S R Dalvi (I) Foundation

रुपयामध्ये व्यापार : भारत-मलेशियातील करार आहे काय? नेमका फायदा कोणाला?

Trade in rupees: Is there an India-Malaysia deal? Who exactly benefits?

जागतिक बाजारपेठेत भारतीय रुपयाची परिस्थिती चांगली नाही. मात्र भारताचा प्रयत्न आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारात स्थानिक चलनाचा प्रभाव वाढावा यासाठीभारत आणि मलेशियाने डॉलर ऐवजी त्यांच्या चलनात व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मलेशियाशिवाय 18 देशांनी रुपयामध्ये व्यापार करण्यास परवानगी दिली आहे.

मलेशिया दक्षिण पूर्व आशियातल्या सगळ्यात महत्त्वपूर्ण केंद्रांपैकी एक आहे.

आतापर्यंत भारत आणि मलेशियात व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होत असे. आता या नवीन कराराचं काय महत्त्व असेल?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते इंडिया इंटरनॅशनल बँक आणि बँक ऑफ मलेशियाची यात महत्त्वाची भूमिका असेल.

ही बँक क्वालालंपूरमध्ये आहे आणि युनियन बँक ऑफ इंडियाबरोबर मिळून काम करते. या दोन्ही बँकेमार्फत पैशाचे व्यवहार होतील.

कोणत्याही बँकेच्या व्यवहारात स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी वोस्त्रो नावाचं एक बँक अकाऊंट उघडावं लागतं.

या प्रकियेअंतर्गत इंडिया इंटरनॅशनल बँक ऑफ मलेशियाने युनियन बँक ऑफ इंडियामध्ये वोस्त्रो खातं उघडलं आहे. अशाच प्रकारे 18 देशांनी भारतीय बँकेत वोस्त्रो खाते उघडले आहेत.

रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात योग्य त्या सर्व परवानग्या दिल्या आहेत. जुलै 2022 मध्येच रिझर्व्ह बँकेने या प्रकियेला मंजूरी दिली होती.

त्यानंतर फिजी, जर्मनी, गुयाना, इस्रायल, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, ओमान, रशिया, सेशेल, बोत्सवाना, श्रीलंका, टांझानिया, युगांडा, ब्रिटन, सिंगापूर, मलेशिया या देशांनी वोस्त्रो खातं उघडलं आहे.

रुपी ट्रेड व्यापार आणि विकासाच्या मदतीसाठी आणण्यात आल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे.

रुपी ट्रेडचे चार मुख्य पैलू

मलेशियातील अर्थतज्ज्ञ मसिलमानी यांच्या मते रुपी ट्रेडने दोन्ही पक्षांना फायदा होईल. बीबीसी तामिळशी बोलताना त्यांनी चार वैशिष्ट्यांचा धांडोळा घेतला.

ते म्हणतात, “पहिली गोष्ट म्हणजे विनिमय दर. जर तुम्ही डॉलरचा वापर करत असाल तर कमिशन द्यावं लागतं. दुसरं म्हणजे व्यापारी जगतातील चलनदरात चढ उतार, तिसरा म्हणजे व्यापारात वाढ आणि चौथा म्हणजे व्यापारी गोष्टींमध्ये वाढ.”

त्यांच्या मते, “यासाठी रुपी ट्रेड आपल्याला हव्या असलेल्या चलनासाठी पर्याय देतं. जर या चारही गोष्टी लक्षात ठेवल्या तर दोन्ही देशाच्या व्यापाऱ्यांना आणि उद्योगपतींपासून सामान्य माणसापर्यंत लोकांना फायदा होईल.

त्यांच्या मते गेल्या अनेक काळापासून डॉलरला जागतिक व्यवहारात फारच महत्त्व आहे. मात्र नेहमीच डॉलरचा वापर केला तर कमिशन आणि इतर खर्च वाढतील. आम्ही भारतीय रुपयाचा वापर केला तर इतर खर्च वाढतील.

जर आम्हाला मलेशियाचं चलन रिंगटिसमध्ये पैसे द्यावे लागत असतील तर आधी आम्हाला भारतीय रुपयाला डॉलरमध्ये बदलावं लागेल. त्यानंतर डॉलरला रिंगटिसमध्ये परिवर्तित करावं लागेल.

आम्हाला दोनवेळा कमिशन द्यावं लागेल. काही वेळा भारत आणि मलेशियासाठी हे फायदेशीर असू शकेल. मात्र नेहमीसाठी नाही. चलनाची किंमतही सातत्याने बदलत राहील. डॉलरमध्ये चढ उतार सुरू असतो. यामुळे डॉलरमध्ये व्यवहार करणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

ते म्हणतात, “भारतीय रुपया मजबूत झाला किंवा नाही झाला तर त्याचं महत्त्व वाढत आहे. रशियासारखे देश त्याचा स्वीकार करत आहे. अशाच प्रकार मलेशियानेही स्वीकार केला आहे. मलेशिया सरकारचा हा चांगला निर्णय आहे.”

त्यांच्या मते, जर व्यापार वाढला तर तो व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. जर व्यवहार सोपे झाले तर व्यापार वाढेल आणि त्याचा विस्तार होईल.”

ते म्हणतात, “मला वाटतं की दोन्ही देशांच्या व्यापाऱ्यांसाठी हे उपयोगी पडेल.”

मासिलमानी म्हणतात, “नुकतेच मलेशियाचे पंतप्रधान चीनला जाऊन आले. त्यांच्या दौऱ्याने व्यावहारिक संधी निर्माण होण्यास मदत झाली. मला असं वाटतं की व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी ते भारताचा दौरा करतील.”

मलेशिया आणि भारतामध्ये किती व्यापार होतो?

युनियन बँक ऑफ इंडियानुसार या कराराने दोन्ही देशाच्या वस्तू आणि सेवांमध्ये एक पारदर्शकता येईल.

रुपी ट्रेडमुळे खर्चात घट होईल आणि व्यापाऱ्यांना फायदा होईल.

2021-22 मध्ये भारत आणि मलेशिया यांच्यात 19.4 अब्ज डॉलरचा व्यापारा झाला. रुपी ट्रेडमुळे ही परिस्थिती बदलेल आणि व्यापारात वाढ होईल.

ASEAN देशांध्ये मलेशिया हा सिंगापूर आणि इंडोनेशियानंतर भारत हा तिसरा मोठा व्यापारी भागीदार देश आहे.

2021-22 मध्ये सिंगापूरबरोबर भारताचा व्यापार 30.1 अब्ज डॉलर आणि इंडोनेशियाबरोबर 26.1 अब्ज डॉलर व्यापार केला.

वर्षांच्या शेवटपर्यंत भारत त्याची निर्यात दोन ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्यासाठी जोर लावत आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारत डॉलर किंवा युरोवर अवलंबून असलेल्या सात देशांबरोबर व्यापाराला चालना देत आहे.

भारत मलेशियाचा 13 वा मोठा व्यावसायिक भागीदार आहे. मलेशिया भारताचा 10 मोठा भागीदार आहे. भारत त्यांना खनिज, इंधन, अल्युमिनिअ, खायचं मांस, स्टील, रसायनं, बॉयलर आणि इलेक्ट्रॉनिक्स सामान निर्यात करतं. मलेशिया ऑरगॅनिक केमिकल आणि पाम तेल निर्यात करतं.

हा करार डॉलरला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे का असाही एक प्रवाद आहे. मात्र क्वालालंपूर येथील स्थानिक पत्रकार के. देवेदिरन म्हणतात की डॉलर आव्हान देतोय या ऐवजी भारतीय रुपयाचं महत्त्व वाढवण्याच्या रुपातही पाहिलं जाऊ शकतं.

Scroll to Top