S R Dalvi (I) Foundation

महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठांमध्ये परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

Topic: The Minister of Education has announced that examinations will be conducted offline in ‘these’ universities in Maharashtra

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी ‘राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या आगामी परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे सांगितले आहे. संस्थांच्या कुलगुरूंनी हा निर्णय घेतला आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे की कोविड-19 लाटेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा आधी रद्द करण्यात आल्या आणि नंतर ऑनलाइन घेण्यात आल्या.

सामंत असे ही म्हणाले की, “जर आपण ऑनलाइन परीक्षा घेत राहिलो तर उद्योग अशा विद्यार्थ्यांना स्वीकारेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे आता विद्यापीठांच्या सूचनेनुसार परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार आहेत. परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला नसून १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी घेतला आहे.अशी माहिती ही सामंत यांनी दिली.

Scroll to Top