S R Dalvi (I) Foundation

पेला खाली ठेवा

एका शिक्षकाने पाण्याने भरलेला पेला हातात घेऊन आपल्या वर्गातील शिकवणी ला सुरुवात केली.

त्याने तो पेला हातात वर उचलून सर्व विद्यार्थ्यांना दाखवला आणि विचारले की या पेल्याचे चे वजन किती ?

५० ग्राम…. १०० ग्राम ….१२५ ग्राम विद्यार्थ्यांनी उत्तर दिले.

जोपर्यंत मी या पेल्याचं वजन करत नाही तोपर्यंत मला हे कसे कळणार की त्याचे वजन किती. ” शिक्षक म्हणाला ” पण  माझा प्रश्न काय आहे.

जर मी हा पेला थोडा वेळ असाच उचलून धरून ठेवला  तर काय होईल ?

काहीच नाही होणार, असे विद्यार्थी म्हणाले.

हा पेला मी अजून एक तास उचलून ठेवलं तर काय होईल? असे शिक्षकाने विचारले.

तुमचा हात दुखेल.  असे एक विद्यार्थी म्हणाला.

खरे आहे पण हा पेला मी पूर्ण एक दिवस हातात धरून ठेवला तर काय होईल ?

तुमचा हात सुन्न होऊ शकतो, तुमच्या मांशपेशिंवर खूप ताण येऊ शकतो , हाताला लकवा मारू शकतो आणि यामुळे तुम्हाला हॉस्पिटल मध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. .. असे एक विद्यार्थी म्हणाला आणि त्याच्या या बोलण्यावर काही विद्यार्थी हसू लागले.

खूपच छान पण या क्रियेमध्ये पेल्याचे वजन बदलले का ?  शिक्षक म्हणाले.

उत्तर आलं…” नाही”

तर मग हात दुखून, माझ्या माशपेशींवर ताण का आला ?

विद्यार्थी या गोष्टीचे आश्चर्य वाटले.

शिक्षकाने पुन्हा विद्यार्थ्यांना विचारले या दुःखातून सावरण्यासाठी मी काय करू ?

पेल्याला खाली ठेवा.  एक विद्यार्थी म्हणाला.

” अगदी बरोबर ” शिक्षक म्हणाला.

जीवनात येणाऱ्या समस्या पण काहीशा अशाच आहेत.

या समस्या काही क्षण डोक्यात ठेवल्या तर तुम्हाला वाटेल सर्व ठीक आहे.

पण पुन्हा याच समस्या खूप वेळ तुमच्या डोक्यात ठेवा. जर तुम्ही या समस्या खूप वेळ डोक्यात ठेवल्या तर त्या तुम्हाला अपंग करतील आणि मग तुम्ही काहीच करू शकणार नाही.

आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांवर विचार करण्याची गरज आहे पण जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा या समस्यांवर जास्त विचार करू नये. यामुळे तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि येणाऱ्या काही समस्यांना सामोरे जाण्याची तुम्हाला शक्ती मिळेल.

कोणतेही संकट किती काळ तुमच्या सोबत ठेवायचं हे तुम्हाला ठेवायचं.

Scroll to Top