसेच केवळ माहीती देणारा शिक्षक समाजाला विद्यार्थ्यांना नकोय गुगल बाबा काही सेकंदातच माहितीचा समुद्र ओपन करता त्यामुळे समाजिक मूल्यांची शिकवण देणारा , मूल्यशिक्षणाची शिकवण देणाऱ्या शिक्षकाची नितांत गरज आहे. तरच पुढील पिढी ही माणूसकीची जपणूक करणारी पिढी तयार होईल नाहीतर विनाश करणारी पिढी जन्माला येईल. असे मत ही शिक्षक विक्रम काटकार यांनी व्यक्त केले.