Topic: Paper leakers in Maharashtra will be punished
राज्यात सध्या 10वी (SSC) च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. त्यातच हल्ली बोर्डाच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकारणावर आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी भाष्य केले आहे.महाराष्ट्राच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी सांगितले की, इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सरकार शाळेची नोंदणी निलंबित करेल. विधान परिषदेत काही सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली. मंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, अहमदनगरमधील एका शाळेने ज्या शाळेने विद्यार्थ्यांना उत्तरे कॉपी करण्याची परवानगी दिली आहे, त्यांची नोंदणी रद्द केली जाईल. याबाबत लवकरच अधिकृत आदेश काढण्यात येणार आहे.
वर्षा गायकवाड असे ही म्हणाल्या की, “कोणत्याही शाळेत इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार आढळून आल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल. जर एखाद्या शाळेने विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान उत्तरे कॉपी करण्याची परवानगी दिली, तर पुढील वेळी शिक्षण विभाग तेथे परीक्षा घेणार नाही.असे ही त्या म्हणाल्या. प्रत्येक शाळेत आता परीक्षा केंद्र असल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आधीच गृह विभागाला परीक्षा आयोजित करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्याची विनंती केली आहे.