S R Dalvi (I) Foundation

शिक्षकांनी आपल्या घशाची काळजी घरच्या घरी कशी घ्यावी? वाचा सविस्तर

Topic: how to take care of your throat in Marathi  

शिक्षक हा असा पेशा आहे की ज्यात बुद्धिबरोबर सर्वात जास्त गरज पडते ती अर्थात त्यांच्या आवाजाची. शिक्षकांना घसा खराब होऊन चालत नाही. शिक्षकाचा आवाज नेहमी खणखणीत आणि चांगला राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या घशाची म्हणजेच गळ्याची काळजी घेणे खुप महत्वाचे असते.जर तुम्ही शिक्षक असाल आणि तुमचा आवाज वातवरणामुळे किंवा इतर कारणामुळे खराब झाला असेल तर आज आपण पाहणार काही घरगुती उपाय जे तुमच्या घशाला आराम देतील आणि  तुमचा आवाज पूर्ववत होण्यास मदत होईल.

मसाला चहाचे सेवन करा: लवंग, तुळस, आले आणि काळी मिरी पाण्यात उकळा, त्यानंतर त्यात चहाची पाने टाकून चहा बनवा. हा चहा गरमागरम प्या. हा घशासाठी खूप फायदेशीर उपाय आहे.

आले घातलेल्या पाण्याचे सेवन करा:आल्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म घशातील संसर्ग आणि वेदनांपासून आराम देतात. एक कप पाण्यात आले उकळा. हलके कोमट केल्यानंतर त्यात मध घालून दोनदा प्या.

वाफ घेणे: कधी-कधी घसा कोरडा पडल्याने घशाच्या संसर्गाचीही तक्रार असते. अशा स्थितीत एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या आणि टॉवेलने तोंड झाकून वाफ घ्या.

लसूण:लसूण संसर्गास कारणीभूत बॅक्टेरिया नष्ट करतो. त्यामुळे घसादुखीवर लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात असलेले ऍलिसिन हे बॅक्टेरिया नष्ट करते तसेच घशातील जळजळ आणि वेदना कमी करते. उपचारासाठी लसणाची एक एक पाकळी गालाच्या दोन्ही बाजूंना हळू हळू चोखत रहा.

कोमट पाणी आणि मीठाच्या गुळना :जेव्हा घसा खवखवतो तेव्हा श्लेष्मल झिल्लीच्या पेशी सूजतात. मीठ जळजळ कमी करते, ज्यामुळे वेदना कमी होते. उपचारासाठी, एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचे मीठ विरघळवून घ्या आणि या पाण्याने गार्गल करा. ही प्रक्रिया दिवसातून तीन वेळा करा.

Scroll to Top