S R Dalvi (I) Foundation

‘या’ 5 गोष्टी तुम्हाला सर्वोत्तम शिक्षक बनवू शकतात

Topic: Here are 5 things you can do to become a better teacher

ज्ञानाचा विषय असो, क्षमतेचा विषय असो किंवा मग उत्तम व्यक्ती होण्याचा विषय असो, या सर्व बाबतीत शिक्षक आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. पण ज्ञानासोबत आणखीही काही अशा काही क्षमता आहेत ज्या शिक्षकाला स्वतःमध्ये सर्वोत्तम आणि विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक बनवतात.
आज आपण जाणून घेऊयात असे 5 महत्वाचे गुण जे तुम्हाला उत्तम शिक्षक बनवू शकतात.

ज्ञान – शिक्षक असल्याने तुम्हाला तुमच्या विषयाशी संबंधित सर्व माहिती माहीत असणे आवश्यक आहे. याशिवाय चालू विषयांचे ज्ञान असणेही तितकेच महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देता येतील.

सादरीकरण – शिक्षक होण्यासाठी ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. तय पेक्षा ही जास्त महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग.कारण प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिक पातळी वेगळी असते त्यामुळे शिक्षकाचे त्याच्या विषयातील सादरीकरण हे प्रत्येकाला सहज समजेल असे असावे.

मैत्रीपूर्ण स्वभाव – शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात शिस्त आवश्यक आहे, परंतु वेळेनुसार त्यांच्यात मैत्रीपूर्ण वर्तनाची गरज आहे. हे तुम्हाला विद्यार्थ्यांना समजून घेण्यास मदत करेल आणि त्यांना समजणे ही सोपे होईल. आणि यामुळे विद्यार्थी अंतर्मुखविद्यार्थी ही खुलेले आणि त्यांची भीती ही दूर होईल.

जीवनाचे आकलन – एक चांगला शिक्षक तोच असतो जो आपल्या विद्यार्थ्याला जीवनात मार्गदर्शन, चांगल्या आणि वाईटाची ओळख, उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक गोष्टी, वागणूक आणि माणुसकी शिकवतो कारण या जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामुळे जर मुल अभ्यास करत नसेल तर त्याला समजावून सांगा की तो जीवनात सर्वोत्तम करू शकतो आणि आयुष्य हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित नाही, त्यापेक्षाही बरेच काही आहे.

अनुभव आणि उदाहरणे – विषयाशी संबंधित माहितीच नाही तर तुमचे अनुभवही विद्यार्थ्यांसोबत शेअर करा.हे तुम्हाला त्यांच्याशी चांगले संबंध तयार करण्यास मदत करेल. उदाहरण देऊन जर तुम्ही एखादी गोष्ट विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्यास, मुलांना ते बर्याच काळासाठी लक्षात राहील.

Scroll to Top