S R Dalvi (I) Foundation

पावसाळ्यात मुंबईत नेहमीच पाणी का साचतं? ते टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?

In the rainy season Why is there always water accumulating in Mumbai? What measures should be taken to avoid it?

जगाच्या, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असणार हे शहर मुंबई. दर पावसाळ्यात मोठ्या संकटाला सामोरं जात असतं.

मुंबईतील नद्यांचं काटेकोर व्यवस्थापन आवश्यक

दहिसर, मिठी, ओशिवरा आणि पोयसर अशा चार नद्या मुंबईत आहेत. शिवाय, तानसा, वैतरणा, उल्हास या नद्या मुंबईच्या जवळून वाहतात. मुंबईतील नद्यांचा विचार केला असात या नद्यांचं नाल्यांमध्ये रूपांतर झाल्याचं दिसतं.मुंबईतील नद्यांचं मॅपिंग करणं आवश्यक आहे. मुंबई महापालिकेने जाणकारांच्या मदतीने तयार कलेल्या ‘ब्रिमस्टोवॅड’ योजनेतही नद्यांसंदर्भात महत्त्वाची शिफारस करण्यात आली होती. पावसाचं पाणी सहज वाहून जावं यासाठी नद्या आणि नाल्यांची पात्रं रुंद आणि खोल करावी, नद्या -नाल्यांच्या काठावर संरक्षक भिंत उभारावी, अशी शिफारस ‘ब्रिमस्टोवॅड’ योजनेत करण्यात आली आहे.

नियोजनबद्ध नालेसफाई

मुंबईतील नाल्यांची सफाई तुलनेने लवकर व्हायला हवी. शिवाय, नालेसफाई केल्यानंतर गाळ काठावरच ठेवला जातो. या गाळाची योग्य विल्हेवाट लावणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन नाले तुंबण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

नॅचरल ड्रेनेजशी छेडछाड थांबवायला हवी

मुंबईतील जे नॅचरल ड्रेनेज आहेत, त्यांच्याशी छेडाछाड करण्यात आली आहे. शिवाय, इमारती किंवा इतर बांधकामांचे अतिक्रमण करून त्यांना संकुचित करण्यात आलं आहे. या नॅचरल ड्रेनेजशी छेडछाड करणं सर्वांत आधी थांबवलं पाहिजे.

मुंबईच्या मूळ नकाशाचं मॅपिंग व्हावं

मुंबईतील हिंदमाता, मिलन सबवे, दादर, माहीम इत्यादी काही ठिकाणी दरवर्षी पाणी तुंबतं. तसंच, दरवर्षी पाणी तुंबण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसतं. मुंबईच्या सखल भागात पाणी साचतं. त्यामुळे मूळ नकाशाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. हे केल्यास कुठल्या भागात पाणी साचण्याची जास्त शक्यता आहे, हे कळण्यास मदत होईल.

दूरदृष्टीची गरज

मुंबईसारख्या शहराला नियोजनाच्या दृष्टीने व्हिजनची आवश्यकता आहे. मात्र, त्याची मोठी कमतरता जाणवते. हे व्हिजन केवळ प्रशासन किंवा सरकारचं असून चालणार नाही, तर नागरिकांमध्येही असायला हवं. सगळ्यांनीच जबाबदारीने शहराच्या आरोग्याकडे लक्ष दिलं, तर नक्कीच फरक पडू शकतो.

यंत्रणांच्या समन्वयाची गरज

मुंबई शहराच्या विविध गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत. या सर्व यंत्रणांचा कमी-अधिक प्रमाणात शहरांच्या व्यवस्थापनाशी संबंध येत असतो. या सर्व यंत्रणांमधील समन्वय कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे.

काँक्रिटीकरण थांबवायला हवं

मुंबईचा काँक्रिटीकरणरुपी विकास थांबवायला हवा. मेट्रो प्रकल्प आणि त्यातही ‘मेट्रो-३’ हा भुयारी रेल्वे प्रकल्प आणि ‘सागरी रस्ता’ हे प्रकल्प ताबडतोब रद्द करण्याची गरज आहे.

अहवाल, योजना आणि आराखडे काय सांगतात?

मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याशी संबंधी ब्रिमस्टोवॅड योजना (1993), डॉ. माधवराव चितळे समितीचा अहवाल (2006) आणि आआयटी पवईने तयार केलेला कृती आराखडा (2006) महत्त्वाचा मानला जातो. यांमधील शिफारशी मुंबईच्या जलआपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात.

‘ब्रिमस्टोवॅड’ योजनेत नेमकं काय होतं?

1985 सालीही मुंबईत प्रचंड प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यानंतर नव्वदच्या दशकात मुंबई महापालिकेने शहर नियोजनासंदर्भात अभ्यासासाठी जाणकरांना एकत्र करुन योजना आखली.

बृहन्मुंबई स्टॉर्म वॉटर ड्रेनेज (BRIMSTOWAD) असं त्या योजनेचं नाव.या जाणकारांनी 1993 साली अहवाल सादर केला होता.

या अहवालात मुंबईच्या नियोजनसंदर्भातील अत्यंत मुलभूत आणि महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या होत्या.

ब्रिमस्टोवॅडने केलेल्या शिफारसी

पावसाचं पाणी सहज वाहून जावं यासाठी नद्या आणि नाल्यांची पात्रं रुंद आणि खोल करावी

नद्या -नाल्यांच्या काठावर संरक्षक भिंत उभाराव्यात

भूमिगत गटारांचं जाळ अधिक बळकट करावं

ज्या सखल भागात पाणी साचतं, अशा आठ ठिकाणी पंपिंग व्यवस्था सुरु करावीn’ब्रिमस्टोवॅड’ योजनेला सुद्धा शासन-प्रशासनाकडून गांभिर्याने घेतलं जात नाही.

Scroll to Top