S R Dalvi (I) Foundation

अभ्यास करताना मन एकाग्र होत नाही?

Can’t concentrate while studying?

जेव्हा काही मुलांना अभ्यास करायचा असतो, पण ते त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, तेव्हा त्यांना अभ्यासाकडे नैसर्गिक कल वाढवण्यास मदत करणे महत्त्वाचे असते. खूप अभ्यास करावा वाटतोय पण तुमचे लक्ष केंद्रित होत नाही आहे?अभ्यास करण्याची इच्छा होत नाही आहे? कधीकधी तुम्ही कारणेही देता की “मी खूप व्यस्त आहे” किंवा “माझ्याकडे वेळ नाही.” अभ्यास करताना मन एकाग्र करण्यासाठी आपण काय करू शकतो ते आज आपण पाहुयात.

जर तुम्ही फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास केलात तर तुमचे मन शिकण्यावर केंद्रित होणार नाही. जर शिकण्याचे मुख्य ध्येय ज्ञान मिळवणे असेल तर अभ्यास करणे ही एक मजेदार प्रक्रिया आहे. प्रत्येक दिवसाच्या अभ्यासासाठी एक योजना बनवा आणि शक्य तितकी तुमची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करा. अभ्यास वेळेवर पूर्ण झाल्यास स्वतःला बक्षीस द्या.

बरेच जण अभ्यास करत असताना यशस्वी होण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत असतात. अभ्यास करताना जर तुम्ही यशापयशाचा विचार करत राहिलात तर तुमचं अभ्यासात लक्ष केंद्रित होणार नाही. ही समस्या असलेल्या मुलांनी सध्याच्या क्षणी काय घडत आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर तुम्ही वेळापत्रक बनवून ठराविक वेळेनंतर विषयात बदल केलात तर तुमची अभ्यासातील एकाग्रता टिकून राहते.

जेव्हा तुम्ही एखादी नवीन संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा तिचा अर्थ काय हे तुम्हाला समजत नसेल तर त्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्याचा एक मार्ग म्हणजे नवीन संकल्पना तुम्हाला माहित असलेल्या रोजच्या जोवनातील गोष्टीशी जोडणे.

दिवसात एक वेळ अशी असते जेव्हा तुम्ही सर्वात जास्त लक्ष केंद्रित करता आणि शिकण्यास सक्षम असता. प्रत्येकाचा “प्राइम टाइम” वेगळा असतो, त्यामुळे तो शोधणे आणि त्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे.

मोबाईल फोन, टीव्ही, फेसबुक आणि इतर कार्यक्रम यासारख्या गोष्टी टाळा. जेव्हा तुम्ही विचलित व्हाल तेव्हा ध्यान, प्राणायाम आणि आत्म-संमोहन तुम्हाला तुमचे मन पुन्हा केंद्रित करण्यास मदत करू शकते.

Scroll to Top