S R Dalvi (I) Foundation

Tr. Aparna Jamadar

Tr. Aparna Jamadar

आज आपण सौ .अपर्णा प्रतापसिंह जमादार ( M.L.T, B.A, Montessori Course, Craft Teacher Course)  यांचा शिक्षिका होण्यापर्यंतचा प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सौ .अपर्णा प्रतापसिंह जमादार या रत्नागिरी येथे राहत असून असून गेली १५ वर्षे त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
लहानपणापासूनच त्यांना कलेची आवड होती त्यांची आई आणि आजी भरत काम आणि पेंटिंग चे क्लासेस घ्यायचे ते बघून त्यांनाही आवड निर्माण झाली, तसेच त्यांनी BA  Psychology मधून केलं तेव्हा child Psychology चा अभ्यास करत असताना लहान मुलांसाठी काही करावं असं त्यांना खूप वाटलं.
शिक्षक हे क्षेत्र निवडताना त्यांना काही अडचणी आल्या नाहीत.

स्पर्धे निमित्त विद्यार्थ्यांना त्या पुण्याला घेऊन गेल्या होत्या, तिथे All Over India मधून त्यांचे विद्यार्थी  winner होते तेंव्हा आयोजकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचा उल्लेख ” रत्नागिरी के अनमोल रत्न ” असा केला तेंव्हा त्यांना खूप खूप समाधान वाटले व हा त्यांच्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरला.

त्यांचे विद्यार्थी AWIM COMPETITION मध्ये All Over India तून winner होते, तेव्हा आठ मुलांना रंगोत्सव स्पर्धेत Gold medal मिळाले,
मुलांच्या यशामुळे सलग तीन वर्ष त्यांना उपक्रमशिल शिक्षिका award मिळाले.
खरं तर आपण मार्गदर्शन केलेली मुलं आज मोठ्या पदावर नोकरी करतायत तर कोणी छान बिझनेस सांभाळतय हे बघून खूप छान वाटत आणि मुख्य म्हणजे ते आम्हाला विसरले नाहीत हीच खरी त्यांची मोठी Achievement आहे.

शिक्षकांना नवनिर्मितीची संधी मिळाली पाहीजे व विद्यार्थी हा संस्कारी अन् भावना प्रधान बनने आवश्यक आहे. Computer/mobile games/ माराहाणीचे/ horror movies मुले हल्ली सर्रास बघतांना दिसतात  त्यामुळे ते भावना हिन होत चाललेलेत, एक शिक्षक म्हणून वावरत असतांना हे  प्रकर्षाने जाणवते, त्याविषयी दखल घेणे खूप गरजेचे आहे असे त्यांना वाटते.

मुले ही अनुकरण प्रिय असतात त्यामुळे शिक्षकाचे व्यक्तिमत्व प्रभावशाली असणे गरजेचे असते, असे  म्हणतात ” Mother is a First Teacher but Teacher is a Second Mother” त्यामुळे हे एक मोठ्या जबाबदारीचे काम असते,
उद्याचा सुजाण नागरिक घडवण्याची संधीच शिक्षकाकडे असते.आपल्याला शिक्षक होण्याची संधी मिळत असेल तर आवश्य त्याचा उपयोग करून घ्यावा असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.

Scroll to Top