S R Dalvi (I) Foundation

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिलला भारतासह संपूर्ण जगभरात आनंद व उल्हासाने साजरी केली जाते. त्यांनी दीन-दुबळे व पीडित समाजाच्या मानवी हक्कांसाठी आत्मीयतेने काम केले.

वाचन व अभ्यासपूर्ण चिंतन या गुणांमुळे त्यांनी विविध क्षेत्रात आपले नेतृत्व प्रस्थापित केले.

१९११८  मध्ये ते सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये पॉलिटिकल इकॉनॉमीचे प्रोफेसर झाले.

१९३५ मध्ये बाबासाहेबांना मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले आणि दोन वर्षे त्या पदावर राहिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. तसेच ते अर्थशास्त्राचे गाढे व्यासंगी देखील होते. अर्थशास्त्रज्ञ म्हणून आंबेडकरांनी मोठे योगदान दिले आहे. संयुक्त राष्ट्राने आंबेडकरांना ‘विश्वाचा प्रणेता’ म्हणून संबोधले आहे.

‘स्वातंत्र्य,समता, बंधुता शिकवणारा धर्म मला प्रिय वाटतो’, ‘शिका,संघटित व्हा, संघर्ष करा’, ‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे’ या त्यांच्या गाजलेल्या घोषणा आहेत.

आजही त्यांच्या जन्मदिनानिम्मित त्यांचा विविध प्रकारे सन्मान करून त्यांना विशेष अभिवादने केली जातात.

समस्त मानव जातीच्या उद्धाराकरिता झटलेल्या या महामानवाचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील.

संघर्ष म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनाचा एक भाग होता, कारण त्यांनी जे काही साध्य केले, त्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागले. नवीन समाजव्यवस्थेसाठी केलेल्या अथक धर्मयुद्धानंतर त्यांचे स्मरण होत असतानाही, आपल्या मूलभूत मूल्यांची व्याख्या करणारे संविधान आपल्याला देण्यास भारतीय राष्ट्र नेहमीच त्यांचे ऋणी राहील.

अशा आदर्श व्यक्तीला आम्ही नमन करतो आणि त्यांचे मूल्य आणि शिकवणुक कायम लक्षात ठेवू.

Scroll to Top