आज आपण सौ.अमृता लक्ष्मण भुमरे (HSC d.ed.,M.A.(pol sci),M.A.Eng) यांचा शिक्षक होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सौ. अमृता गेली ११ वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणी केंद्र नवगाव तालुका पैठण या शाळेत कार्य करत आहेत.
अमृता यांनी शिक्षिका व्हावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती म्हणून त्यांनी या क्षेत्राची निवड केली .
हे क्षेत्र निवडताना त्यांना खूप अडचणी आल्या . शिक्षणक्षेत्रातील काही शब्द , संकल्पना कधीही न ऐकलेल्या असल्याने त्यांना समजण्यास कठीण जात होते. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांसमोर बोलताना आत्मविश्वासपूर्वक बोलण्यात अडचणी येत होत्या. सूक्ष्म पाठ घेताना तर रडू येत होते.
शिक्षक म्हणून त्यांच्या प्रवासातील एक अविस्मरणीय क्षण त्यांना आपल्याला सांगायला आवडेल , एका वर्षी वार्षिक पाठ सर्वोत्कृष्ट पाठ म्हणून निवड झाली होती त्या वेळेस त्यांना खूप आनंद झाला होता .
माझा विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत अग्रेसर होत आहे याचा त्यांना आनंद आहे. अतिदुर्गम भागात देखील त्यांची शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणात अग्रेसर आहे हि त्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे .
शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी केवळ लिखाण व वाचन याच्याकडे अभ्यास म्हणून बघू नये तर उपक्रमातून, अनुभवातून व प्रयोगातून देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकते याचे महत्व विद्यार्थी ,शिक्षक तसेच पालक यांना सामाज्याला हवे. परंपरावादी शिक्षणाला फाटा देऊन नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धती अवलंबण्याचा प्रयत्न करावा. हा बदल समाजात व्हावा असे यांचे मत आहे .
शिक्षक होताना विद्यार्थ्यांना पचेल रुचेल आणि त्याच्या अनुभव विश्वासी साद घालणारे तसेच मातृभाषेतून समन्वय साधत इतर विषयाशी वलय निर्माण करून साध्या सोप्या पद्धतीने अनौपचारिक पद्धतीने सुविधा उपलब्ध करून द्याव्या असा मौल्यवान सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला आहे .