What is the importance of humor in a person’s life?
प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंदी आणि समाधानी राहायचे असते, परंतु ते नेहमीच शक्य नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात इतरांप्रमाणेच सुख-दुःखाचाही वाटा असतो. आपण सर्वजण आपल्या मित्रपरिवाराच्या आनंदात सहभागी होतो. आपल्या समाजातील प्रत्येकजण आपल्या आनंदाचा क्षणी आपल्यासोबत असतात. परंतु मला असे वाटते कि दुःखाच्या वेळी आपल्याजवळ फक्त विनोद असतात जे आपल्याला हसवतात. आपण खूप दुःखी असताना देखील, जर आपण एखादा विनोद वाचला तर तो विनोद आपल्या चेहऱ्यावर काहीवेळासाठी तरी हसू आणतो.
साहित्यात जसा विनोद सापडतो तसाच तो प्रतिमांमध्येही सापडतो. नाटकातून तारांकित, ते व्यंग आणि हास्य अशा विविध रूपांमध्ये प्रकट होते. विनोद हे आपल्या प्रत्यक्ष जीवनातही रोज घडत असतात व ते सर्वाना आवडतात देखील. विनोद हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने, त्याचा विचार केवळ साहित्य किंवा कलेत आढळणारी गोष्ट म्हणून न करता, प्रत्यक्षात अनुभवलेली गोष्ट म्हणूनही विचार करण्यात अर्थ आहे. विनोदाची कल्पना, जी अनेक कला प्रकारांशी निगडीत आहे आणि वास्तविक जीवनात देखील सातत्याने दिसून येते, ती खूपच गुंतागुंतीची असू शकते. विनोद कसा तयार होतो? हे सांगणारे एपिग्राफ जसे जीवनाच्या अनुषंगाने बनवले जातात, तसेच ते कलेच्या विनंतीनुसार बनवले जातात.
मानवात जे नाही त्याची भरपाई म्हणून देवाने कल्पनाशक्ती दिली आणि जे आहे ते सुखमय व्हावे यासाठी विनोदबुद्धी दिली. अगदी एका शब्दानेही हास्याचे फुलोरे उडताना आपण कित्येकदा अनुभवले असेल. काल्पनिक विनोद असतात ते अधिकतर प्रचारात असतात आणि ते प्रवाही होऊन जातात. मात्र त्यांच्या उपत्तीकाराची काही नोंद राहत नाही.
काही विनोद सोज्वळ असतात तर काही विनोद एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर केलेले असतात. त्यावर लोक हसले तरी त्याला चांगले विनोद म्हणता येणार नाही. काही लोकानातर विनोद केलेलेच समजत नाहीत हाही एक मोठा विनोदच आहे म्हणा. विचित्रपणा किंवा विसंगतीमुळे खूप विनोद होतात आणि अशा विसंगती माणसांच्या जीवनात ठासून भरलेल्या असतात. आजचे जीवन खूपच ताणतणावाचे झाले आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे विनोद. त्याने जीवन सहज आणि सुंदर बनते.
आयुष्यातील दुखाचे हसून विस्मरण करणे हा खरा विनोदाचा उद्देश आहे. ज्या विनोदात हास्य आणि अश्रू एकत्र येतात तो विनोद म्हणजे ‘सर्वश्रेष्ठ विनोद’. हास्यविनोद म्हणजे मोठा मानवधर्म आहे. त्यामुळेच तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे. ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन’ आपल्या जीवनातील हास्याचा जास्तीत जास्त आनंद मिळावा. नियती कुणालाही चुकली नाही आणि चुकनारही नाही. जिथे जिथे तणाव आहे, तिथे विनोदाची गरज आहे.
मानवी जीवन हे धकाधकीचे आणि सुखदुःखाने भरलेले आहे. अशा या जीवनात विनोदामुळे काही क्षण का होईना हास्य अनुभवायला मिळते. जीवनात सुखापेक्षा दु:खाचे क्षण जास्त असतात. दु:ख आहे त्या तीव्रतेने माणसाला भोगावे लागले, तर तो दु:खाच्या ओझ्याखाली एवढा दबून जाईल की, त्याला जीवनातील उपलब्ध सुख उपभोगताही येणार नाही. अशावेळी विनोदाचे वरदान माणसाचे जीवन सुसह्य करते.
विनोदामुळे कोणाचे मन न दुखवता त्याला त्याचे दोष सांगता येतात. तसेच गुणही सांगता येतात. विनोदामुळे ताणतणाव कमी होतात. तसेच विनोदातून लोकांना शिक्षण सुद्धा देता येते. म्हणून विनोद हा मानवी सुख आणि दु:ख यांच्यात सुवर्णमध्य साधतो.