S R Dalvi (I) Foundation

Tr. Vivekanand Desale

Tr. Vivekanand Desale

मी श्री विवेकानंद मधुकर देसले. पदवीधर शिक्षक महाराष्ट्र विद्या मंदिर, सूत्रकार ,ता.तलासरी,जि.पालघर येथे गेल्या 22 वर्षापासून कार्यरत आहे .

शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?

माझ्या घरात माझे आई , बाबा, मामा, मावशी  शिक्षक क्षेत्रात होते त्यामुळे शिक्षक कार्याला मी खुप जवळून पाहिले आहे. मी 10 वीत असतांना अशा काही शाळा पहिल्या की जिथे विद्यार्थ्यांना शिक्षण चांगल्या पद्धतीने दिले जात नव्हते. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना शिकवलेले खरच त्यांच्यापर्यंत पोहचत हे ही बघितले जात नव्हते. तेव्हा आपण शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना ज्ञान द्यावे त्यांच्या पर्यंत योग्य प्रकारे शिक्षण पोहचवावे ,प्रामाणिकपणे अध्यापन करून मुलांचे भविष्य घडवावे ही इच्छा जास्त प्रभावीपणे जाणवू लागली.  तेव्हा मी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.

सुरवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?

अडचणी तश्या विशेष आल्या नाहीत पण सुरुवातीला घरापासून लांब तलासरी सारख्या अति दुर्गम भगत शिक्षकी पेशा स्वीकारताना पालक गावकरी विद्यार्थांची भाषा ,रीतिरिवाज समजून घेण्यास वेळ लागला. सुरवातीला विद्यार्थी म्हणावं तसा प्रतिसाद  ही देत नव्हते. शाळेत येण्यास टाळाटाळ  करायचे. विद्यार्थ्यांच्या पालकांची आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्याबाबत  उदासीनता असायची या आणि अशा बर्‍याच अडचणी  सुरुवातीला आल्या  होत्या मात्र काही  काळानंतर अनेक प्रयत्न करुन त्या सोडवण्यात आल्या.

शिक्षक म्हणून 22 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे

या प्रावसातील अनुभव भरपूर आहेत ,त्यातला एक आणि महत्वाचा सांगतो, 1999 ला मी जेव्हा शिक्षक म्हणून कामावर आलो ,त्या वर्षी विज्ञान प्रदर्शनात भाग घ्यावा असे ठरले .विद्यार्थ्यांनीची इच्छा होती प्रदर्शनात भाग घेण्याची  मात्र त्यात कोणता प्रकल्प मांडावा हे समजत नव्हते, मग विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गावात फिरत असताना काही लोकांनी नदी किनारी दारूच्या भट्ट्या लावलेल्या माझ्या पाहण्यात आल्या, तिथुन जात असताना ”गुरुजींना पहिल्या धारेची पेटणारी दारू द्या” हे शब्द माझ्या कानावर पडले नक्की काय  समजले नाही आणि माझी उत्सुकता वाढली. मग त्या लोकांनी सांगितल्या प्रमाणे ‘पहिल्या धारेची दारु’ काय  बघण्यासाठी मागवली आणि तिला आग लावली तर लगेचच ती  पेट्रोल सारखी पेटली, आणि माझ्या प्रकल्पाची आयडिया मला सुचली तेव्हा ठरवून टाकले की हाच प्रकल्प प्रदर्शनात मांडावा. नैसर्गिक रित्या पेट्रोल बनवणे हा प्रकल्प मांडला आम्ही सादर केला आणि जिल्हा स्तरावर आम्हाला परितोषिक ही मिळाले हा प्रसंग माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे.

तुमची आत्तापर्यंतची मोठी Achievement कोणती?

या वर्षी ( 2021 )  एस आर दळवी फाउंडेशन कडून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि ग्लोबल शिक्षक पुरस्कार विजेते  रणजीतसिंह देसले यांच्या हस्ते महाशिक्षक पुरस्कार मिळाला. ही माझ्यासाठी खुप मोठी  Achievement आहे.

समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे असे वाटते?

समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्यात समन्वय अजून असावा यासाठी पालकांनी शिक्षकांना , शाळेला सहकार्य केले तर शिक्षक विद्यार्थी यांचे नाते अजून घट्ट होईल असे मला वाटते आणि त्यामुळे अध्यापन अध्यान प्रक्रिया चांगली होईल.विद्यार्थ्यांना शिक्षा करू नका,रागवू नका पण काही वेळेस सौम्य शिक्षा करायला काही हरकत नाही असे ही मला वाटते.त्यामुळे विद्यार्थी अजून चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील .

ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?

ज्यांना भावी शिक्षक व्हायचे आहे ,ज्ञान दणाचे पवित्र काम करावयाचे आहे त्यांनी अशा ठिकाणी ज्ञान देण्याचे कार्य करावे जिथे गरीब , मागासलेले मुले आहेत त्यांना शिकण्याची खरोखरच इच्छा आहे.

English Marathi