What is investment? How to become rich? How to get money?
गुंतवणुक म्हणजे काय बुवा ? गुंतवणुक म्हणजे आज हातातील पैसा अशा जागी लावणे जो भविष्यात वाढून मिळेल. तुम्ही नोकरी, व्यवसाय अथवा नशिबाने श्रीमंत व्हा. पण जर तुम्ही गुंतवणुक नाही केली तर तुम्ही जास्त काळ श्रीमंत राहू शकणार नाही आणि आयुष्यभर तुम्हाला काम कराव लागेल.
समजा आज सकाळी तुम्हाला जुन्या पॅन्ट मध्ये एक १०० ची नोट सापडली. तुम्हाला आठवल कि अरे ! आपण तर हि नोट आईसक्रिम विकत घ्यायला ठेवली होती. तुम्ही ठरवल कि आज त्या नोटेने आईसक्रिम विकत घेणार. तुम्ही दुकानात गेलात, १०० ची नोट दिली आणि आईसक्रिम मागितली. पण तुम्हाला आईसक्रिम मिळणार नाही. कारण मागच्या वर्षी १०० ची असलेली आईसक्रिम आता १०६ ची झाली, महागाईमुळे. मग जर तुम्ही तुमचे पैसे अशा जागी नाही लावले जिथे ते १०० चे १०६ होतील तर तुम्हाला आईसक्रिम मिळणार नाही. जेव्हा तुम्ही १०० चे १०६ होण्यासाठी जो प्रयत्न करता त्याला म्हणतात गुंतवणुक.
समजा एक शेतकरी आहे, त्याने उत्पादन केलेल्या धान्यापैकी काही धान्य त्याने स्वतःसाठी काढून ठेवले. आता हे धान्य गुंतवणुक झाली का ? जर त्याने ते धान्य पेरणी साठी वापरले तर, हो आणि जर त्याने हे धान्य घरी खाण्यासाठी वापरले तर नाही. जमा करणे म्हणजे झाली बचत, खाणे म्हणजे झाला खर्च आणि पेरणे म्हणजे झाली गुंतवणुक. जर तुमचा पैसा वाढत असेल तरच ती गुंतवणुक आहे. कपाटात पैसे ठेवणे म्हणजे गुंतवणुक नाही.
आपण गुंतवणुक का करत नाही ?
१. अज्ञान
२. भीती
३. संयमाचा अभाव
विभाजन करणे
आपण गावाला जाताना जसे सर्व पैसे एका bag मध्ये ठेवत नाही. थोडे थोडे पैसे सर्व bag मध्ये ठेवतो जेणेकरून जर bag चोरीला गेली तर फक्त काही पैसे चोरीला जातील. आपण तसच करायच, पैसे थोडे थोडे वेगवेगळ्या जागी गुंतवावे. म्हणजे सुरवातीला तुम्ही काही चूक केली तरी तुमच होणार नुकसान हे कमी असेल. विभाजन केल्यामुळे धोका कमी होतो. पण एवढेही जास्त विभाजन करू नका कि तुम्हाला येणारा परतवावा फार कमी होऊन जाईल.
गुंतवणूक आपण पैसा वाढवण्याकरिता करतो. विमा आपण काही वाईट झाल तर पैसे मिळावे याकरिता काढतो. अनेक लोक विमा पॉलीसी काढून दोन्ही गोष्टी एकत्र करू पाहतात. पण त्यामुळे ना चांगला विमा मिळतो, ना गुंतवणूक होते. म्हणून समजून घ्या विमा हा गुंतवणूक नाही, विम्याचे काम वाईट वेळी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे आहे. विमा काढणे पण आवश्यक आहे, गरज आहे ती, विमा आणि गुंतवणूक योग्य प्रमाणात करण्याची. त्याकरिता त्यांना वेगळ करणे ठीक राहील.
दोन्ही गोष्टीमध्ये आपण पैसा लावतो, अधिक पैसा मिळवण्यासाठी. दोन्ही मध्ये पैसा गमावण्याचा धोका असतो, पण दोन्ही मध्ये फरक काय ? गुंतवणूक ज्ञानाच्या आधार केली जाते, जुगार नशिबाने खेलला जातो. गुंतवणुकीमध्ये अभ्यास केला जातो, मी हे केले तर काय होईल ? ते केले तर काय होईल ? किती फायदा होईल ? किती नुकसान होईल ? जेव्हा कमी धोक्या मध्ये जास्त फायदा होत असेल, तेव्हा गुंतवणूक करावी पण जुगार याउलट असतो. जुगारात जास्तीत जास्त धोका घेतला तरच फायदा होतो. जुगारात फक्त नशिबच असते. गुंतवणूक डोक्याने केली जाते, गणित करून. तर जुगार भावनेने खेळला जातो.
गुंतवणूक एक कला.
चित्र काढणे जशी एक कला आहे. तसेच, गुंतवणूक करणे हि पण एक कला आहे. तुमचे गुरुजी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकवतील, ब्रश कोणता वापरायचा, कसा पकडायचा, रंग कोणता वापरायचा, कसा तयार करायचा शिकवतील. पण तुमच चित्र तुम्हालाच काढव लागत, तसेच गुंतवणुकीचे आहे. दुसरे तुम्हाला महत्वाच्या मुलभूत गोष्टी सांगू शकतात. पण गुंतवणुकीचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. फसवणारे लोक तुम्हाला दाखवतात कि पैसा कमावणे फार सोपे , काही काम करायची गरज नाही, चिंता नाही, आरामात पैसा बनेल. पण तस नाही तुम्हाला शिकत रहाव लागेल. लक्ष्य ठेवाव लागेल तुमच्या गुंतवणुकीबद्दल काय सुरु आहे, काय नाही. दुसऱ्यान पैसे कमावले ते आपल्याला दिसते, त्याने काय मेहनत केली, ते पाहणे आवश्यक आहे.
लक्ष्य
प्रत्येक माणसाच्या जीवनात काही मुख्य गोष्टी असतात ज्या त्याला कराव्या लागतात.
१. निवृत्ती ची सोय
२. मुलांच लग्न
३. मुलांचे शिक्षण
४. आजारपणाची सोय
५. घर
वरील गोष्टींसाठी तुम्हाला किती पैसे लागतील ते लिहा. हि झाली तुमची आर्थिक उद्दिष्टे. हि पूर्ण करायला तुमच्याकडे किती वेळ आहे ? त्यानुसार प्रत्येक उद्दिष्टासाठी तुम्ही एक गुंतवणूक केली पाहिजे. यशस्वी गुंतवणुकीला वेळ. शिष्ट आणि धैर्य लागते. कोणी एका उत्पन्नावर अवलंबून राहू नये.
आपण जेव्हा फक्त एका उत्पन्नावर अवलंबून राहतो तेव्हा आपण फार जास्त धोका घेतो. त्यामुळे गुंतवणूक करणे फार आवश्यक आहे. अश्या प्रकारे आपण एक दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत तयार करतो आणि धोका कमी करतो. आपल्या उत्पन्नाचा एक स्त्रीत काही दिवस बंद झाला तर दुसऱ्या स्त्रोताच्या साहाय्याने काही दिवस काढू शकतो. नौकरी करणाऱ्यांना गुंतवणूक करणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांना नेहमी दबावाखाली जगाव लागेल कि मला कामावरून काढल जाऊ शकते.
जेव्हा तुम्हाला गुंतवणुकीचे महत्व कळेल तेव्हापासून. मग तुमच वय काहीही असो. १० किंवा ६० जस जस विज्ञान प्रगती करत आहे, माणसाचा आयुष्य वाढत आहे. कोणालाच माहित नाही आपण किती वर्ष जगू. मग ६० वयाच्या माणसाने पण गुंतवणूक केली पाहिजे आणि १० वर्ष्याच्या पण. मग ह्या दोघानी सारखी गुंतवणूक केली पाहिजे का ? उत्तर आहे, नाही! १० वर्षाच्या मुलाकडे खूप वेळ आहे. तो जास्त धोका पत्करू शकतो, आणि ६० वर्षाचा माणूस कमी. म्हणून गुंतवणूक सर्वांनी करावी. पण आपल्या वयानुसार धोका पत्करून. समजा तुमचे वय x आहे तर तुम्ही (१००-x) एवढी गुंतवणूक equity मध्ये केली पाहिजे.