S R Dalvi (I) Foundation

Summer Vacation Skills: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना ‘ही’ 10 कौशल्ये शिकवा

Topic: Summer Vacation Skills: Teach children these 10 skills during summer vacation

सध्या सगळ्याच शाळांमध्ये परीक्षा सुरू असून, बोर्डाच्या परीक्षांसोबतच इतर वर्गांच्या परीक्षाही मार्च आणि एप्रिलमध्ये संपणारआहेत. त्यानंतर सगळ्यांनाचा उन्हाळ्याच्या सुट्ट्या (Summer Vacation) लागतील. उन्हाळ्याच्या सुट्टीत बहुतेक मुलांना हिंडणे आणि मजा करणे आवडते, परंतु अनेक ठिकाणी फिरूनही बऱ्याच सुट्ट्या बाकी असतात अशा परिस्थितीत बहुतेक मुले संपूर्ण दिवस घरातच खेळण्यात घालवतात. व्हिडिओ गेम आणि टीव्ही पाहण यातच त्यांचा जास्त वेळ जातो. पण पालकांची इच्छा असेल तर या सुट्ट्यांचा सदुपयोग होऊ शकतो. खरंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच पालकांची शाळा सुरू झाल्यासारखी वाटते कारण या सुट्यांमध्ये मुलं खूप मस्ती करतात आणि अनेक कामं वाढवून ठेवतात. जर तुम्ही पालक असाल आणि तुमच्या मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत निष्क्रिय बसू नये आणि या वेळेचा सदुपयोग करावा असे वाटत असेल, तर आज आम्ही तुम्हाला त्या 10 कौशल्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकवल्या तर त्या पुढे जाऊन खुप उपयोगी पडतील.चला तर मग जाणून घेऊया त्या 10 कौशल्यांबद्दल ज्या प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकवल्या पाहिजेत.

संगीत (Music) : संगीतात जादू असते असे म्हणतात, त्यामुळे आपल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत संगीत शिकण्यासाठी पाठवा आणि मग त्यांच्या आयुष्यात होणारा बदल पहा. संगीत ही एक कला आहे जी कोणत्याही वयात शिकता येते. आजकाल अनेक संगीताचे क्लासेस बघायला मिळतात , ज्यामध्ये गिटार, सितार, पियानो इत्यादी सोबत स्वराचे प्रशिक्षण देखील दिले जाते.

थिएटर(Theater) : थिएटर ही अशी कला आहे जी प्रत्येक व्यक्तीने शिकली पाहिजे. यामध्ये मुलांना बोलण्याची आणि व्यक्त करण्याची कला रंगभूमीच्या माध्यमातून शिकायला मिळते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा चांगला उपयोग मुलाला नाट्य प्रशिक्षण देण्यापेक्षा दुसरा असूच शकत नाही.

पोहणे: लहान वयातच मुले पोहायला शिकली तर त्यांचा शारीरिक विकास चांगला होतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना पोहणे शिकवणे हा या सुट्ट्यांचा उत्तम उपयोग होऊ शकतो.

खेळ (Play): तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्याही खेळाच्या प्रशिक्षणासाठी पाठवू शकता. आजकाल खेळात खूप चांगले करिअर आहे, त्यामुळे पुढे जाऊन तुमची मुले खेळात करिअर करतील अशी शक्यतानाकारता येत नाही , त्यामुळे मुलांना त्यांच्या आवडीनुसार कोणत्याही खेळाच्या कोचिंगला पाठवणे आवश्यक आहे.

चित्रकला (Drawing): सर्जनशीलता व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चित्रकला. जर तुमच्या मुलांना चित्रकलेची आवड असेल तर त्यांना या उन्हाळ्यात चित्रकला वर्गात का पाठवू नये.

वाचणे आणि लिहिणे (Reading& writing): इथे अभ्यास करायचा म्हणजे अभ्यासक्रम वाचायचा नाही. वाचन म्हणजे तुम्ही मुलांना एक चांगले आणि सकारात्मक पुस्तक वाचायला देता, तसेच त्यांना त्यांचे विचार लिहिण्यास प्रवृत्त करता, यामुळे मुलाचे लेखन कौशल्य सुधारेल आणि त्यांच्या ज्ञानाची पातळी वाढेल.

पाककला Cooking): जर तुमच्या मुलाला स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्ही त्याला कोणत्याही कुकिंग क्लासमध्ये पाठवू शकता. स्वयंपाक हे एक काम आहे जे पुढे जाऊन खुप कामी येते. बरीच मुले पुढील अभ्यासासाठी बाहेर जातात, त्यामुळे त्यांना तिथे ही स्वयंपाकाचा खूप फायदा होईल.बागकाम: बागकाम हे असे काम आहे जे समाधान देते आणि मन प्रसन्न करते. मुलांना निसर्गाशी जोडण्याचा हा उत्तम मार्ग आहे, यासोबतच मुले बागकामातून पर्यावरण आणि स्वच्छतेची माहिती घेतात.

भाषा (Language): या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना काही भाषा शिकण्याच्या वर्गात पाठवा. हे त्यांच्या भाषेवर आणि संवादावर पकड ठेवेल.

संगणक (Computer): आजकालची मुले तंत्रज्ञानात जाणकार आहेत, परंतु तरीही संगणक हे एक गुंतागुंतीच उपकरण आहे जे चांगले शिकले पाहिजे. तुम्ही मुलांना फास्ट टायपिंग किंवा एमएस ऑफिस बद्दल शिकवू शकता.

ही काही खास कौशल्ये आहेत जी प्रत्येक मुलाने लहानपणापासूनच शिकली पाहिजेत. तुम्ही पालक असाल आणि तुमच्या मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा घ्यावा असे वाटत असल्यास, तुम्ही त्यांना यापैकी एक कौशल्य शिकवण्यासाठी पाठवू शकता.

Scroll to Top