S R Dalvi (I) Foundation

मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

Savitribai Phule Scholarship Scheme for Girls

अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी फुले दांम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली.  शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातील स्त्रीदास्यत्व मिटवण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरून स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खर्‍या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही.

योजनेचा उद्देश :
मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कधी करण्याच्या हेतूने इ.५ वी ते इ.७ वीतील  मुलींसाठी १९९५-९६ पासून शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर इ.८ वी ते इ. १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ सालापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत इ.८ वी ते इ. १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने रुपये १०० /- प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते.या शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील दलित विद्यार्थीनीला दरमहा रु.१०० /- मिळणार आहेत. ज्या घरात मुलगी म्हणजे ओझे समजले जाते अशा घरात तिला आता न्याय मिळू शकेल. मुलींचे सक्षमीकरण कारणे हा या योजनेमागचा हेतू आहे.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित, विनानुदानित, माध्यमिक शाळेतील इ.८ वी ते इ. १० वी च्या मुलींसाठी असून ती गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहील. यासाठी मागासवर्गीय मुलींना उत्पन्नाची अट राहणार नाही. परंतु शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. उपस्थिती नुसार शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी मुलींना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

योजनेच्या प्रमुख अटी : 
विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी.
विद्यार्थीनी इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणारी असावी.
विद्यार्थीनी ही शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.
दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
प्रति विद्यार्थीनीस दरमाह रुपये 60/- याप्रमाणे 10 महिन्या करीता रु.600/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांना अदा केली जाते.

अर्ज करण्याची पध्दत : 

सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.

संपर्क कार्यालयाचे नांव : 
संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.
संबंधित शाळेचे मुख्याध्यापक.