S R Dalvi (I) Foundation

Tr. Vanita Lila Chandrabhan Dayate

Tr. Vanita Lila Chandrabhan Dayate

आज आपण श्रीमती.वनिता लिला चंद्रभान दयाटे (M.Sc(Chemistry),M.A(English),M.A.(Education),B.Ed,D.S.M,P.Hd in Education (continue) यांच्या शिक्षिका प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सौ. वनिता या औरंगाबाद येथे राहत असून त्यांना शैक्षणिक क्षेत्रात एकूण १८ वर्षांचा अनुभव आहे. सध्या त्या जिल्हा परिषद कन्या प्रशाला, वैजापूर,जिल्हा औरंगाबाद या शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

मला शिक्षक व्हावेसे मी 4थीत असताना वाटायचे.कारण आम्हाला 1ली ते 4 थी पर्यंत शिकविणारे श्री.पालवे गुरुजी खूप कडक शिस्तीचे व कर्तव्यनिष्ठ होते. त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची ते इतकी तयारी करून घेत की विद्यार्थी हुशार म्हणूनच गणले जायचे,कारण चार वर्षे मुल त्यांच्याकडे शिकत होते.त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून नेहमी वाटायचे की आपणही असेच काम करायचे.
प्रसंग:- ,मला चौथीच्या केंद्र परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम क्रमांक मिळाला त्या वेळेस मला माझाच खूप अभिमान वाटला,कारण गुरुजींची मुलगी देखील माझ्याच वर्गात होती,पण मला तिच्यापेक्षा जास्त गुण मिळाले होते व ते देखील मोठ्या मनाने माझे कौतुक करत.कारण माझी आई निरक्षर होती व परिस्थितीही अत्यंत हालाखीची होती. या प्रसंगाने मला जी माझ्यातील बुध्दीमत्तेची जाणीव करून देत माझ्यातील आत्मविश्वास वाढविला.

ज्या विद्यार्थ्यांना शिकविणे कठीण वाटते त्यांना कसे हाताळतात?
मुळातच माझी अशी धारणा होती की प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो,फक्त त्याचा ग्रहण कालावधी मात्र भिन्न असू शकतो.अशा विद्यार्थ्यांना मी अगदीं प्रेमाने, त्याच्या पालकांशी संपर्क साधत,त्याच्या पालकांना समजाऊन देत की खरेच तो करू शकतो,त्याच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत करत त्याला प्रेरणा देते की तू करू शकतोस.अशा प्रकारे अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असते.नॉर्मल विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्याकडे अधिक लक्ष देत त्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करता येईल,विविध शासकीय योजना कोणकोणत्या असतात याबाबत मार्गदर्शन करत त्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करते.

विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती ऐकवून,ती व्यक्ती किती संघर्षातून प्रयत्न करत यशाच्या शिखरावर पोहोचली हे उदाहरणांसह त्यांची जीवनचरित्र उलगडत समजाऊन सांगितले जाते.आणि त्यातूनच प्रेरणा घेत जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात.

कोणत्याही विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी फक्त विद्यार्थ्यांशीच संवाद साधून होत नाही तर त्यांच्या प्रगतीत त्यांची मनस्थिती जाणून घेण्यासाठी,त्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्या सहवासात असणाऱ्या त्यांच्या पालकांशी संपर्कात राहणे तितकेच महत्वाचे असते.मला विद्यार्थ्याच्या विकासासाठी पालकांशी संवाद साधणे गरजेचे असते.म्हणून माझ्यासमोर आलेले मुल घडविण्याच्या जबाबदारीत पालकांशी सुसंवाद साधणे मला गरजेचे वाटते म्हणून मी सतत पालकांच्या संपर्कात राहून संवाद साधत असते.अशा प्रकारे फक्त माझ्या शाळेत आहे तोपर्यंतच नाही तर विद्यार्थी यशोशिखरावर पोहोचेपर्यंत पालकांशी चांगले सुसंवाद साधत असते.अशा प्रकारे पालकांशी अतिशय स्नेहाचे संबंध साधलेले आहेत.

वर्गात अध्यापन करत असताना कृतियुक्त अध्यापन, आभासी पद्धतीने विविध animated video दाखवून तसेच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या साहाय्याने,तसेच field visit देऊन, प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने अध्यापन केले जाते.तसेच विविध तज्ज्ञांची ऑनलाईन,offline मार्गदर्शनाचे सत्र आयोजित करून तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

शिक्षण क्षेत्रातील पहिली achievement म्हणजे माध्यमिक शिक्षिका म्हणून जिल्हा परिषदेमध्ये नोकरी मिळणे.ही नोकरी करत असतानाच माझे शिक्षण चालूच आहे. मी नोकरी करत M.Sc केले,M.A.(Eng),M.A(Education) केले,तसेच Diploma In School Management केले .आणि हे करत करत सध्या शिक्षण क्षेत्रातील अत्युच्च पदवी म्हणजेच P.Hd. करिता admission मिळाले.अशा प्रकारे नोकरी करत मी शिक्षण घेतले.

तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी माझी achievement म्हणजे मी सध्या Departmental Exam मधून मी DEPUTY EDUCATION OFFICER या पदाची लेखी परिक्षा पास असून मुलाखतीची तयारी करत आहे.

तसेच ई -बालभारती व SCERT Pune द्वारे आयोजित इयत्ता 10 वीच्या वर्गासाठी Virtual Class जे उन्हाळ्यात 2 मे ते 10 जूनपर्यंत महाराष्ट्रातील एकूण 761 शालांकरिता घेण्यात आले,त्या Virtual Class घेण्याकरिता माझी निवड झाली.तसेच पुढील शैक्षणिक वर्षात होणाऱ्या इयत्ता 10 वी साठी पुन्हा Virtual Class घेण्याकरिता निवड झालेली आहे.

गेल्या 18वर्षापासून मी शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आले आहे.अनेक विद्यार्थी शासकीय नोकरी करत आहे,काही खाजगी क्षेत्रात शिक्षक,MNC companies मध्ये जॉब करत आहेत.काही उद्योग व्यवसायात स्थिरस्थावर झालेले आहेत.असेच एका सायंकाळी मला गंगापूरहून महालगाव येथे अर्जंट एका अंत्यविधीसाठी जायचे होते,आणि अंधार पडत होता व मिळेल त्या वाहनाने मला अंत्यविधीसाठी पोहोचणे आवश्यक होते.मी औरंगाबादहून येणाऱ्या बसमधून उतरून चौकातून रस्ता क्रॉस करत असताना एक जिप्सी आली,मी रस्ता क्रॉस करत आहे हे बघितल्यावर त्यांनी गाडी थांबविली,गाडीचे head light’s चालू असल्यामुळे गाडी ड्राईव्ह कोण करत आहे हे मला दिसत नव्हते,पण मी रस्ता क्रॉस करून झाल्यावर ती व्यक्ती निघणार होती पण मी लिफ्ट मागितली.अर्थात या सर्व प्रसंगात मी माझ्या चेहऱ्यावर पूणपणे स्कार्फ बांधलेला असल्यामुळे समोरील व्यक्तीला मी ओळखू आले नाही.मला ज्या ठिकाणी जायचे तेथील नाव सांगितल्यावर त्या व्यक्तीला मला ज्या ठिकाणी जायचे होते ते ठिकाण पुढे होते.ती व्यक्ती मला नकारच देणार होती परंतु मी म्हटले की मला या या ठिकाणी अर्जंट अंत्यविधीसाठी जायचे आहे. व व्यक्तीही मला ओळखीची वाटली.बऱ्याच वर्षांपासून प्रत्यक्ष न भेटल्यामुळे कधाचीत हा माझा विद्यार्थी असावा असा मला अंदांज आला. व मी म्हटले की तुम्ही मला तेथे सोडून द्या.त्यांनी मला गाडीत तर बसवून घेतले, व मी त्यांच्याशी बोलू लागले,अर्थात स्कर्फने चेहरा झाकलेलाच होता.पण अतिशय अदबीने मला विचारले की मॅडम मी तुम्हाला ओळखले नाही पण आवाज ओळखीचा वाटतो. आणि मग मी माझ्या चेहऱ्यावर असणारा स्कार्फ बाजूला केला.तेव्हा त्याला खूप आनंद झाला.त्या नंतरच्या पुढील प्रवासात त्याने शालेय जीवनापासून ते एक यशस्वी उद्योजक मी कसा घडलो हा त्याचा संपूर्ण जीवनप्रवास तर कथन केलाच परंतु त्यातही तुम्ही दिलेली संस्काराची शिदोरी मी आजही कशी वापरत आहे,त्यामुळे मी माझ्या या संघर्षमय प्रवासात यशस्वी झालो हे सांगितले.

सोबतच त्याचा जीवनप्रवास उलगडत असताना त्याने सांगितले की मॅडम मी कधीही जर कोणी महिला ,व्यक्ती रस्ता क्रॉस करत असेल तर थांबून घेतो.तसेच आजपर्यंत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून प्रवास करत असताना मी अनेक जणांना लिफ्ट देत असतो आजपर्यंत कधीही कुणाकडूनही पैसा घेतला नाही.त्याचे ते संस्कारक्षम वागणे मला खूपच भावले.

असे अनेक माझे संस्कारक्षम व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी ज्या ज्या वेळेस भेटतात,त्यावेळेस शिक्षकी पेशात असल्याचा सार्थ अभिमान वाटतो.