S R Dalvi (I) Foundation

योग करण्याचे फायदे

Benefits of doing yoga

आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. 2015 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू करण्यात आला, तेव्हापासून दरवर्षी 21 जून रोजी जगभरात योग दिवस साजरा केला जातो. मानवी शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. 

योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये शरीराची लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याचा यामध्ये समावेश आहे. तसेच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करणे आणि झोपेत सुधारणा करण्यासाठी योग महत्वाची भूमिका बजावतात.

योगाचे फायदे –

  • लवचिकता

योग तुमची हालचाल आणि लवचिकता वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमच्या शाररीक वेदना कमी होण्यास आणि एकूण गतिशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.

  • मजबूत स्नायू –

योगामुळे तुमचे स्नायू बळकट होण्यास मदत होते, तुमच्या मुख्य स्नायूंसह, ज्यामुळे तुमची मुद्रा आणि संतुलन सुधारू शकते.

  • तणाव कमी होतो –

योगामुळे मन आणि शरीर शांत होऊन तणाव कमी होण्यास मदत होते.

  • झोप सुधारते –

योगामुळे शरीर आणि मन शांत होऊन शांत झोप घेता येऊ शकते.

  • ऊर्जा वाढते-

योगासने रक्ताभिसरण सुधारून आणि थकवा कमी करून ऊर्जा पातळी वाढविण्यात मदत करू शकतात.

  • वजन कमी होणे –

योग कॅलरी बर्न करते आणि चयापचय सुधारधे ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

  • मानसिक संतुलन सुधारते –

योगामुळे चिंता, नैराश्य आणि तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

तणावापसून मुक्ती

नियमित योगा केल्याने मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी उठून तुम्ही जर प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर, पूर्ण दिवस तुम्हाला नक्कीच आनंद आणि उत्साही वाटेल.

वृद्धापकाळात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी

आपण तरूण असतो. तरूण असताना प्रकृतीही साथ देत असते. त्यामुळे शरीर कोणत्याही किरकोळ तक्रारी, आजाराशी झुंजायला तयार असते. पण, जसजसे वय वढू लागते तसतसे शरीरावर मर्यादा येतात. पण, तुम्ही जर सुरूवातीपासूनच योगा करत असाल तर, तुमची ही साधना वृद्धापकाळात कामी येऊ शकते. वृद्धापकाळात आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यसाठी नियमित योगा करा. 

शरीरातील साखर नियंत्रण

आजकाल कमी वयातही मधुमेहाची लागण झालेले अनेक लोक आपल्याला पहायला मिळतील. शरीरातील इन्सूलीनची निर्मिती होण्याचे प्रमाण घटले की शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. अशा वेळी हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा महत्त्वाची भूमिका पार पाढतो.

वजन नियंत्रणासाठी महत्त्वाचे

वाढता स्थूलपणा हा तुमच्या कार्यक्षमतेवर मर्यादा घालतोच. पण, अनेक आजारांनाही निमंण देतो. म्हणून नियमित योगा करत चला. नियमित योगा करण्याने शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी वाढत्या शारीरिक वजनाला मर्यादा पडतात. 

रक्ताभीसरण 

योगामुळे शरीराच्या सर्व अवयवांना चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाणे होण्यास मदत होते. योगामुळे श्वासोच्छवास योग्य पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे शरीरिरातील रक्ताभिसरण गतिमान होते. 

दरम्यान, नियमित योगा करण्याचे फायदे असे आकडेवारीने मुद्देसुद सांगता येत नाही. त्याला मर्यादा पडतात. पण, तुम्ही नियमित योगा करून योगाचे असंख्य फायदे स्वत: अनुभवऊ शकता.

Scroll to Top