S R Dalvi (I) Foundation

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मुलांना बराच मोकळा वेळ मिळाला आहे. आता त्यांना तयारी करायची आहे ती त्यांच्या भविष्याची. उच्च अभ्यासासाठी कोणता विषय निवडायचा, त्या करीता कोणते चांगले महाविद्यालय आहेत ह्याचा तर त्यांना अभ्यास करायचा आहेच. पण त्या बरोबर या मोकळ्या वेळेत त्यांनी फक्त सोशल मीडिया किंवा टीव्ही  किंवा गेम्स खेळून स्व: ताचा वेळ वाया घालवू नये.

या उलट ते आयुष्यातला हा महत्वाचा वेळ त्यांनी नव काही तरी शिकण्या करीता व्यतीत करावा. वेग वेगळ्या भाषांचा अभ्यास ते करू शकतात. सोशल मीडिया शेअर मार्केट, उद्योजकता, संगीत, एडिटिंग, लिखाण असे विविध विषयांचा अभ्यास करून त्यात पारंगत होऊ शकतात. त्यांच्या आवडीच्या विषयात ते काम करू शकतात. किंवा कोणत्या कंपनी मद्ये internship करू शकता, जिकडे तुम्हाला बरच काही शिकायला मिळेल. त्याच बरोबर स्व: ताचा काही उद्योग उभारू शकता. तरुण पिढीमध्ये ऊर्जा आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता असते. या गोष्टीचा त्यांनी उपयोग करून त्यांचा हा वेळ सत्करमी लावायला हवा.

माझ्या तरुण मित्रांनो आता तुम्ही घरी आणि शाळेत एक सुरक्षित आयुष जगत आहात. तुमच्यावर आता जास्त जबाबदाऱ्या नाही आहेतं. तेव्हा या काळात तुम्ही स्व: ताला explore करा. अनुभवी लोकांशी गप्पा मारा, त्यांच्या अनुभवातून शिका आणि स्व: ताचे आयुष चांगले घडवा.

Scroll to Top