S R Dalvi (I) Foundation

Online Teaching करायचा विचार करताय? त्या आधी त्याचे प्रकार कोणकोणते आहेत ते जाणून घ्या

Topic: Thinking of doing online teaching? Before that, find out what the types are

कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव झाल्यानंतर भारतीय नागरिक आता ऑनलाइन (Online Jobs) नोकऱ्यांची मागणी करत आहेत. त्यामुळे ऑनलाइन नोकऱ्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली आहे. भारतातील अनेक ऑनलाइन ट्यूटरच्या नोकरीसाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.आजच्या काळात अनेक शिक्षक मुलांना ऑनलाइन शिकवून हजारो रुपये कमवत आहेत. तुम्हाला पण ऑनलाइन ट्यूटर होण्याची इच्छा असेल तर त्या आधी तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ‘Online Tutoring Jobs’ प्रकार कोणकोणते आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ऑनलाइन ट्यूटर जॉब्स चे 3 प्रमुख प्रकार.

Online Tutoring Jobs चे प्रकार:

  • भारतातील कोणत्याही शालेय संस्थेमध्ये ऑनलाइन अध्यापन आयोजित करण्यासाठी, तुम्हाला शालेय स्तरावरील विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शाळेत शिकवल्या जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या विषयाची तुम्हाला आधीच माहिती असायला हवी. तुम्हाला शालेय संस्थेत काम करायचे असेल, तर त्यासाठी तुमच्याकडून विशेष पदवीची मागणी केली जाते.
  • भारतातील कौशल्य विकास योजना अतिशय वेगाने प्रगती करत आहे कारण तिला भारत सरकारची मान्यता आहे. यामध्ये भारतातील तरुणांना रोजगारासाठी शिक्षण दिले जाते. हे विविध विषयांवर शिक्षण प्रदान करते. कौशल्य विकास आराखड्यात विविध तंत्रे देखील शिकवली जातात ज्यात कोडिंग, कम्युनिकेशन आणि सॉफ्ट स्किल्स यासारख्या तंत्रांचा समावेश होतो.
  • भारतात ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केले गेले आहेत, जर तुम्ही या क्षेत्रात कोर्स केला आणि कोणी तो विकत घेतला तर तुम्हाला भरपूर पैसे मिळतात.

आशा आहे की तुम्हाला Online Tutoring Jobs प्रकार समजले असतील. आता आपण लवकरच
Online Tutoring Jobs कुठे मिळवू शकाल याची माहिती घेणार आहोत.

Scroll to Top