S R Dalvi (I) Foundation

मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा – महात्मा ज्योतिबा फुले

अशा थोर व्यक्तीला त्यांच्या जयंती निमित्त सादर प्रणाम 🙏

ते होते म्हणून समाज बद्दलेले – घडले.

महात्मा फुले यांचे विचार आणि कृती आजही अनेकांना प्रेरणा देते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेले काम हे इतिहासाच्या पानावर नेहमीच अतुलनीय ठरले आहे.  त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यासोबतच त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यातील विचार आजही प्रेरणादाई आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार – स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रयीवर नितांत भरवसा ठेवणारे आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठविणारे म. फुले हे महापुरुष होते. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून ओळखले जाते. ते मानवतावादी विचाराचे होते. त्यांनी मेकॉलेच्या खलित्यास कडाडून विरोध ‘शिक्षण हे वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत पाझरत आले पाहिजे’ या विचारास फुलेंचा विरोध होता कारण इंग्रजाचा भर प्रथम वरचा वर्ग शिकला पाहिजे व नंतर खालचा वर्ग शिकावा यावर होता. ‘प्रथम खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण देऊन नंतर वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण दयावे ‘आधी कळस मग पाया असे न होता, आधी पाया मग कळस’ अशा पद्धतीने शिक्षणप्रणाली असण्यावर म. फुलेंचा आग्रह होता. प्रथम उपेक्षितांना शिक्षण नंतर अपेक्षितांना शिक्षण’ हे सूत्र अंमलात आणावे, यावर भर देण्यात आला.

महात्मा फुलेंचे शिक्षण विषयक विचार

→ स्त्री शिक्षणाचा पाठपुरावा

→ प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत

→ प्रशिक्षित शिक्षकाची तरतूद करणे

→ प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देणे

→ ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण

→ राष्ट्रनिर्माणासाठी शुद्रांना शिक्षण

→ शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल विचार

→ व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण

→ त्रिभाषा सूत्राचा अवलंब

→ शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा

→ शिक्षणविषयक ज्ञान व विचार

Scroll to Top