S R Dalvi (I) Foundation

पेरणीसाठी जमिनीत किती ओल असली पाहिजे? पेरणीसाठी सर्वांत योग्य वेळ कोणती?

How wet should the seed be? What is the best time to sow?

राज्यभरातील शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत. शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होऊन 5 दिवस उलटले आहेत. तरीही म्हणावा तसा पाऊस न पडल्यानं खरिप हंगामातील पेरणी रखडली आहे.

पाऊस पडला की बहुसंख्य शेतकरी पेरणीस सुरुवात करतील. पण, शेतकऱ्यांनी पाऊस नेमका किती पडला, हे तपासून पेरणी करणं गरेजचं आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत चांगली ओल निर्माण झाल्यासच पेरणी करावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. “दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडल्यास आणि 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करावी. “कारण, इतक्या प्रमाणात पाऊस झाला तर जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा तयार होत असतो. त्याआधी पेरणी करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये.”

जमिनीत दोन ते अडीच फुटापर्यंत खोल माती ओली असली पाहिजे. तेव्हाच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. नाहीतर पावसानं पुन्हा उघडीप दिली, तर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं.

पेरणीच्या आधी काय करावं?

पेरणी करण्याआधीच आपण जे बियाणं पेरणार आहोत, त्या बियाण्यांची उगवण क्षमता शेतकऱ्यांनी तपासून पाहायला हवी.

म्हणजे एखाद्या बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे, ते तपासायला हवं.

यासाठीची सगळ्यात सोपी पद्धत आहे ती गोणपाट पद्धत. या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता तपासू शकतात.

पिकांवर येणारे संभाव्य कीड, रोग याचा बंदोबस्त करणारी उपाययोजना म्हणजे बीज प्रक्रिया.

त्यामुळे पेरणीआधी बीज प्रक्रिया करुन घ्या, असं आवाहन कृषी विभागाकडून केलं जातं.

बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकांवर मर, करपा असे संभाव्य रोग येत नाहीत. खोडमाशी, खोडकिडी सारख्या किडी येत नाहीत.

पेरणी कधीपर्यंत करता येऊ शकते, हे पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याचं कृषी विभागातील अधिकारी सांगतात.

कपाशीची पेरणी 15 जुलै नंतर चालत नाही. सोयाबीन, तुरीच्या पेरणीला थोडा उशीर चालू शकतो. पण, ज्यांना सोयाबीनची काढणी केल्यानंतर त्या जमिनीवर हरभरा पेरायचा आहे, त्यांना मा

खरिप हंगामात वेगवेगळ्या पिकांसाठी 7 जून ते 15 जुलैपर्यंत पेरणी करता येते. पण, काही पिकांच्या बाबतीत उदा. बाजरीसारख्या पिकांच्या बाबतीत पेरणी 15 जुलैच्या पुढे गेल्यास उत्पादनात घट होऊ शकते. सोयाबीन, बाजरी, तूर या पिकांच्या बाबतीत पेरणी 7 जून ते 15 जुलैपर्यंत करता येते.”

जून महिन्याच्या शेवटापर्यंत पावसाचं नेमकं चित्र स्पष्ट होईल. पण, जिथं 100 मिलीमीटर पाऊस पडेल, जमिनीत ओल असेल, तिथं शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यायला हरकत नाही. सोयाबीनची पेरणी करण्यासाठी उशीर चालत नाही. “सामान्यपणे कपाशी सोडली, तर जून संपेपर्यंत इतर सगळ्या पिकांच्या पेरण्या होणं आवश्यक आहे.”

Scroll to Top