S R Dalvi (I) Foundation

कोकण वाचवण्यासाठी जसा विरोध गरजेचा आहे तसा पर्यावरण पूरक विकासही हवा ….

The preservation of Konkan requires both opposition and environmental complementing development…

नुसते प्रोजेक्टला विरोध करून चालणार नाही तर कोकणात प्रत्यक्ष जो माणूस राहतो ,जीवितार्थ तेथिल निसर्गावर चालतो त्याला आर्थिक उत्पन्नचे अधिक मार्ग निर्माण करून दिले पाहिजे. जागा विकत घेणारे बाहेरचे असले तरी कवडीमोल किमतीला जागा विकणारे आपलेच होते आणि काहींना जागा विकायला भाग पडणारे मोठमोठ्या शहरात राहणारे त्यांचेच आर्थिक सक्षम भाऊबंद होते ज्यांना वाटायचे की आपला गावातील भाऊ आपल्या जागेतून येणाऱ्या उत्पन्नावर मजा मारतो आहे. आज असेच बहुतेक लोक कोकण वाचायला निघाले आहेत रजिस्टरार मध्ये रेकॉर्ड काढला तर जमिनी विकण्याची सुरवात ह्यांनीच केली होती.

कोकण वाचवण्यासाठी जसा विरोध गरजेचा आहे तसा पर्यावरण पूरक विकासही हवा आहे
त्या साठी 1 गाव एक जंगल रिसॉर्ट किंवा कॉटेज ही संकल्पना राबवून गावात पर्यटकांच्या मार्फत आर्थिक सुबत्ता आणणे गरजेचे आहे त्या साठी “प्राचीन कोकण ” पुतळ्याचे नव्हे तर गावा गावातील प्रत्यक्ष माणसांचे असले पाहिजे.


सिंधुदुर्ग जिल्यात 3000 गाव वाड्या आहेत डेस्टिनेशन वेडिंग च्या दृष्टीने जर प्रत्येक गाव परिवर्तित केले तर जग भरातून लोक लग्न करायला कोकणात येतील
कोकण वाचवण्यासाठी मार्ग अनेक आहेत विरोध हा त्यापैकी एक मोठा मार्ग आहे पण प्रत्येक मार्ग पैशातून बनवता येतो आणि कोकणात तो कुठून आणायचा हाच प्रश्न आहे.
आणि जे आणू शकतात ते स्वतः च एव्हडे लालची आणि स्वार्थी झाले आहेत तेच पाहिले झाड वाचवण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि 4 पैसे जास्त देऊन त्याच माणसाकडून तोडुनही घेतात.
कोकणाला आर्थिक भांडवल उभारण्यासाठी एक जनसामान्य संस्थे ची गरज आहे त्यावर विचार आणि काम व्हायला पाहिजे असे मला वाटते.

Scroll to Top