S R Dalvi (I) Foundation

वाचलेला अभ्यास कसा लक्षात ठेवाल? शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी उपयुक्त टिप्स !

Topic: How will you remember the study you read? Useful tips for both teachers and students!

शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांसाठी एखादी वाचलेली गोष्ट लक्षात ठेवणे खुप महत्वाचे आहे. अभ्यास हा केवळ विद्यार्थ्यांनाच नाही त्या आधी शिक्षकांना करावा लागतो. जर शिक्षक नीट वाचलेला अभ्यास लक्षात ठेऊ शकले नाही तर ते विद्यार्थ्यांना चांगले शिकवू ही शकणार नाहीत. त्यामुळे वाचलेल्या गोष्टी लक्षात ठेवणे हा एक मोठा टास्क आहे. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही केलेला अभ्यास, वाचलेल्या  गोष्टी कशा ठेवू शकाल यासाठी काही सोप्या टिप्स.

आधी नीट समजून घ्या: एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आधी नीट समजून घेणे गरजेचे आणि महत्वाचे आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वाचाल ती सुरुवातीला समजून घ्या. तरच ते लक्षात ठेवणे जास्त सोपे जाईल.  

किमान दोनदा वाचा: वाचलेली गोष्ट नीट लक्षात ठेवण्यासाठी किमान मन लावून दोनदा वाचा जेणेकरून ती तुमच्या चांगली लक्षात राहण्यास मदत होईल. 

पॉइंट्स काढायची सवय लावा: लक्षात ठेवण्याच्या गोष्टींचे पॉइंट्स काढून ठेवणे ही खुप चांगली सवय आहे. बऱ्याचदा आपल्या लक्षात राहील असे समजून आपण वाचून सोडून देतो मात्र जेव्हा ती गोष्ट आठवायची असते नेमकी तेव्हाच आठवत नाही. त्यामुळे वाचताना त्याचे की पॉइंट्स म्हणजे महत्वाचे पॉइंट्स लिहून ठेवायची सवय लावून घ्या.  

Scroll to Top