S R Dalvi (I) Foundation

Stress In Kids: मुलांमध्ये वाढतोय ताण? त्यांना रिलॅक्स करण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा

Topic: Stress In Kids: Growing Stress In Kids? Follow these simple tips to relax them

आजकाल विद्यार्थी (Student)अगदी लहान वयातच काळजी (Stress) करताना दिसतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला बाधा येते. जर एखाद मुल खूप दडपणाखाली असेल, तर तो त्याच्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकत नाही. गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोनाव्हायरस (Corona Virus ) कमी झाल्यानंतर आता पुनः शाळा सुरु झाल्या असून सध्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ सुरु झाला आहे. एवढ्या मोठ्या गॅप नंतर पुन्हा एकदा शाळा , परीक्षा या वातवरणात आल्यामुळे अशा परिस्थितींना तोंड देताना त्यांनी शांत राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी परीक्षेसोबतच आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
अशा वेळी काही सोप्या गोष्टींचे पालन करुन अगदी घरच्या घरी तुम्ही विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण घेण्यापासून रोखू शकता. कोरोनापूर्वी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते, परंतु आता त्यांना अभ्यासासोबत सुरक्षित राहण्याची गरज आहे. अशा काळात तणाव दूर ठेवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य कमी करण्यात आयुर्वेद मदत करू शकतो.आयुर्वेदाने काही मार्ग सुचवले आहेत जे विद्यार्थ्यांना परीक्षेमुळे तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात.
या दरम्यान विद्यार्थ्यांनी दूध, बदाम, बेदाणे, पनीर, हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे या अन्नाचे सेवन वाढवावे, कारण ते पचनक्रिया मजबूत ठेवण्यास मदत करतात, त्याच वेळी विद्यार्थ्यांनी जंक फूडचे सेवन पूर्णपणे बंद केले पाहिजे. कारण ते पचनसंस्थेसाठी अजिबात चांगले नाही.
अश्वगंधा सारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे, जी नैसर्गिकरित्या चिंता कमी करण्यास मदत करते.याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी घरात सकारात्मक वातावरण तयार केले पाहिजे, घरात लैव्हेंडर आणि लिंबू यांसारखे सुगंधित तेल/ अगरबत्ती लावा, ज्यामुळे मनःशांती मिळते.

Scroll to Top